Last Update:
 
ऍग्रो व्हिजन

सापांची उत्क्रांती...
-
Monday, July 30, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: agro vision

सापांची उत्क्रांती प्रागैतिहासिक काळातल्या विशिष्ट सरड्यापासून झाली असे दिसते. उत्क्रांतीच्या काळात त्याचे शरीर लांब व निमुळते झाले. त्याचे वापरात नसलेले पाय गायब झाले. पायासारखे अवयव नसूनही सापांची चाल वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यांचा साधारण वेग ताशी तीन कि.मी., तर अधिकतम वेग ताशी सात कि.मी असतो. आफ्रिकेतील मांबा हा साप ताशी 11 कि.मी. इतक्‍या वेगाने मार्गक्रमण करू शकतो. आज आपण पहाडी तस्कर या सापाची माहिती पाहू.

पहाडी तस्कर

इंग्रजी नाव - -चेपींरपश Montane trinket snake
शास्त्रीय नाव - Coelognatlnus helena monticollaris
बिनविषारी
अधिकतम लांबी - 100 सें.मी. (तीन फूट तीन इंच)
रंग व आकार - तपकिरी, चॉकलेटी आणि काळ्या अशा सर्व रंगांत आढळतो. शरीर सडपातळ आणि लांब. अंगावर नक्षीदार, जाड आडवे पट्टे. हे पट्टे शेपटीकडे पुसट होत जातात. नक्षीनंतर शरीरावर दोन्ही बाजूस गडद तपकिरी उभ्या रेषा. पोटाकडील भाग पांढरा व त्यावर काळी नक्षी.
प्रजनन - मार्च-एप्रिल दरम्यान मादी 10 ते 15 अंडी घालते. सुमारे 65 दिवसांनंतर पिल्ले बाहेर पडतात.
खाद्य - पाली, छोटे पक्षी, उंदीर व लहान सस्तन प्राणी.
आढळ - पश्‍चिम घाटात सर्वत्र आढळतो.
वास्तव्य - भातशेती, खडक, सदाहरित जंगले, तसेच शहरातही आढळतो.
वैशिष्ट्ये - दिनचर तसेच निशाचर. मुख्यतः जमिनीवर असला तरी झाडावरही चढतो. डिवचला गेला असता तोंड उघडून हल्ला करतो.

सर्पदंश कसे टाळावेत?
- घरात किंवा घराच्या बाहेर अनावश्‍यक वस्तूंचा ढीग करणे टाळावे. शिल्लक राहिलेल्या विटा, दगड किंवा फरश्‍या ही लपण्यासाठी उत्तम जागा असते.
- बहुतेक वेळा ग्रामीण भागात घराशेजारी सरपण रचून ठेवले जाते, त्यामध्ये सापांना लपण्यासाठी मुबलक जागा मिळते. सरपणही घरापासून दूर अंतरावर ठेवावे. पहाटे अंधारात सरपण काढतानाही बॅटरी किंवा कंदिलाचा वापर करून काळजीपूर्वक सरपण काढावे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: