Last Update:
 
मुख्य पान

मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट
-
Sunday, January 08, 2017 AT 01:00 AM (IST)
Tags: agro,  temperature,  cold,  maharashtra
नाशिक ७.३ अंशांवर

पुणे (प्रतिनिधी) ः काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर भारतातील तापमानात घट झाली अाहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली अाहे. नाशिकमध्ये शनिवारी (ता. ७) राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. या ठिकाणी ७.३ अंश सेल्सिअश तापमान नोंदविले गेले अाहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली अाहे.

मध्य महाराष्ट्रासह कर्नाटकच्या उत्तर भागांत थंडीचा कडाका वाढला अाहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली अाहे. तर कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली अाहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास अाहे. ७ ते ११ जानेवारीदरम्यान संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता अाहे. नाशिक पाठोपाठ जळगावमध्ये ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अाहे.

शनिवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः पुणे ७.८, लोहगाव ९.९, पाषाण ८.५, सांताक्रूझ १५.९, रत्नागिरी १७.५, डहाणू १६.६, जळगाव ८.०, कोल्हापूर १२.१, महाबळेश्वर १२.६, मालेगाव ९.०, नाशिक ७.३, सांगली १०.५, सातारा ८.५, सोलापूर ११.३, औरंगाबाद ११.१, परभणी ११.३, अकोला ११.८, अमरावती ९.६, चंद्रपूर १४.०, नागपूर १०.७, वाशीम १२.२.


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: