Last Update:
 
ऍग्रो प्लस

पक्षांना पुरवा प्रथिने, ऊर्जायुक्त खाद्य
-
Friday, December 09, 2016 AT 06:00 AM (IST)
Tags: agro plus
पौष्टिक खाद्य पक्ष्यांना दिल्याने पक्ष्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल, तसेच शरीराची झीज भरून काढली जाईल. अंडी व मांस उत्पादनात वाढ होईल.
डॉ. सुधीर राजूरकर, डॉ. दीपिका वानखडे

ज्या खाद्यामध्ये पक्ष्यांच्या वयोमानाप्रमाणे सर्व अन्नघटक आवश्यकतेप्रमाणे योग्य प्रमाणात असतात, त्यामुळे पक्ष्यांच्या वाढीस व उत्पादनास योग्य चालना मिळते. त्यास समतोल आहार म्हणतात. समतोल आहार हा पक्ष्यांच्या वयानुसार बदलत असतो. त्यात प्रथिने व ऊर्जा यांचे प्रमाण कमी-जास्त होत असते. पक्ष्यांना दात नसतात, त्यामुळे पक्षी खाद्य चोचीने टिपतो आणि चक्कीद्वारे (गिझार्ड) पचवितो. 

- पक्ष्यांना पावडरमध्ये किंवा पावडरच्या रूपाने खाद्य न देता भरडलेले खाद्य द्यावे. पावडर स्वरूपात दिलेले खाद्य चोचीमध्ये चिकटते.
- पिलांच्या वयानुसार आहार देताना पक्ष्यांच्या खाद्यात प्रथिने, स्निग्धांश, कर्बोदके, ऊर्जा, फायबर, क्षार, जीवनसत्त्वे यांचे योग्य प्रमाण असणे आवश्यक आहे.
- खाद्यामध्ये शिंपल्याची पूड, फिश मिल, कॅल्शिअम, फॉस्फरस युक्त खाद्य घटक मिसळावेत, त्यामुळे अंड्यांचे कवच टणक होते .
- खाद्याला बुरशी लागू नये म्हणून फीडरमधील खाद्य दिवसातून एक-दोन वेळा हलवावे.
- फीडर हे अर्धा किंवा एक तृतीयांशपेक्षा जास्त भरू नये, त्यामुळे खाद्याची नासाडी टाळता येईल.
- पक्ष्यांना भरपूर प्रमाणात शुद्ध पाणी व खाद्य द्यावे, त्यामुळे पक्ष्यांच्या वाढीस योग्य चालना मिळेल. पक्ष्यांची वाढ व्यवस्थित होते, तसेच नैसर्गिक क्रिया चालू ठेवण्यासाठी त्यांना शक्ती मिळते.संपर्क - डॉ. सुधीर राजूरकर, ९४२२१७५७९३.
(अाैषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)
 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: