Last Update:
 
मुख्य पान

राज्यभर पावसाचा जोर वाढणार
-
Sunday, August 05, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: pune,   rain,   mansoon,   maharashtra
कोकण, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

पुणे (प्रतिनिधी) ः मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा व बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र यांची अनुकूलता वाढल्याने राज्यात पुन्हा सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस व अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

सोमवारी सकाळपर्यंत कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र (खानदेश) व विदर्भात अनेक ठिकाणी, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शनिवारी सकाळपर्यंत घाटमाथ्यानजीकच्या भागात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा व उर्वरित महाराष्ट्रात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस सुरू होता. कोकण व विदर्भात सर्वदूर हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भात मॉन्सून सक्रिय होता. कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता.

ओरिसा व बंगालजवळ उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पाठोपाठ नुकताच उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्यापर्यंत वर गेलेल्या मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा पुन्हा दक्षिणेकडे सरकला आहे. या दोन्हींच्या प्रभावामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे. शनिवारी दुपारपर्यंत अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर किनारी कमी दाबाच्या पट्ट्याचा अभाव होता. हा पट्टा पुन्हा सक्रिय झाल्यास पावसाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते, अशी माहिती हवामान खात्याच्या सूत्रांनी दिली.

प्रमुख ठिकाणचा शनिवारी (ता. 4) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील पाऊस मिलिमीटरमध्ये ः कोकण ः ठाणे 15.2, जव्हार 14, तळा 59, खालापूर 29, महाड 55.8, माणगाव 46, रोहा 31, सुधागड 38, संगमेश्‍वर 57.2, राजापूर 42, लांजा 52, मंडणगड 40, खेड 28, कणकवली 98, वैभववाडी 65, कुडाळ 54, दोडामार्ग 51, सावंतवाडी 44;

मध्य महाराष्ट्र ः इगतपुरी 16, सुरगाणा 15, वेल्हे 47, मुळशी 29, भोर 18, जावळी 20.1, पाटण 18.2, महाबळेश्‍वर 57.6, चंदगड 127, गगनबावडा 104, राधानगरी 98, शाहूवाडी 42, भुदरगड 48, पन्हाळा व गडहिंग्लज 22;

मराठवाडा ः उदगीर 12.1, दावणी 11.3, किनवट 13, रिसोड 8;

विदर्भ ः भिवापूर 18, लाखणदूर 75.5, पवनी 51.6, साकोली 17, लखानी 15.3, आमगाव 24, सडकअर्जुनी 16, चंद्रपूर 16.2, ब्रह्मपुरी 54.2, नागभिड 28.3, सिंदेवाही 26.2, सावली 25, गडचिरोली 41.2, कुरखेडा 27.1, अरमोरी 78.2, चामोर्शी 37, एटापल्ली 23.1, धानोरा 50.2, देसाईगंज वडसा 53.6, मुलचेरा 16.2


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: