Last Update:
 
ऍग्रो मार्केट
गव्हाच्या सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा नोव्हेंबर २०१४ मधील फ्यूचर्स किमती ३.८ टक्क्यांनी अधिक आहेत. बटाटा पिकाच्या सप्टेंबर २०१४ मधील फ्यूचर्स किमती १९.२ टक्क्यांनी अधिक आहेत. बाजरीच्या डिसेंबर २०१४ ची फ्यूचर्स किमती ३.७ टक्क्यांनी अधिक आहेत. डॉ. अरुण प्र. कुलकर्णी वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस भारतातील बहुतेक सर्व प्रदेशांत चांगला पाऊस पडेल. यामुळे किमती कमी होण्याचा संभव आहे. हेजिंग करण्यासाठी ही वेळ शेतकऱ्यांसाठी चांगली आहे.

Friday, July 25, 2014 AT 05:30 AM (IST)

सुपर फॉस्फेट हे उच्च दर्जाच्या फॉस्फेट रॉक, तसेच सल्फ्युरिक आम्ल वापरून बनविले जाते. फॉस्फेट रॉकमध्ये जे फॉस्फेट उपलब्ध असते, ते पाण्यात विद्राव्य स्वरूपात नसते. सल्फ्युरिक आम्लाची प्रक्रिया केल्यानंतर त्याचे रूपांतर पाण्यात विद्राव्य स्वरूपात होते. १६ टक्के नैसर्गिक अमोनिकल सायट्रेट विद्राव्य फॉस्फेटमध्ये १४.५ टक्के फॉस्फेट हे पाण्यात विद्राव्य स्वरूपात उपलब्ध असते.

Friday, July 25, 2014 AT 05:30 AM (IST)

पुणे  - मुंबईमधील जिओलाईफ ॲग्रिटेक इंडिया प्रा. लि. या कंपनीने टॅबसिल हे उत्पादन बाजारात आणले आहे. हे सिलिकॉन या घटकापासून बनविण्यात आले आहे. कोरियामधील नॉसबो या नामांकित कंपनीच्या सहयोगाने जिओलाईफ या कंपनीने हे उत्पादन भारतीय बाजारपेठेत आणले आहे. २१ जुलै रोजी कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयामध्ये या उत्पादनाच्या अनावरणाचा कार्यक्रम झाला. या वेळी नॉसबो कंपनीचे प्रतिनिधी श्री.

Thursday, July 24, 2014 AT 05:15 AM (IST)

पुणे  - नारायणगाव(जि.पुणे) येथे जिओलाईफ कंपनीच्या नॅनो उत्पादनांच्या प्रात्यक्षिक क्षेत्रास जपानमधील तज्ज्ञ डॉ. नार्ट व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली. नारायणगाव येथे जिओलाईफ कंपनीने टोमॅटो, वांगी, भेंडी, आले या पिकांमध्ये विगर, नॅनो विगर, बॅलन्स नॅनो, नो- व्हायरस या उत्पादनांच्या चाचण्या घेतल्या आहेत. या उत्पादनांचा परिणाम पाहून या तज्ज्ञांनी समाधान व्यक्त केले आहे.

Tuesday, July 22, 2014 AT 05:30 AM (IST)

मुंबई  - प्रत्येक भारतीयापर्यंत बॅंकिंग सेवा पुरवण्याच्या दिशने रिझर्व्ह बॅंकेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले. केवळ पैसे स्वीकारणे किंवा त्यांचे हस्तांतर करणे यासाठीच्या पेमेंट बॅंका तसेच स्थानिक गोष्टींचा व प्रश्‍नांचा विचार करून छोट्या बॅंकांसाठीची नियमावली रिझर्व्ह बॅंकेने आज जाहीर केली. आर्थिक सामिलीकरण वाढवणे हा पेमेंट बॅंका व छोट्या बॅंकांचा उद्देश असेल, असे रिझर्व्ह बॅंकेने नियमावलीत नमूद केले आहे.

Tuesday, July 22, 2014 AT 05:15 AM (IST)

पुणे  - क्लास ही कंबाईन हार्वेस्टर उत्पादक कंपनी भारतामध्ये १९९१ पासून कार्यरत आहे. भारतीय उपखंडातील भौगोलिक परिस्थितीनुसार या कंपनीने कंबाईन हार्वेस्टरची निर्मिती केली आहे. कंपनीने फरिदाबाद आणि चंडीगड येथे उत्पादन प्रकल्प उभारला आहे. कंपनीने शेती उद्योगाशी निगडित शेती यंत्रे, अवजारे विकसित केली आहेत. कंबाईन हार्वेस्टरमध्ये क्रॉप टायगर ३०, क्रॉप टायगर ४०, क्रॉप टायगर ३० टेरा ट्रॅक, क्रॉप टायगर ४० टेरा ट्रॅक विकसित केले आहे.

Monday, July 21, 2014 AT 05:30 AM (IST)

राज्यात खरीप, लेट खरीप व रब्बी या तीन हंगामांत कांद्याचे उत्पादन होते. सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये २० टक्के, फेब्रुवारी- मार्चमध्ये २० टक्के आणि एप्रिल- मेमध्ये ६० टक्के काढणी होते. बाजारभावात स्थिरता आणण्यासाठी, देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी उपलब्धता वाढविण्यासाठी कांदा साठवण आवश्यक आहे. अश्विनी दरेकर, स्नेहल दातारकर, डॉ. जितेंद्र दोरगे खरीप हंगामातील कांद्याच्या तुलनेत रब्बी हंगामातील कांदा साठवणुकीस चांगला असतो.

Monday, July 21, 2014 AT 05:15 AM (IST)

सोलापूर (प्रतिनिधी) ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता.19) डाळिंब, केळी आणि पपईला मागणी वाढली होती. त्यामुळे त्यांच्या दरातही तेजी होती, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत शनिवारी डाळिंबाची दोन टन, केळीची एक टन आणि पपईची 50 क्विंटल अशी आवक झाली. डाळिंबाची आवक सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस भागातून झाली, तर केळी आणि पपईची आवक करमाळा, माढा, मोहोळ भागातून झाली.

Sunday, July 20, 2014 AT 12:00 AM (IST)

डॉ. ई. आर. वैद्य, पी.ए. सरप आता पावसाला सुरवात झाली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये सोयाबीन २५ जुलैपर्यंत पेरण्यास हरकत नसली तरी या पिकाला लागणारा पाऊस आणि हवामान पुढे मिळेलच हे हमखास सांगता येत नाही. सोयाबीन ऑक्टोबर शेवटपर्यंत शेतात राहील परंतु पावसाळा ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यात संपतो. त्यानंतर या पिकाला संरक्षक ओलिताची गरज लागेल.

Saturday, July 19, 2014 AT 05:00 AM (IST)

नवी दिल्ली,  - सलग दुसऱ्या महिन्यात निर्यातीने दोनअंकी वाढ नोंदवली आहे. जून महिन्यात ती 10.22 टक्‍क्‍यांवर गेल्याने अर्थव्यवस्थेसाठी ही बाब दिलासादायक मानली जात आहे. मात्र, याच महिन्यात सोन्याची आयात मोठ्या प्रमाणावर वाढल्याने व्यापार तूट (आयात आणि निर्यातीतील फरक) वाढून 11. 76अब्ज डॉलरवर गेली आहे.

Friday, July 18, 2014 AT 05:45 AM (IST)

नवी दिल्ली  - महागाईने एकीकडे जनता हैराण झाली असताना जूनमधील किरकोळ चलनवाढीचा दर (रिटेल इन्फ्लेशन) मात्र अडीच वर्षांतील नीचांकी पातळीवर आला आहे. भाज्यांच्या किमती कमी झाल्याने हा दर कमी झाल्याचे सरकारी आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. जून महिन्यात हा दर कमी होऊन 7.31 टक्के इतका होता. जानेवारी 2012नंतर पहिल्यांदाच ही पातळी पाहायला मिळाली आहे. यंदा मे महिन्यात हाच दर 8.28 टक्के इतका होता. घाऊक चलनवाढीचा दर (होलसेल इन्फ्लेशन) जून महिन्यात 5.

Friday, July 18, 2014 AT 05:45 AM (IST)

ऑक्टोबरनंतरचे खरीप पिकांचे फ्युचर्स भाव हे नवीन पिकांच्या आवकेमुळे कमी आहेत. ते जर योग्य वाटले तर त्यांचा उपयोग हेजिंग करण्यासाठी करता येईल.आतापर्यंतच्या कमी पावसामुळे गूळ व सोयाबीन वगळता, इतर सर्व वस्तूंचे सप्टेंबरनंतरचे फ्युचर्स भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सर्वांत मोठी वाढ मका, हळद व बटाटा यामध्ये झाली आहे. डॉ. अरुण प्र. कुलकर्णी माॅन्सूनची प्रगती गेल्या सप्ताहात सुधारली आहे.

Friday, July 18, 2014 AT 05:15 AM (IST)

मुंबई(पीटीआय)  - आर्थिक सुधारणांचा वेग वाढवला, तर अर्थव्यवस्थेतील सध्याची मंदी दूर होईल आणि जास्त विकास दर व कमी महागाई दराचे सत्र सुरू होईल, असे मत मॉर्गन स्टॅनलेने एका संशोधन अहवालात व्यक्त केले आहे. "सुधारणा वेगाने राबवल्या तर देशाच्या अर्थव्यवस्थेतील क्षमता दृढ होतील, कॉर्पोरेट क्षेत्राला त्यांच्या गुंतवणुकीचा योग्य परतावा मिळेल आणि त्यामुळे मंदी दूर होईल.

Tuesday, July 15, 2014 AT 05:30 AM (IST)

पुणे  - ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ग्रामीण भागातल्या तरुणींच्या समस्या आणि अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या "कापूसकोंड्याची गोष्ट' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे निर्माते नितीन भोसले असून, दिग्दर्शिका मृणालिनी भोसले आहेत. शहरी भागातील महिलांवरील अत्याचाराला वाचा फुटते.

Tuesday, July 15, 2014 AT 05:15 AM (IST)

जळगाव (प्रतिनिधी) ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. 12) कांद्याची 250 क्विंटल आवक झाली. कांद्याला 1300 ते 2200 रुपये प्रति क्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत बटाट्याची 300 क्विंटल आवक झाली. बटाट्यास 1600 ते 1900 रुपये प्रति क्विंटल दर होता. भेंडीची 17 क्विंटल आवक होऊन 1400 ते 3000 रुपये प्रति क्विंटल दर होता. फ्लॉवरची 9 क्विंटल आवक होऊन 2500 ते 4000 रुपये प्रति क्विंटल दर होता.

Sunday, July 13, 2014 AT 12:00 AM (IST)

सुधारित पिकवणगृहामध्ये हवेची विभागणी योग्य प्रकारे केली जाते. तसेच खास रचना केलेले एअरकुलर्स व संगणकनियंत्रित व्यवस्था आहे. त्यामुळे खर्चात मोठी बचत होते. येत्या काळात आपल्याकडे अशा तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. अल्हाद कांचन फळ पिकवणगृहामुळे फळाचा रंग, स्वाद, ताजेपणा आणि फळांचा आकार सुस्थितीत राहतो. त्यामुळे फळांना चांगला बाजारभाव मिळतो. नेदरलँड्ससारख्या देशात अशा तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

Saturday, July 12, 2014 AT 05:45 AM (IST)

  भारत सरकारतर्फे अन्नधान्य साठवणुकीसाठी ग्रामीण गोदाम योजना, शेतीमाल तारण योजना, खासगी उद्योजक गोदाम योजना, सार्वजनिक व खासगी भागीदारी योजना आणि क्षमता विकास योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ शेतकरी, सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी प्रक्रिया महामंडळ यांना मिळू शकतो. डॉ. आर. जी. देशमुख, एम. एम.

Tuesday, July 08, 2014 AT 05:00 AM (IST)

मिरचीच्या सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ऑक्टोबर २०१४ मधील फ्युचर्स किमती ३.१ टक्क्यांनी तर मक्याच्या किमती ९.७ टक्क्यांनी अधिक आहेत. हळदीच्या सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा सप्टेंबर २०१४ च्या फ्युचर्स किमती १७.७ टक्क्यांनी, तर कपाशीच्या सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा एप्रिल २०१५ मधील फ्युचर्स किमती १६.८ टक्क्यांनी अधिक आहेत. डॉ. अरुण प्र. कुलकर्णी सध्याच्या अंदाजानुसार या वर्षी पाऊस १२ ते १५ टक्क्यांनी कमी असेल.

Friday, July 04, 2014 AT 05:30 AM (IST)

पुणे  - जळगाव जिल्ह्यातील श्री साईराम प्लॅस्टिक ॲंड इरिगेशनद्वारा निर्मित श्रीराम ठिबक संचाला आता परदेशातूनही मागणी येऊ लागली आहे. श्रीराम ग्रुपने नुकतेच केनिया देशातील नौरोगिया शहरात झालेल्या ॲग्रीटेक आफ्रिका या प्रदर्शनात सहभाग नोंदविला होता. या प्रदर्शनामध्ये जगभरातील ४९ उद्योग समूह सहभागी झाले होते. हे प्रदर्शन २५ ते २७ जून या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.

Friday, July 04, 2014 AT 05:30 AM (IST)

मुंबई  - भाज्या व फळे या नाशवंत शेतमालाला शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकापर्यंत अत्यंत कमी वेळात, तसेच वाजवी दरात पोचवण्यासाठी फ्रेशकिन्स फूड्‌स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी फ्रेशकिन्सने महाराष्ट्र राज्य कृषी विपणन संघाचे सहकार्य घेतले आहे. येत्या 18 महिन्यांत फळे व भाज्या विक्रीसाठी मुंबईत 300 आउटलेट सुरू करण्यात येणार आहेत.

Thursday, July 03, 2014 AT 05:45 AM (IST)

मुंबई - सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी बॅंकांची गरज आहे हे पटल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने नव्या बॅंकांना परवाने देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये ठराविक कालावधीत नवे बॅंक परवाने, शाखाविस्तार, नवी आर्थिक उत्पादने, भांडवलाची उभारणी यांसाठी अनुमती दिली जाणार आहे.

Tuesday, July 01, 2014 AT 05:45 AM (IST)

नगर (प्रतिनिधी) ः येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता.27) गावरान ज्वारीची 28 क्विंटल आवक झाली. ज्वारीला 2035 ते 2750 रुपये क्विंटल असा दर मिळाला. सोयाबीनची 74 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला 3200 ते 3800 रुपये क्विंटल असा दर मिळाल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत भुसारची आवक स्थिर असली तरी दरात वाढ झाली आहे. बाजरीची पाच क्विंटल आवक झाली. बाजरीला कमाल व किमान 1900 रुपये क्विंटल असा दर मिळाला. तुरीची पाच क्विंटल आवक झाली.

Sunday, June 29, 2014 AT 12:00 AM (IST)

हळदीच्या सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा सप्टेंबर २०१४ च्या फ्युचर्स किमती १७.२ टक्क्यांनी, तर हरभऱ्याच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ८.८ टक्क्यांनी अधिक आहेत. कपाशीच्या एप्रिल २०१५ मधील फ्युचर्स किमती १७.४ टक्क्यांनी अधिक आहेत. डॉ. अरुण प्र. कुलकर्णी सध्याच्या अंदाजानुसार या वर्षी पाऊस ८ ते १० टक्क्यांनी कमी असेल.

Friday, June 27, 2014 AT 05:30 AM (IST)

उशिरा लागवडीसाठी सघन लागवड तंत्र गरजेचे या वर्षी माॅन्सूनचे आगमन उशिरा होत असून, साधारणपणे जुलै महिन्यामध्ये कपाशी लागवड होणार आहे. अशा वेळी सघन लागवड पद्धतीचा वापर करणे आवश्यक असून, त्यासाठी उभट व सरळ वाढणारे वाण फायदेशीर ठरतील, असा दावा नुजिवीडू सीड्स कंपनीतर्फे करण्यात आला आहे. - सघन लागवडीमध्ये दोन रोपांतील अंतर एक फुटाऐवजी ९ इंच, तर दोन ओळींतील अंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ३ ते ४ फूट ठेवावे. एकरी १४ हजारपेक्षा अधिक झाडे बसतात.

Friday, June 27, 2014 AT 05:15 AM (IST)

पुणे  - राधा-रमण महाबचत कांदा बियाणे टोकण यंत्राद्वारा कांदा, बरसीम, गाजर, पालक, मेथी, ओवा, मोहरी या बियाण्यांची शिफारशीत अंतरावर पेरणी करता येते. या यंत्राद्वारा चार इंच अंतरावर एकाच वेळी दहा ओळी पेरता येतात. गरजेप्रमाणे यात बदलही करात येतात. हे अवजार चालविण्यासाठी दोन मजुरांची गरज आहे. राधा-रमण योगेश्‍वर कोरडवाहू टोकण यंत्राने कापूस, तूर, एरंडी या बियाण्यांची पेरणी करता येते.

Wednesday, June 25, 2014 AT 06:00 AM (IST)

नवी दिल्ली  - गेली काही वर्षे मंदीच्या चक्रात अडकून बसलेल्या अर्थव्यवस्थेच्या गाडीला यंदा वेग येण्याची चिन्हे आहेत. देशाचा विकास दर यंदा वाढून तो 5.5 टक्‍क्‍यांपर्यंत, तर 2015-16 मध्ये तो 6.3 टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्याचा अंदाज जागतिक बॅंकेने वर्तवला आहे. जागतिक बॅंकेने तयार केलेल्या "जागतिक आर्थिक अनुमान 2014' या अहवालामध्ये भारताची अर्थव्यवस्था आता वेगाने वाढणार असून, 2016-17 मध्ये विकास दर 6.

Monday, June 23, 2014 AT 05:30 AM (IST)

महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभाग, इस्राईलचा मुंबईमधील दूतावास आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन यांच्यातर्फे पुण्यामध्ये नुकतेच शालेय शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने इस्राईलमध्ये "प्रयोगशील शाळा' या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थांमध्ये कृषी आणि औद्योगिक प्रगतीची बीजे रुजविणाऱ्या तज्ज्ञांशी साधलेला संवाद...

Sunday, June 22, 2014 AT 12:00 AM (IST)

नगर (प्रतिनिधी) ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. 20) हिरव्या मिरचीची 30 क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला दहा किलोस 300 ते 600 रुपये दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत भुसारची आवक स्थिर होती. गावरान ज्वारीची 80 क्विंटल आवक झाली. गावरान ज्वारीला 1700 ते 2150 रुपये प्रतिक्विंटल दर होता. हरभऱ्याची 65 क्‍विंटल आवक होऊन हरभऱ्याला दोन हजार ते सत्तवीसशे पन्नास रुपये दर होता.

Sunday, June 22, 2014 AT 12:00 AM (IST)

कपाशीच्या सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा एप्रिल २०१५ मधील फ्युचर्स किमती १४.९ टक्क्यांनी, मक्याच्या सध्याच्या स्पॉट किमती सप्टेंबर २०१४ मधील फ्युचर्स किमतीपेक्षा १०.२ टक्क्यांनी अधिक आहेत. साखरेच्या सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा सप्टेंबर २०१४ मधील फ्युचर्स किमती २.७ टक्क्यांनी अधिक आहेत. डॉ. अरुण प्र. कुलकर्णी सध्याच्या अंदाजानुसार या वर्षी पाऊस ६ ते ७ टक्क्यांनी कमी असेल.

Friday, June 20, 2014 AT 05:00 AM (IST)

सोलापूर (प्रतिनिधी) ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात शनिवारी (ता. 14) कोबी, फ्लॉवर, वांग्याला चांगली मागणी राहिली. त्यांचे दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजारसमितीच्या आवारात कोबीची 30 क्विंटल, फ्लॉवरच्या दोन गाड्या आणि वांग्याची 25 क्विंटलपर्यंत आवक झाली. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा भागांतून ही आवक झाली.

Sunday, June 15, 2014 AT 12:00 AM (IST)

नवी दिल्ली,  - निर्यातीच्या आकड्यांनी सकारात्मक संकेत दिल्यानंतर देशातील औद्योगिक उत्पादन आणि चलनवाढीच्या दराबाबतही चांगली वाढ दिसून आली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) एप्रिलमध्ये 3.4 टक्‍क्‍यांनी वाढ दाखवून 13 महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे मे महिन्यातील किरकोळ चलनवाढीचा दरही कमी होऊन 8.23पर्यंत आला आहे.

Saturday, June 14, 2014 AT 05:45 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2014 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: