Last Update:
 
मुख्य पान

प्रत्येक जिल्ह्यात पंचायत संसाधन केंद्र स्थापन होणार
-
Tuesday, January 10, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: pune,   maharashtra,   panchayat
पुणे - पंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘जिल्हा पंचायत संसाधन केंद्र’ स्थापन करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संसाधन केंद्र स्थापनेसाठी ग्रामविकास विभागाने समितीची स्थापना केली आहे. समितीने आपला अहवाल सहा महिन्यांत शासनाला सादर करण्याच्या सूचना समितीला देण्यात आल्या आहेत.

राज्यात विविध भागांत पंचायतराज व्यवस्थेचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विखुरलेल्या आहेत. यामध्ये ६ शासकीय ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, ३ अशासकीय ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, ११ पंचायतराज प्रशिक्षण केंद्रे आहेत. या केंद्रांचा आढावा घेऊन प्रत्येक जिल्ह्यात पंचायत संसाधन केंद्र उभारण्याच्या केंद्राच्या सूचना आहेत. यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केंद्र उभारणीसाठी यशदाच्या राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संचालक अजय सावरीकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती ग्रामविकास विभागाने स्थापन केली आहे.

या समितीने सध्याच्या प्रशिक्षण संस्थाच्या शासकीय, खासगी जागा, प्रशिक्षण संस्थांचे पंचायत संसाधन केंद्रात रूपांतर करताना कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सेवांबाबतचे प्रश्‍न, एका जिल्ह्यात दाेन केंद्रे असतील तर ती काेणत्या जिल्ह्यात स्थलांतर करता येईल. याबाबतचा सविस्तर अहवाल सहा महिन्यांत सादर करण्याच्या सूचना शासनाने समितीला केल्या आहेत.

समितीमध्ये ग्रामविकास विभागाचे सचिव गि. दि. भालेराव, मांजरीच्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य संध्या जगताप, बुलडाणा केंद्राचे प्राचार्य अशाेक राऊत, गारगाेटी (काेल्हापूर) केंद्राचे प्राचार्य चंद्रकांत माेरे, यशदामधील राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संशाेधन अधिकारी शिवशंकर भारसाखळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: