Last Update:
 
ऍग्रो प्लस

वय, वातावरणानुसार बदलते कोंबड्यांतील खाद्याची गरज
-
Tuesday, January 10, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: agro plus
कोंबड्यांच्या जातीनुसार त्यांच्या खाद्याच्या गरजा बदलतात. त्यामुळे आवश्‍यकतेनुसारच खाद्य द्यावे. खाद्य देताना नेहमी वातावरणाचा व कोंबड्यांच्या वयाचा विचार करावा.
डॉ. सतीश मनवर

कोंबड्यांच्या अंडी देण्याचा काळ हा त्यांच्या वयाच्या विसाव्या आठवड्यापासून धरला जातो. सुरवातीच्या काळात अंडी उत्पादन वाढत असल्यामुळे त्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढत जाते. अंड्यांचे उत्पादन आणि त्याचे योग्य वजन वयाच्या २४ व्या आठवड्यात येते. या काळात कोंबड्यांची कॅल्शिअमची गरज वाढलेली असते. 

वयाच्या २० ते ४० आठवड्यांमध्ये कोंबड्यांना योग्य प्रमाणात खाद्य घटक द्यावेत. ४० व्या आठवड्यानंतर प्रथिने थोड्या कमी प्रमाणात दिली तरी चालतात.
ब्रॉयलर कोंबड्यांसाठी खाद्यपुरवठा - 
वातावरणातील बदलानुसार कोंबड्यांच्या खाद्यामध्ये बदल करावेत.
खाद्याचे स्रोत - 
१) तयार खाद्य - कंपन्यांचे तयार खाद्य घेऊन कोंबड्यांना द्यावे.
२) संहित खाद्य (कॉन्सन्ट्रेट) - 
कंपन्यांकडून कॉन्सन्ट्रेट विकत घेऊन त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यात विविध खाद्य घटक मिसळून खाद्य तयार करावे.
३) खाद्य स्वतः तयार करणे - 
- कोंबड्यांची गरज लक्षात घेऊन वेगवेगळ्या घटकांपासून कारखान्यामध्ये खाद्य तयार करून द्यावे. खाद्य हे तीन प्रकारचे असते. त्यामध्ये मॅश म्हणजे बारीक दळलेले खाद्य, क्रंब म्हणजे गोळ्या करून नंतर फोडलेले खाद्य आणि पेलेट म्हणजे खाद्याच्या गोळ्या बनविलेले खाद्य होय.
- कोंबड्यांच्या शरीराचा योग्यविकास होण्यासाठी चांगला आहार देणे गरजेचे आहे. अंडी अाणि चिकन यावरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी तक्त्यात दिल्याप्रमाणे घरच्या घरी खाद्य मिश्रण तयार करून कंपन्यांचे तयार खाद्य विकत घेण्यावर होणारा खर्च कमी करता येऊ शकतो.

डॉ. सतीश मनवर, ९७३०२८३२१२
(स्नातकोत्तर पदव्युत्तर व पशुविज्ञान संस्था, अकोला) 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: