Last Update:
 
मुख्य पान

विदर्भात तुरळक ठिकाणी पडला पाऊस
-
Wednesday, January 11, 2017 AT 06:00 AM (IST)
Tags: pune,   maharashtra,   rain
तापमानात चढ-उतार कायम

पुणे - राज्यातील थंडीत चढउतार होत आहे. मध्य महाराष्ट्रातील निफाडमध्ये मंगळवारी (ता. १०) ५.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तसेच अंदमान आणि निकोबारमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

गेल्‍या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील निफाडपाठोपाठ नाशिकमध्ये ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मालेगावमध्ये ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली; तर पुणे, नगर, जळगाव, या प्रमुख शहराचे तापमान दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. पहाटे थंडी, तर दुपारी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस थंडी राहणार असून येत्या शनिवारपर्यत (ता. १४) गोव्यासह, संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली येथील तापमान पाच अंशाच्या खाली होते. तर नागालॅन्ड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मध्य प्रदेश, आसाम, मेघालयासह, मध्य महाराष्ट्र येथील किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली होते. तर राजस्थानचा पश्चिम भाग, मध्य महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश आणि त्रिपुराच्या अनेक भागात धुके पडले होते, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात किमान तापमानातील तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ९.४ (-१), नगर ९.८, जळगाव ९.६ (-२), कोल्हापूर १४.८, महाबळेश्वर १४.८, मालेगाव ८.४ (-४), नाशिक ६.५ (-३), सांगली १३.६, सातारा ११.८ (-१), सोलापूर १४.१ (-१), सांताक्रूझ १३.४ (-४), अलिबाग १६.४ (-१), रत्नागिरी १७.१ (-२), डहाणू १४.८ (-२), भिरा १४.४ (-१), अौरंगाबाद १३.४ (२), परभणी १३.५, अकोला १४.५ (१), अमरावती ११.६ (-३), बुलडाणा १४.६ (१), चंद्रपूर १६.६ (२), गोंदिया ११.५ (-३), नागपूर १६.२ (३), वर्धा १५.०, यवतमाळ १३.४ (-१)





 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: