Last Update:
 
ऍग्रो प्लस

कुक्कुटपालनात हवामानानुसार करा बदल
-
Thursday, December 29, 2016 AT 05:45 AM (IST)
Tags: agro plus
कुक्कुटपालनात हवामानानुसार व्यवस्थापनात बदल करणे गरजेचे असते. हिवाळ्यात कोंबड्यांच्या शेडमधील वातावरण उबदार ठेवावे. कोंबड्यांना व पिल्लांना जास्त ऊर्जायुक्त खाद्य पुरवून त्याचे अारोग्य सुदृढ ठेवावे.
डॉ. बी. के. घुले, एस. जी. मुंढे, आर. व्ही. दौड,

- कोंबड्यांना इतर पक्षांच्या तुलनेत अधिक तापमानाची गरज असते. कोंबडी जेव्हा अंडी उबवते, त्या वेळी तापमानाची सरासरी ही ३५ टक्केपेक्षा अधिक असते.
- अंडे फुटल्यानंतर पिल्लू ज्या वेळी बाहेर येते ती वेळ आणि त्यानंतरच्या काही तासापर्यंत पिल्लांना ३४ अंश सेल्सिअस तापमान लागते. पिलाचे वय एक-एक आठवड्याने वाढते. त्याप्रमाणे प्रत्येक आठवड्यास त्यास लागणाऱ्या सुयोग्य तापमानाची पातळी दोन-दोन अंश सेल्सिअसने कमी होते.
- पिलाचे ३०० ग्रॅम वजन झाल्यानंतर तापमानही १३ अंश सेल्सिअसपेक्षा कमी लागते. या शास्त्रीय कारणामुळे शेडमध्ये पिले असताना अधिक प्रमाणात विद्युत दिवे लावून उष्णता निर्माण केली जाते. जसे जसे पिलांची वाढ होत जाईल तशी दिव्यांची संख्या देखील कमी केली जाते.
- जर वातावरणात जास्त प्रमाणात थंडी असेल तर हिटिंग काॅईल वापरले जातात. यातून सूक्ष्म वातावरणीय बदल कृत्रिमरीत्या घडवून आणतात. त्यासाठी शेडचा दरवाडा छोट्या अाकाराचा ठेवणे तसेच शेडच्या खिडक्यांना गोनपाटाने झाकणे इ. उपाययोजना केल्या जातात.
- हिवाळ्यात शेडमधील वातावरण सुयोग्य ठेवण्यासाठी सापेक्ष आर्द्रतेचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे. कारण इतर प्राण्यांपेक्षा कुक्कुटपालनास कोरडे हवामान चांगले मानवते. यामुळे शेडमधील सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के असावी.
- कोंबड्यामध्ये वातावरणाशी जुळवून घेण्याची प्रादेशिक हवामानाशी समरूप होण्याची क्षमता जास्त असते. काही जाती या बदलत्या हवामानाला अधिक प्रमाणात जुळून घेणाऱ्या असतात. तर काही जाती अल्प प्रमाणात स्थानिक वातावरणाशी एकरूप होतात.
- कोंबडी पालनामध्ये मांस व अंडी उत्पादनामध्ये चांगली प्रत निर्माण करण्यासाठी त्यांच्या आकाराचे व्यवस्थापन वातावरणाशी सुसंगत करणे क्रमप्राप्त ठरते.
- उष्ण प्रदेशातील कोंबड्यांना फाऊल कॉलरा रोग हा जास्त प्रमाणात होतो. या रोगाचे जिवाणू १६.६ अंश सेल्सिअस तापमानात सलग दोन वर्षे जगतात. या रोगाची लागण झाल्यामुळे ६० टक्क्यांपर्यंत मरतूक होण्याची शक्यता असते. या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. कोंदट ठिकाणी या रोगाची जास्त प्रमाणात लागण होते.
- कॉक्सिडिऑसिस हा रोग प्रामुख्याने लिटरमधील अोलसरपणा वाढल्यामुळे होतो. त्यामुळे वेळच्या वेळी कोंबड्यांची गादी हलवणे किंवा बदलणे गरजेचे असते.

संपर्क - डॉ. बी. के. घुले, ९८६०७०५१५०
(साै. केशरकाकू कृषी महाविद्यालय, बीड) 


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: