Last Update:
 
प्रादेशिक

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
- (प्रतिनिधी)
Wednesday, August 01, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: nashik,   monsoon,   rain,   regional,  

 नाशिक - दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मागील तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. श्रावण महिना निम्मा सरत आला असतानाही जिल्हाभरात पाऊस सरासरी पाच मिलिमीटरच्या वर जोर घेत नव्हता. मात्र मागील दोन- तीन दिवसांपासून श्रावण सरींनी वेग धरला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अजिबात पाऊस न झालेल्या, तसेच अत्यल्प पाऊस झालेल्या मालेगाव, बागलाण, देवळा, चांदवड, सिन्नर, निफाड या तालुक्‍यांतही हलक्‍या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सरासरी पावसाची शनिवारी (ता. 28) 5, रविवारी (ता. 29) 5, सोमवारी (ता. 30) 17 तर मंगळवारी (ता. 31) दुपटीहूनही अधिक म्हणजे 40.2 मिलिमीटर अशी पावसाची नोंद झाली. मंगळवारी (ता. 31) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 603 मिलिमीटर पाऊस झाला. तालुकानिहाय पाऊस (मि.मी.) - नाशिक 35, इगतपुरी 93, दिंडोरी 35, पेठ 57, त्र्यंबकेश्‍वर 75, मालेगाव 15, नांदगाव 15, चांदवड 28, कळवण 36, बागलाण 17, सुरगाणा 114, देवळा 9, निफाड 29, सिन्नर 32, येवला 13.

गंगापूर धरणातील साठ्यात सहा टक्‍क्‍यांनी वाढ
जिल्ह्यातील धरणक्षेत्रातील पावसात वाढ झाल्याने धरणसाठ्यातही वाढ होताना दिसत आहे. शनिवार (ता. 29) पर्यंत 14 टक्केच साठा असलेल्या गंगापूर धरणातील साठा मागील तीन दिवसांतच सहा टक्‍क्‍यांनी वाढून तो 20 टक्‍क्‍यांवर गेला आहे. जिल्ह्यातील 23 धरणांतील सरासरी जलसाठा मागील तीन दिवसांत 11 वरून 14 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणांतील जलसाठ्याची मंगळवार (ता. 31) पर्यंतची स्थिती (साठा दशलक्ष घनफूट या प्रमाणात)

धरणाचे नाव--- क्षमता---आजचा उपयुक्त साठा---टक्केवारी

गंगापूर--5630--1140---20
काश्‍यपी--1852--128---7
गौतमी गोदावरी--1883--208--11
पालखेड--750--25--3
करंजवण--5371---242---5
वाघाड--2502---217--9
ओझरखेड--2130---00--00
पुनेगाव--621---00--00
तिसगाव--450---00--00
दारणा--7149---4008---56
भावली---1440---958---67
मुकणे--4426---624---14
वालदेवी--1133---614---19
नांदूरमध्यमेश्‍वर---257----58---23
चणकापूर--2714---280---10
हरणबारी--1166---125--11
केळझर---572---3--1
नागासाक्‍या--397---00--00
भोजापूर--361----00---00
कडवा---1869--129---7
पुनद--1404---201---14
गिरणा---18500---287---2
आळंदी--970---14--1


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: