Last Update:
 
ऍग्रो गाईड

डाळिंब लागवड कशी करावी?
-
Wednesday, July 25, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: agro guide
शिवाजी देशमुख, अंबाशी, जि. बुलडाणा
डाळिंब लागडीसाठी हलकी ते मध्यम, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीसाठी गणेश, जी-137, मृदुला, फुले आरक्ता, भगवा या जाती निवडाव्यात. सरकारमान्य रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतूनच कलमे खरेदी करावीत. माती परीक्षण अहवालानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन करावे. लागवडीचे अंतर 4.5 x 3 मीटर ठेवावे. लागवडीनंतर सुरवातीची दोन वर्षे दोन ओळींमध्ये कांदा, मूग, चवळी, सोयाबीन यांसारखी कमी उंचीची आंतरपिके घ्यावीत. काकडीवर्गीय आणि वांगेवर्गीय पिकांची लागवड करू नये. लागवडीविषयी तांत्रिक माहितीसाठी कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (02426- 243247) किंवा कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (0724- 2259262) येथे संपर्क साधावा.
प्रतिक्रिया
On 04/01/2013 09:40 AM गुलाब संतोष पाटील said:
मला माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद, मी भगवा या जातीची निवळ केली आहे. वेळोवेळी मला मार्गदर्शन करावे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: