Last Update:
 
बाजारभाव

नगरमध्ये मूग 5500 रुपये क्विंटल
-
Tuesday, August 07, 2012 AT 01:15 AM (IST)
Tags: market rate
नगर - येथील बाजार समितीत गत सप्ताहात ज्वारी, बाजरी, तूर, गूळ डाग, गहू, मक्‍याची चांगली आवक झाली. इतर भुसारची आवक सर्वसाधारण राहिली. ज्वारीची सर्वाधिक 419 क्विंटल आवक झाली. ज्वारीला 1251 ते 2200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. गूळ डागाची 2930 क्विंटल आवक झाली. गूळ डागाला 3000 ते 3150 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. तुरीची 386 क्विंटल आवक झाली. तुरीला 3900 ते 4900 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. बाजरीची 210 क्विंटल आवक झाली. बाजरीला 1500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. गव्हाची 176 क्विंटल आवक झाली. गव्हाची 1201 ते 1870 रुपये प्रति क्विंटल असा दर राहिला. मुगाची आवक कमी आहे. मुगाची 31 क्विंटल आवक झाली. मुगाला कमाल 5500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. भाजीपाल्याची आवक सर्वसाधारण होती. भाजीपाल्याच्या दरात तेजी आहे. पावसाळ्यात भुसारसह भाजीपाल्याची आवक चांगली असते; परंतु यंदा पावसाने दिलेल्या ओढीमुळे आवक सर्वसाधारण असून, दरात तेजी कायम आहे, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

नगर बाजार समितीत शेतीमालाची झालेली आवक व दर
शेतीमाल ----------आवक---------------किमान --------------कमाल दर
ज्वारी 419 1251 2200
बाजरी 210 1500 1500
गहू 176 1201 1870
हरभरा गावरान 74 3700 5000
जाडा हरभरा 35 5200 5200
तूर 71 3900 4100
कुळीथ 70 3300 3600
गूळ डाग 2930 3000 3100
चवळी 13 4000 4000
मका 45 1200 1425
मठ 63 5301 5301
मूग 31 5500 5500 रु. प्रति क्विंटल

भाजीपाला - (दहा किलोंचे दर)
टोमॅटो 755 110 250
वांगी 176 55 150
फ्लॉवर 453 70 240
कोबी 547 50 150
गवार 64 100 400
काकडी 550 70 200
भेंडी 145 50 150
बटाटे 1979 120 170
हिरवी मिरची 334 200 400
गावरान लसूण 46 220 500
भुईमूग शेंगा 2650 250 310 रु.

पालेभाज्या - (शंभर जुड्या)
मेथी 7554 400 700
कोथिंबीर 6964 250 580
शेपू 2543 600 800
पालक 2232 200 500 रु.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: