Last Update:
 
ऍग्रो गाईड
वैभव रासकर, कळवण, जि. नाशिक  अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी मध्यम ते भारी, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीची योग्य मशागत करून जमीन तयार करावी. लागवड जून-जुलै किंवा सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात करावी. भाजीच्या अळूसाठी मुक्ताकेशी, झांकारी या जाती निवडाव्यात. भाजीच्या अळूची लागवड 60 सें.मी. बाय 45 सें. मी. अंतरावर करावी. वडीच्या अळूसाठी कोकण हरितपर्णी या जातीची लागवड 90 सें.मी. बाय 90 सें.मी. अंतराने करावी.

Saturday, November 07, 2015 AT 06:30 AM (IST)

- सुरेश वळवी, पालघर    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे.  ही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे. एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे 25 किलो आणि मादीचे 21 किलो वजन भरते.

Saturday, November 07, 2015 AT 06:15 AM (IST)

कोकणामध्ये पावसाचा हंगाम संपल्यानंतर आंबा, काजू, नारळ फळ बागेचे व्यवस्थापन खऱ्या अर्थाने सुरू होते. पावसाळ्यानंतर थंडीच्या आगमनासोबतच फळपिकांमध्ये विशेषतः आंबा, काजू पिकांमध्ये फळधारणेसाठी आवश्‍यक असे बदल होण्यास सुरवात होते. या वर्षी कोकणामध्ये सरासरीपेक्षा 30 ते 40 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्याच प्रमाणे ऑक्‍टोबर महिन्याची अखेर आली असली तरी काही भागामध्ये अजूनही पावसाळी वातावरण आहे.

Sunday, November 01, 2015 AT 12:00 AM (IST)

1) सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतात तिन्ही प्रकारच्या बागा उभ्या आहेत. त्यात जुनी कांदेबाग, मृगबाग तसेच आताच नवीन लागवड करण्यात आलेली कांदेबाग. जुनी कांदेबाग काढणीच्या अवस्थेत आहे, तर मृगबाग ही मुख्य वाढीच्या अवस्थेत आहे, तर नुकतीच ऑक्‍टोबर महिन्यात लागवड केलेली कांदेबाग बाल्यावस्थेत आहे. 2) फळवाढीच्या व कापणीच्या अवस्थेत असणाऱ्या जुन्या कांदेबागेतील पक्व झालेल्या घडांची 25 ते 30 सें.मी. दांडा राखून कापणी करावी.

Sunday, November 01, 2015 AT 12:00 AM (IST)

- राकेश सिनारे, मेहेरगाव, जि. धुळे  1) ताटी पद्धतीमध्ये 6 फूट x 3 फुटांवर वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात. यासाठी रीजरच्या साह्याने सहा फूट अंतरावर सरी पाडावी. प्रत्येक 25 फूट अंतरावर आडवे पाट तयार करावेत. सऱ्यांच्या लांबीच्या दोन्ही टोकांना दहा फूट उंचीचे व चार इंच जाडीचे डांब शेताच्या बाहेरच्या बाजूला झुकतील या पद्धतीने दोन फूट जमिनीत गाडावेत. त्यांना दोन्ही बाजूंनी दहा गेजच्या तारेने ताण द्यावा.

Saturday, October 31, 2015 AT 06:15 AM (IST)

- एस. के. यादव, खेड, जि. रत्नागिरी  बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून, पाच ते सात मीटरपर्यंत वाढतो. पाने काहीशी हृदयाकृती, पानांच्या कडा काहीशा सरळ रेषेत ओल्या असतात. फळे एक इंच आकाराची असतात. बी काळ्या रंगाची असते. काजूप्रमाणे बिब्ब्याचे बोंड येते, ते पिकल्यानंतर पिवळे होते. बिब्ब्याला जुलै-ऑगस्टमध्ये फुले येण्यास सुरवात होते आणि परिपक्व फळे जानेवारी ते मार्च या कालावधीत मिळतात.  रंगाने गर्द - काळी फळे रोपनिर्मितीसाठी वापरावीत.

Saturday, October 31, 2015 AT 06:00 AM (IST)

- विकास मानकर, अंजनगावसुर्जी, जि. अमरावती  सोलर टनेल ड्रायरमध्ये आवळा कॅंडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला, सफेद मुसळी, पान पिंपळी, हळद, मिरची वाळविता येते. या यंत्राची वाळविण्याची क्षमता 100 किलो एवढी आहे. 1) सोलर टनेल ड्रायर अर्ध दंडगोलाकार, 3 x 6 मीटर आकाराचा आहे. याची उंची दोन मीटर आहे. 25 मि.मी. आकाराचे लोखंडी पाइप अर्धगोलाकार आकारात वाकवून सोलर टनेल ड्रायर तयार केला आहे. सोलर टनेल ड्रायर पूर्व-पश्‍चिम दिशेस बांधावा.

Saturday, October 31, 2015 AT 06:00 AM (IST)

- प्रकाश लोखंडे, परिते, जि. कोल्हापूर  उसाच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे वापर होण्यासाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे प्रयोग घेण्यात आले. त्यामध्ये पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने खते दिल्यास इतर पद्धतींपेक्षा अधिक ऊस उत्पादन व आर्थिक फायदा झाल्याचे दिसून आले.  1) या पद्धतीत खतमात्रा दोन समान हप्त्यांत द्यावी लागते.

Tuesday, October 27, 2015 AT 06:15 AM (IST)

- जयवंत मिसाळ, राहाता, जि. नगर  1) ऊसतोडणीनंतर 6 ते 12 तासांच्या आत उसाचे गाळप करावे अन्यथा चोथ्याचे प्रमाण वाढते, रसाची प्रत खालावते, रसाचा उताराही कमी मिळतो. गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.  2) ऊस गाळपासाठी आडव्या तीन लाट्यांचा, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने गिअर बॉक्‍स असलेल्या चरक्‍याची निवड करावी.  3) गुऱ्हाळासाठी चरक्‍याची गाळप क्षमता 65 ते 70 टक्केपर्यंत असावी.

Tuesday, October 27, 2015 AT 06:15 AM (IST)

- के. एस. जाधव, चिपळूण, जि. रत्नागिरी  काजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात. काजूप्रक्रिया उद्योग वर्षभर चालू राहण्याच्या दृष्टीने काजू बिया वाळवून योग्य प्रकारे साठवणे गरजेचे असते.

Tuesday, October 27, 2015 AT 03:30 AM (IST)

- एस. एच. कानवडे, चंदगड, जि. कोल्हापूर बांधकामाच्या रचनेवरून तरंगती गॅसटाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र, असे बायोगॅसचे प्रकार आहेत. तरंगत्या टाकीचा बायोगॅस चांगला चालतो पण त्यासाठी बराच खर्च येतो. संयंत्रावर तरंगणारी लोखंडी टाकी गंजल्यास किंवा काही कारणांनी निकामी झाल्यास ती दुरुस्त करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी बराच खर्च येतो. सध्या महाराष्ट्रात स्थिर घुमट संयंत्र प्रकारातील दीनबंधू बायोगॅस बांधले जातात.

Monday, October 19, 2015 AT 06:15 AM (IST)

- राजेंद्र सावंत, तांदूळवाडी, जि. नगर - हरितगृहासाठी बाहेरून आणलेली माती लाल रंगाची, पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणारी असावी. - शक्‍यतो ही माती माळरानावरील कोणतेही पीक न घेतलेली असल्यास चांगली असते. - मातीचा सामू 5.5 ते 6.5 आणि विद्युतवाहकता (ईसी) 0.5 ते एक असावी. - मातीची सूत्रकृमींसाठी तपासणी करून घ्यावी.

Monday, October 19, 2015 AT 06:00 AM (IST)

चांगल्या प्रतीचा बेदाणा हा बागेमध्येच तयार होतो. फळकाढणी झाल्यानंतर जी काही प्रक्रिया आपण करतो त्यावरसुद्धा चांगली प्रत अवलंबून असते. ऑक्‍टोबर महिन्यात फळछाटणीचा हंगाम सुरू होतो. त्यानंतर फळछाटणी झाली, की बागेत द्राक्षघडांच्या संगोपनाकरिता व्यवस्थापन केले जाते. दर्जेदार बेदाण्यासाठी सुरवातीपासूनच द्राक्षबागेचे संगोपन महत्त्वाचे असते.

Sunday, October 18, 2015 AT 12:00 AM (IST)

पडलेल्या पावसावर रब्बी ज्वारी अधिक करडई, तसेच जवस अधिक करडई, हरभरा अधिक करडई, हरभरा अधिक सूर्यफूल, हरभरा अधिक मोहरी, सूर्यफूल अधिक करडई ही आंतरपीक पद्धती घेतल्यास फायदेशीर राहील. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावा. रब्बी हंगामात लागवडीचे नियोजन करताना नत्र स्थिरीकरणासाठी हरभरा पिकाचा समावेश आंतरपीक पद्धतीत करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक, जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.

Sunday, October 18, 2015 AT 12:00 AM (IST)

बाजारात बेदाण्याला चांगला दर मिळत असल्यामुळे बेदाणा निर्मितीसदेखील चांगला वाव आहे. या लेखामध्ये दर्जेदार बेदाणानिर्मितीसाठी बागेचे व्यवस्थापन कसे असावे याबद्दलची माहिती आपण घेत आहोत. द्राक्षबागेत एप्रिल महिन्यात खरड छाटणी झाल्यानंतर द्राक्षबागेत नवीन फुटी निघतात. या फुटींची योग्य ती वाढ होण्याकरिता आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात येतात. त्यानंतर वेलीवर तयार झालेल्या काडीमध्ये घडनिर्मिती झाली, काडी परिपक्व झाली.

Sunday, October 18, 2015 AT 12:00 AM (IST)

खरीप हंगामात लागवड केलेल्या भात पिकामध्ये सद्यःस्थितीत जातिनिहाय वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी या परिस्थितीत योग्य पक्वतेच्या अवस्थेत कापणीचे नियोजन करावे. हळव्या जाती सध्या कापणीसाठी तयार आहेत, तर निमगरव्या भात जाती पक्व होत आहेत आणि गरव्या जाती निसवल्या असून, फुलोरा ते दाणे भरण्याच्या (दुधाळ) अवस्थेत आहेत. या अवस्थेत खालीलप्रमाणे पिकाची काळजी घ्यावी.

Sunday, October 18, 2015 AT 12:00 AM (IST)

- के. एस. परब, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग  1) काळी मिरीची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर उत्पन्न सुरू होते. मे-जून महिन्यामध्ये तुरे येतात. तर साधारणपणे नऊ महिन्यांनंतर जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घोस काढण्यासाठी तयार होतात. काढणी करताना योग्य तऱ्हेने काळजी न घेतल्यास मिरीच्या प्रतीवर परिणाम होतो. दाण्यांना आकर्षक रंग येत नाही व साहजिकच बाजारात दर कमी मिळतो. मिरीच्या दाण्याचा रंग हा हिरवा असतो.

Friday, October 16, 2015 AT 06:15 AM (IST)

- जयंत निघोजे, नेवासा, जि. नगर  परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म समजून घेतल्यानंतर त्यानुसार आवश्‍यक असणाऱ्या सेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खतांचा पुरवठा एकात्मिक पद्धतीने जमिनीत केल्यास जमिनीचे आरोग्य टिकविण्याबरोबर पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळू शकते.  नमुना घेण्याची पद्धत -  1) मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा.ः फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत.

Friday, October 16, 2015 AT 06:00 AM (IST)

- महेश काळे, सांगोला, जि. सोलापूर  1) लसूण लागवडीसाठी मध्यम प्रतीची, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून हेक्‍टरी 20 टन शेणखत मिसळावे.  2) लागवडीसाठी गोदावरी, श्‍वेता, यमुना सफेद, ऍग्रिफाउंड व्हाइट, फुले बसवंत या जातींची निवड करावी.  3) लागवड ऑक्‍टोबर - नोव्हेंबर महिन्यांत 15 x 10 सें.मी. अंतराने करावी. लागवडीसाठी सहा क्विंटल बियाणे प्रति हेक्‍टरी लागते. लागवडीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2.

Thursday, October 15, 2015 AT 06:00 AM (IST)

- प्रकाश गुरव, वर्धा  सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कॅंडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो. या यंत्राची वाळवण्याची क्षमता 100 किलो एवढी आहे.  1) सोलर टनेल ड्रायर अर्ध दंडगोलाकार, 3 x 6 मीटर आकाराचा आहे. याची उंची दोन मीटर आहे.  2) 25 मि.मी. आकाराचे लोखंडी पाइप अर्धगोलाकार आकारात वाकवून सोलर टनेल ड्रायर तयार केला आहे.

Thursday, October 15, 2015 AT 03:00 AM (IST)

- जयेश जाधव, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग नारळ, सुपारीच्या योग्य अंतरावरील बागेमध्ये वेलदोड्याची यशस्वी लागवड करता येईल, लागवडीसाठी म्हैसूर, मलबार, वाझुक्का या जाती लागवडीसाठी निवडाव्यात. वेलदोड्याची अभिवृद्धी झाडाच्या बुंध्याजवळ आलेले नवीन कोंब, तसेच बिया लावून करतात. झाडाच्या बुंध्याजवळचे कोंब मुख्य झाडापासून अलगद बाजूला करावे. त्यांना एखाद-दुसरे मूळ, तसेच खोडाचा भाग राहील याची काळजी घ्यावी.

Thursday, October 15, 2015 AT 02:15 AM (IST)

- यशवंत करंडे, चिपळूण, जि. रत्नागिरी  1) साग लागवडीसाठी थोडीफार चढ-उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. खडकाळ किंवा मुरमाड जमिनीत साग चांगल्या प्रकारे वाढतो. उथळ, निचरा न होणारी, फार दलदलीची जमीन साग लागवडीस अयोग्य आहे.  2) सागाचे बियाणे पेरून, रोपांची लागवड करून किंवा खोडमूळ (स्टंप) लावून लागवड करता येते.

Monday, October 12, 2015 AT 06:00 AM (IST)

- जयेश शेवडे, नांदगाव, जि. नाशिक  डाळिंब लागवडीसाठी हलकी ते मध्यम, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीसाठी गणेश, जी-137, मृदुला, फुले आरक्ता, भगवा, भगवा सुपर या जाती निवडाव्यात. सरकारमान्य रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतूनच कलमे खरेदी करावीत. माती परीक्षण अहवालानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन करावे. लागवडीचे अंतर 4.5 x 3 मीटर ठेवावे.

Monday, October 12, 2015 AT 05:45 AM (IST)

- जी. एस. तावडे, खेड, जि. रत्नागिरी  1) खड्डा पद्धतीने गांडूळ खत तयार करताना साधारणपणे 2.5 ते 3 मीटर लांबीचे आणि 90 सें. मी. रुंदीचे सेंद्रिय पदार्थांचे ढीग तयार करावेत. 2) प्रथम जमिनीवर पाणी शिंपडून जमीन ओली करावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा तीन ते पाच सें. मी. जाडीचा थर करावा. त्यावर पुरेसे पाणी शिंपडावे. या थरावर तीन ते पाच सें. मी. जाडीचा चांगला कुजलेल्या शेणाचा थर द्यावा.

Monday, October 12, 2015 AT 04:45 AM (IST)

ऑक्‍टोबर महिन्यात शेंगवर्गीय भाज्यांच्या सुधारित जातींची लागवड करावी. पेरणीपूर्व बीज प्रक्रियेकडे लक्ष दिल्यास उत्पादनामध्ये वाढ मिळण्यास मदत होते. चवळी - सुधारित जाती ः पुसा दो-फसली, अर्का गरिमा, पुसा कोमल, पुसा फाल्गुनी, पुसा बरसाती. - लागवड ः चवळी पिकाची लागवड ऑक्‍टोबर महिन्यात करावी. चवळी पिकाची लागवड करताना दोन ओळींतील अंतर 45 ते 60 सें.मी. व दोन रोपांतील अंतर 20 ते 30 सें.मी. ठेवावे. हेक्‍टरी 15 ते 20 किलो बियाणे पुरेसे आहे.

Sunday, October 11, 2015 AT 12:00 AM (IST)

जिरायती व बागायतीमध्ये दोन रोपांतील योग्य अंतरासह एकरी रोपांची संख्या ठेवण्यासाठी बियाणांची काळजीपूर्वक पेरणी सुधारित टोकण यंत्रे उपयुक्त ठरतात. पिकाच्या अपेक्षित उत्पादनासाठी शास्त्रज्ञांनी केलेल्या शिफारशीनुसार हेक्‍टरी रोपांची संख्या असणे आवश्‍यक असते. पारंपरिक पेरणीमध्ये शेतकरी आवश्‍यकतेपेक्षा अधिक बियाणे पेरणी करतात. त्यामुळे बियाणाची उगवण असमान होते. तसेच बियाणावर अधिक खर्च होतो व उत्पादनही कमी मिळते.

Sunday, October 11, 2015 AT 12:00 AM (IST)

चांगल्या प्रतीच्या नेत्रकांड्या मिळण्यासाठी मातृवृक्षाला नियमितपणे खत, पाणी, पीक संरक्षण, छाटणीचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करावे. या मातृवृक्षापासून ऑक्‍टोबर-नोव्हेंबर ते जानेवारी-फेब्रुवारी या काळात नेत्रकांड्या काढून कलम तयार करतात. संत्री, मोसंबीच्या रोपवाटिकेमध्ये ऑक्‍टोबर-नोव्हेंबर ते जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत खुंट रोपांवर डोळे भरण्याचे काम चालू असते.

Sunday, October 11, 2015 AT 12:00 AM (IST)

- प्रकाश खरात, धुळे  1) विविध क्षमता आणि प्रकारांत खवानिर्मिती यंत्र उपलब्ध आहे. यंत्रामध्ये गॅसवर चालणारे, डिझेलवर चालणारे आणि वाफेवर चालणारे, असे तीन प्रकार आहेत.  2) बहुतांशी गॅसवर चालणाऱ्या यंत्राचा जास्त वापर होतो. प्रति किलो खवा उत्पादनाच्या खर्चात मात्र यंत्रानुसार खर्च वेगवेगळा येतो.  3) खवानिर्मिती यंत्रामध्ये मोठे गोलाकार भांडे असते. क्षमतेनुसार 0.5 ते 1 एच.पी. मोटारच्या साह्याने भांडे गोल फिरते.

Saturday, October 10, 2015 AT 06:00 AM (IST)

- नरेश गावंडे, येवला, जि. नाशिक  जवस लागवडीसाठी मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. जमिनीची योग्य मशागत करावी. लागवड ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. लागवड 45 सें.मी. x 10 सें.मी. किंवा 30 सें.मी. x 15 सें.मी. अंतराने करावी. लागवडीसाठी हेक्‍टरी 10 किलो बियाणे लागते. जिरायती पिकासाठी हेक्‍टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी पेरून द्यावे.

Saturday, October 10, 2015 AT 05:45 AM (IST)

- टी. एस. जगदाळे, माळशिरस, जि. सोलापूर  ग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पोयट्याची आणि चांगला निचरा असणारी जमीन फुलांचे लांब दांडे आणि कंदवाढीस उपयुक्त असते. चुनखडी, तसेच हलक्‍या बरड जमिनीत याची लागवड करू नये / टाळावी. या पिकाची लागवड खरीप तसेच रब्बी हंगामात केली जाते. सर्व लागवड एकाच वेळी न करता 15 दिवस किंवा एक महिना, असे अंतर ठेवून लागवड केल्यास फुलांची नासाडी कमी होते.

Saturday, October 10, 2015 AT 05:30 AM (IST)

- जयंत यादव, इंदापूर, जि. पुणे  - गोठा बांधताना शेतातील उंचावर असलेली कठीण व सपाट जागा निवडावी, जेणेकरून गोठ्यातील मलमूत्र, सांडपाणी याची विल्हेवाट व्यवस्थित लावता येईल. चाऱ्यासाठी योग्य प्रकारची गव्हाण आणि प्रत्येक जनावरास हालचालीसाठी पुरेशी जागा मिळेल, याची काळजी घ्यावी.  गोठ्याचे छत योग्य उंचीवर आणि न गळणारे असावे. गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील, अशी व्यवस्था असावी.

Friday, October 09, 2015 AT 05:45 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: