Last Update:
 
मुख्य पान

'साम ऍग्रोवन' प्रश्‍नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
-
Sunday, August 05, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: saam marathi,   tv,   agrowon,   kolhapur
कोल्हापूर ः साम वाहिनीवरील "ऍग्रोवन' कार्यक्रमांतर्गत "यांत्रिक शेती' विषयावरील प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत मलवडी (जि. सातारा) येथील रवींद्र रत्नाकर देवकर यांनी भाग्यवान विजेता म्हणून पहिला क्रमांक पटकावला. दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे मधुकर राजाराम देशपांडे (संगमनेर, जि. अहमदनगर), संभाजी विलास भोसले (कांचनवाडी, जि. कोल्हापूर) यांनी पटकावले. त्यांना अनुक्रमे सात हजार, चार हजार आणि तीन हजार अशी रोख बक्षिसे विजय इंजिनिअरिंगचे सत्येन शहा यांच्या हस्ते देण्यात आली.

"साम-ऍग्रोवन'मुळे देशभरात सुरू असलेले शेतीतील नवनवे प्रयोग घरबसल्या शेतकऱ्यांना पाहायला मिळतात. साहजिकच अशा कार्यक्रमांतून शेतकरी अधिक प्रयोगशील होईल, असे मत या वेळी श्री. शहा यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अभिनेता विजय पाटकर, श्री. शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत झाली होती.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: