Last Update:
 
ऍग्रो प्लस

तापमानात अल्पशी वाढ; हवामान कोरडे राहील
-
Saturday, December 03, 2016 AT 05:45 AM (IST)
Tags: agro plus
डॉ. रामचंद्र साबळे

महाराष्ट्रावर सध्या १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. ता. ४ डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्मितीची शक्यता असून, अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील भागावरही हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. हवेचा अधिक दाब राहण्यामुळे थंडीचे सध्याचे प्रमाण कायम राहील. ता. ५ डिसेंबरच्या दरम्यान चक्रीवादळाची वाटचाल पूर्वकिनारी भागाच्या दिशेने होईल. तामिळनाडू व आंध्र प्रदेशच्या पूर्वकिनारी भागात त्यामुळे पावसाची शक्यता निर्माण होईल. ता.. ७ डिसेंबरपर्यंत ते पूर्वकिनारी भागास चांगल्या पावसास सुरवात करेल. त्यानंतर वादळीवारे आणि पाऊस याचा प्रभाव पूर्वकिनारी भागालगतच्या भूपृष्ठावर जाणवेल. त्याच दरम्यान हवेच्या दाबात बदल होतील. हिमालय पर्वत रांगांच्या पायथ्याशी १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब निर्माण होऊन वारे उत्तर दिशेने दक्षिणेकडे वाहतील. त्यातून हवेतील तापमान आणखी कमी होईल. आणि थंडवारे दक्षिण दिशेस वाहतील. त्यामुळे थंडीचे प्रमाण कायम राहील. हवेत बाष्पाचे प्रमाण वाढल्याने सकाळच्या वेळी पिकांवर दव दिसेल. 

कमाल तापमानात काही भागांत वाढ होईल. किमान तापमानातही काही भागांत वाढ होईल. एकूणच हवामान बदलाचा परिणाम या आठवड्यात जाणवेल. कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर व सांगली भागांतही हवामान अंशतः ढगाळ राहील. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हवामान अल्पशा प्रमाणात ढगाळ राहील. विदर्भातही हवामान अल्पशा प्रमाणात ढगाळ राहील. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १४ किलोमीटर राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून व अाग्नेयेकडून राहील.

१) कोकण - सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अधिक ढगाळ राहील, तर रत्नागिरी जिल्ह्यात आकाश बऱ्याच प्रमाणात ढगाळ राहील. रायगड जिल्ह्यात आकाश अल्पशा प्रमाणात ढगाळ राहील. ठाणे जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. पावसाची शक्यता नाही.

२) उत्तर महाराष्ट्र - उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील, तर जळगाव व नाशिक जिल्ह्यांत किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून राहील.

३) मराठवाडा - मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील, तर जालना, परभणी, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान लातूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, नांदेड, बीड या जिल्ह्यांत कमाल तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून राहील. पावसाची शक्यता नाही.

४) पश्चिम विदर्भ - पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर बुलडाणा, वाशीम व अकोला जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. अमरावती जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाशीम जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के राहील. अमरावती जिल्ह्यात ६८ टक्के राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५० टक्के राहील.

५) मध्य विदर्भ - मध्य विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५४ टक्के राहील. पावसाची शक्यता नाही. किमान तापमानात वाढ होईल.

६) पूर्व विदर्भ - पूर्व विदर्भात चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस तर भंडारा जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. पावसाची शक्यता नाही.

७) दक्षिण - पश्चिम महाराष्ट्र - सोलापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअस राहील, तर नगर जिल्ह्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांवर ढगांचे प्रमाण अधिक राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ५६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अाग्नेय व ईशान्येकडून राहील. पावसाची शक्यता नाही.

कृषी सल्ला - 
१) बागायत गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरपूर्वी करावी. पेरणीस जस जसा उशीर होतो, तसा थंडीचा कालावधी कमी होतो आणि हेक्टरी उत्पादन कमी येते. त्यासाठी उशिरा पेरणी करावयाची झाल्यास हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरणे गरजेचे असते. उशिरा पेरणी केलेल्या गव्हास फुटवा कमी असतो.
२) रब्बी हंगामातील पिकांना वाढीच्या अवस्थेनुसार पाणी द्यावे.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी) 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: