Last Update:
 
मुख्य पान

विदर्भात शुक्रवारी अवकाळीची शक्यता
-
Tuesday, January 10, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: pune,   maharashtra,   weather
पुणे - राज्यात पुढील दोन ते तीन दिवस थंडीची तीव्रता कायम राहणार आहे. तसेच, गुरुवारपर्यंत (ता. १२) गोव्यासह, संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, अंदमान निकोबारनजीक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शुक्रवारी (ता. १३) मात्र दक्षिण विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील नगरमध्ये सोमवारी (ता. ९) ६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

गेल्‍या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील नगरपाठोपाठ साताऱ्यामध्ये ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुणे, जळगाव, नाशिक, सांगली या प्रमुख शहराचे तापमान दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर येथील तापमान पाच अंशांच्या खाली होते. तर पंजाब, हरियाना, चंडिगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानचा पश्चिम भाग, बंगाल, आसाम, मेघालय, नागालॅंड, मणीपूर, मिझोराम, त्रिपुरा येथील किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली होते. अनेक भागांत धुके पडले होते, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात किमान तापमानातील तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १०.८, नगर ६.९ (-५), जळगाव १०.० (-२), कोल्हापूर १३.४ (-१), महाबळेश्वर १२.० (-१), मालेगाव १२.२ (१), नाशिक १०.३, सांगली १०.६, सातारा ८.८ (-४), सोलापूर १३.७ (-२), सांताक्रूझ १६.८, अलिबाग १८.८ (-१), रत्नागिरी १७.० (-२), डहाणू १७.८ (१), भिरा १६.०, अौरंगाबाद ११.०, परभणी १३.१ (-१), अकोला १३.० (-१), अमरावती १४.०, बुलडाणा १३.४ (-१), चंद्रपूर १५.० (१), गोंदिया १४.५ (२), नागपूर १४.३ (१), वर्धा १५.० (२), यवतमाळ १६.४ (१) 


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: