Last Update:
 
मुख्य पान

शबरी घरकुल याेजनेच्या अनुदानात वाढ
-
Tuesday, January 10, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: pune,   maharahstra,   shabri
पुणे - अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांसाठी शबरी आदिवासी घरकुल याेजनेच्या अनुदानात ३० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

नव्या निर्णयामुळे पात्र लाभार्थ्याला एक लाख रुपये अनुदान मिळणार असून, ज्या लाभार्थ्यांना पूर्वी घरकुल मंजूर आहे आणि पहिला हप्ता २०१६-१७ या आर्थिक वर्षांत मिळणार आहे, असे लाभार्थी वाढीव अनुदानासाठी पात्र असतील. शहरी भागात या याेजनेतील लाभार्थ्याला अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

शबरी आदिवासी घरकुल याेजनेअंतर्गत ग्रामीण भागाकरिता प्रतिघरकुल (शाैचालय बांधकामासह) अनुदान साधारण १ लाख ३२ हजार रुपये, तर नक्षलग्रस्त व डाेंगराळ भागासाठी १ लाख ४२ हजार असणार आहे. शाैचालय बांधकामासाठीचे १२ हजार रुपये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने करावयाची असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.

शबरी आदिवासी घरकुल याेजनेसाठी शहरी भागातील वैयक्तीक लाभार्थ्यांकरिता प्रधानमंत्री घरकुल (आवास) याेजनेप्रमाणे लाभाची रक्कम व लाभार्थ्यांच्या पात्रतेमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या बदलानुसार वार्षिक उत्पन्न ३ लाखांपर्यंत असलेल्या लाभार्थ्याला घरकुल बांधकामासाठी अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे. 


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: