Last Update:
 
ऍग्रो प्लस

प्रक्रियेतून वाढवा चाऱ्याची पाैष्टिकता
-
Tuesday, January 10, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: agro plus
जनावरांना त्याच्या वजनाच्या २ ते २.५ टक्के वाळलेला चारा, ४ ते ६ टक्के हिरवा चारा, तर २ ते २.५ किलो पशुखाद्य दर दिवसाला लागते. धान्यापासून मिळालेल्या शिल्लक चुरी, कोंडा, साल यावर प्रक्रिया करून घरच्या घरी दर्जेदार पशुखाद्य बनवता येते.
गजानन इढोळे

१. युरोमील - 
- जनावरांकरिता युरिया, मळी व गव्हाचा कोंडा विशिष्ट प्रमाणात वापरून तयार केलेल्या रुचकर खाद्याला युरोमील म्हणतात.
- युरोमील तयार करण्याकरिता ४ किलो युरिया, १२ किलो उसाची मळी किंवा गुळाचे १० लिटर पाण्यात द्रावण तयार करावे.
- हे द्रावण १०० डिग्री तापमानावर ३० मिनिटे उकळून १६ किलो गव्हाच्या कोंड्यामध्ये मिसळावे.
- हे मिश्रण अन्नघटक म्हणून इतर खाद्य घटकासोबत मिसळून वापरावे किंवा समप्रमाणातच कडधान्याच्या भरड्यासोबत वापरावे.

२. गव्हाचा भुसा/गव्हंडा व कुटार या घटकांचा वापर करून खाद्य तयार करणे- 
- युरिया, उसाची मळी, गव्हाचा कोंडा व मीठ वापरून गव्हाच्या कोंड्याची उपयुक्तता वाढवणे शक्य होते.
- २ किलो युरिया, १० किलो उसाची मळी अथवा गूळ व २ किलो मीठ यांचे ४० लिटर पाण्यात द्रावण तयार करावे.
- १०० किलो गव्हांडा ताडपत्रीवर किंवा फरशीवर पसरवून त्यावर द्रावण सर्वदूर शिंपडावे. यामध्ये १ किलो खनिज द्रव्ये व १ किलो व्हिटॅमिन ए मिसळावे.
हे मिश्रण एकत्र करून वाळवून २८ दिवस ठेवून नंतर वापरावे.

३. चाटण अथवा द्रव्यरूप खाद्य - 
- युरिया, क्षार, मळी, मीठ व जीवनसत्त्वे यांचे मिश्रण तयार करून चाटण तयार केले जाते.
- २.५ लिटर पाण्यामध्ये २.५ किलो युरिया व २.५ किलो मिठाचे द्रावण तयार करावे. हे द्रावण ९२ किलो मळी अथवा गुळाच्या घट्ट द्रावणात मिसळावे, तसेच यामध्ये १५ ते २० ग्रॅम जीवनसत्त्व अ व ड मिसळावे. असे द्रावण चाटण म्हणून वापरावे.

४. घरगुती पशुखाद्य बनविण्याची पद्धत - 
घरगुती पद्धतीने डाळी व इतर धान्यापासून मिळालेल्या शिल्लक चुरी, कोंडा, सालापासून उत्तम प्रकारचे पशुखाद्य तयार करू शकतो.
याकरिता खालील प्रमाणात खाद्य तयार करावे.
भरडलेले धान्य - ३० टक्के
धान्याचा कोंडा - ३५ टक्के
कोरडी पेंड - १५ टक्के
तेलयुक्त पेंड - १२ टक्के
गूळ - २ टक्के
क्षार मिश्रणे - २.५ टक्के
व्हिटॅमिन - २ टक्के
मीठ - १.५ टक्के
वरील खाद्याचे मिश्रण तयार करून जनावरांस २ ते ३ किलो प्रति दिन या प्रमाणात जनावरांच्या वयाप्रमाणे कमी-अधिक प्रमाणात द्यावे.

खनिज पदार्थांची आवश्यकता - 
शरीरातील तंतू, पेशींची वाढ, स्नायू व हाडांना टणकपणा येण्यासाठी व शरीर पोषणासाठी खनिज पदार्थांची आवश्यकता असते. ती शरीरात विविध प्रकारे शोधली जातात.
खनिज पदार्थांचे नाव - एक हजार ग्रॅमसाठी प्रमाण
१) निर्जंतुक हाडाची पूड - ३०० ग्रॅम
२) चुन्याची भुकटी - १०० ग्रॅम
३) मीठ - १८० ग्रॅम
४) सोडियम कार्बोनेट - १२ ग्रॅम
५) स्टार्च - ०८ ग्रॅम
६) पोटॅशिअम आयोडाइड - १२० ग्रॅम
७) कॅल्शिअम फॉस्फेट - १०० ग्रॅम
८) सोडिअम बायसल्फेट - १०० ग्रॅम

संपर्क - गजानन इढोळे, ८८८८७५९७६४.
(कृषी तंत्र विद्यालय, नांदेड)

 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: