Last Update:
 
ऍग्रो प्लस

शेळीपालन करताना शास्त्रीय दृष्टिकोन ठेवण्याची गरज
-
Wednesday, January 11, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: agro plus
शेळीपालन मुख्य व्यवसाय म्हणून करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. परंतु, यशस्वी शेळीपालन व्यवसायासाठी आवश्यक तेवढी जागरूकता व शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. शेळीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी कष्ट आणि जिद्दीबरोबर जर शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड मिळाली, तर या व्यवसायामध्ये नक्की यश मिळू शकते. शेळीपालकांना शास्त्रीय दृष्टिकोनाची जाणीव देण्याच्या हेतूने फायदेशीर शेळीपालनासाठी... मालिका अाजपासून दर बुधवारी देत अाहोत.
डॉ. तेजस शेंडे

- बोकडाच्या मटणाचे चढते भाव अाणि जास्त मागणीमुळे शेतीपूरक व्यवसायामध्ये शेळीपालन व्यवसाय चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून अोळखला जातो, त्यामुळे या व्यवसायात उतरणाऱ्यांची संख्या खूप जास्त अाहे. परंतु, या व्यवसायात उतरण्याअाधी या व्यवसायातील व्यवस्थापनातील तांत्रिक बाबी, विक्री व्यवस्थापन (उदा. पैदाशीसाठी, इतर), प्रतिशेळी उत्पादन याबाबत माहिती असणे अनिवार्य आहे.
- व्यवसाय सुरू करताना नियोजनाचा अाभाव, दुर्लक्ष किंवा व्यवस्थापनातील त्रुटींमुळे होणारे नुकसान, झालेल्या चुका वेळीच न सुधारल्यामुळे किंवा त्याचे महत्त्व माहीत नसल्यामुळे बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त शेळीपालन यशस्वी होण्याचे प्रमाण कमी आहे.
- व्यवसायात साधारणतः कोणत्या चुका होतात व त्या होऊ नयेत किंवा वेळीच दुरुस्त करण्यासाठी लागणारी उपाययोजना याची माहिती करून घेतल्याने शेळीपालकांना त्यांच्या व्यवसायातील तोटा कमी करण्यासाठी फायदा होईल व यशस्वी शेळीपालनाच्या दृष्टीने वाटचाल होण्यास मदत होईल.
- शेळीपालकांनी कोणताही अाडपडदा न ठेवता एकत्र येऊन विक्री व्यवस्थापन व विविध अडचणींवर मात करण्यासाठी गट स्थापन केल्यास शेळीपालनातून आणखी चांगला फायदा मिळू शकेल. तसेच, नवीन व्यावसायिकांना योग्य मार्गदर्शन करूनही या व्यवसायाची व्यापकता वाढवता येईल.
- शेळीपालनातील यशस्वी वाटचालीमध्ये हातभार लावण्यासाठी शेळीपालकांना शास्त्रीय दृष्टिकोनाची जाण देण्याच्या हेतूने पुढील नमूद केलेल्या विषयांसोबतच इतर महत्त्वाच्या विषयांची विस्तृत स्वरूपात माहिती देण्याचा प्रयत्न असणार आहे. 

१) शेळीपालनातील सध्याच्या अडचणी
२) यशस्वी शेळीपालनासाठी विक्री व्यवस्थापनाचे महत्त्व
३) शेळीपालनात शेळ्यांच्या निवडीचे व आनुवंशिकतेचे महत्त्व
४) शेळ्यांच्या पैदाशीमधील विविध तंत्रे व त्यांचे महत्त्व
५) गोठ्यातील शेळ्यांमध्ये रोग व इतर अडचणी येऊच नयेत (प्रतिबंधात्मक उपाय) म्हणून घ्यावयाची काळजी.
६) करडांमधील मरतूक व त्यावरील उपाय
७) प्रौढ शेळ्यांमधील शारीरिक व्याधी व त्यावरील उपाय

संपर्क - डॉ. तेजस शेंडे, ०९९७०८३२१०५
(पशुअानुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा) 


 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: