Last Update:
 
ऍग्रो प्लस

आठवड्यात हवामान स्थिर राहील
-
Saturday, December 17, 2016 AT 05:45 AM (IST)
Tags: agro plus
महाराष्ट्रावर मुंबईपासून उत्तरेस व पूर्वेस १०१२ हेप्टापास्कल तर उत्तर कोकणावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे, तसेच अरबी समुद्राचे दक्षिण भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. मध्यभारतावरही १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार आहे. हिंदी महासागरातील श्रीलंकेच्या पश्‍चिमी भागात समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान वाढून ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्य आहे. ही सर्व हवामान स्थिती अवकाळी आणि अवेळी पावसासाठी अनकूल बनत आहे. डिसेंबर महिन्याचे तिसऱ्या आठवड्यातील ही हवामान स्थिती चिंताजनक असून, या आठवड्यात अत्यंत थंड तापमानाऐवजी कमाल व किमान तापमानात किंचित वाढ होणे शक्य असून विदर्भात ते १.६ ते ३ अंश सेल्सिअसने अधिक राहणे शक्य आहे. मात्र या आठवड्यात फार मोठे हवामान बदल नाहीत. हवामानबदलाबाबत कोणताही मोठा इशारा नाही. तथापि, अरबी समुद्रातील दक्षिणी भागातील पश्‍चिम किनारपट्टीलगत चक्राकार वारे वाहत असून, त्या ठिकाणी चक्रीयवादळाची निर्मिती अपेक्षित आहे. ते निर्माण झाल्यास बेंगलोरपासून ते उत्तरेकडे सरकल्यास गोवा, महाराष्ट्रात व कर्नाटकात हवामान बदल शक्य आहेत. तसेच हिंदी महासागराचे ५० ते ८० रेखांशामधील व ४ ते १० अक्षांशामधील पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३०२ ते ३०३ केलव्हीन्सपर्यंत वाढण्यामुळे अवकाळी आणि अवेळी पावसाची शक्यता आहे. मात्र हे हवामानबदल या आठवड्यात होण्याची शक्यता कमी असून, भावी काळात ते निश्‍चित परिणाम करतील, अशी सध्याची हवामान स्थिती आहे. विदर्भात काही प्रमाणात हवामान ढगाळ राहणे शक्य असून, उर्वरित महाराष्ट्रात हवामान स्थिर राहून आकाश निरभ्र राहील.

कोकण -
दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ होईल आणि ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ५२ टक्के राहील, तर उर्वरित सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ६० ते ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ३२ टक्के, रायगड जिल्ह्यात ४१ टक्के, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५१ ते ५४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ठाणे व रायगड जिल्ह्यांत ६ ते ९ टक्के राहील, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ११ ते १२ टक्के राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. कमाल व किमान तापमान विचारात घेता आंबामोहर चांगला निघण्यास अनुकूल राहील. मात्र सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण लक्षात घेता हवामान कोरडे राहील. या आठवड्यात कोकणात पावसाची शक्यता नाही.

उत्तर महाराष्ट्र -
उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान नंदुरबार जिल्‍यात ३० अंश सेल्सिअस राहील. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३२ ते ३३ टक्के राहील, तर नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून राहील, त्यामुळे थंडीत फारशी वाढ या आठवड्यात होणार नाही. हवामान कोरडे राहील. या आठवड्यातील हवामान रब्बी पिकांना उत्तम राहील.

मराठवाडा - 
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित जिल्ह्यात ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील तर लातूर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली जिल्ह्यात हवामान थंड राहील कारण त्या जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. परभणी जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. तर जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जालना जिल्ह्यात ३८ टक्के, औरंगाबाद जिल्ह्यात ४० टक्के, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत ४२ टक्के तर उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात ४३ ते ४५ टक्के राहील. बीड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात ३० ते ३२ टक्के राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत २५ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यात २८ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद जिल्ह्यात ११ किलोमीटर तर उर्वरित जिल्ह्यात ताशी ४ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून आणि ईशान्येकडून राहील. पावसाची शक्यता नाही.

पश्‍चिम विदर्भ - 
पश्‍चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील तर वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यांत ११ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात १३ ते १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा जिल्ह्यात केवळ ३० टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यात ५६ ते ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात ३५ टक्के तर अमरावती व अकोला जिल्ह्यात ३४ ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ४ किलोमीटर राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ४ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्यता असून, हवामान रब्बी पिकांना उत्तम असेल.

मध्य विदर्भ - 
वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत किमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस रपाहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात १० अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे हवामान थंड राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ५८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३२ टक्के राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ - 
पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १० ते १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ४ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्यता नाही.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र - 
सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित जिल्ह्यात ३१ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर व पुणे जिल्ह्यांत १२ ते १३ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित जिल्ह्यात किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सोलापूर जिल्ह्यात ४५ टक्के, नगर जिल्ह्यात ४८ टक्के, सांगली जिल्ह्यात ४९ टक्के तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नगर जिल्ह्यात ३१ टक्के, सोलापूर जिल्ह्यात ३६ टक्के तर उर्वरित जिल्ह्यात ३८ ते ४३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्यता नाही.

कृषी सल्ला - 
१) कोकणात उन्हाळी भुईमूग पेरणीसाठी जमीन तयार करावी. कोकण गौरव ही उन्हाळी भुईमुगाची जात निवडावी.
२) काढणीस आलेली तूर कापून घेऊन उन्हात वाळवून झोडणी करून, उफणणी करून साठवण करावी.
३) जानेवारी महिन्यात लागवड करावयाच्या भाजीपाला पिकांसाठी जमीन तयार करावी. उन्हाळी हंगमात भेंडी, गवार, दोडका ही पिके उत्तम येतात.
४) उन्हाळी हंगामात हिरवा चारा उत्पादनासाठी मका अफ्रिकन टॉल जातीची निवड करावी. जमीन तयार करून पेरणी करावी. 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: