Last Update:
 
ऍग्रो प्लॅनिंग
शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन -  - शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. - शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो.

Saturday, July 23, 2016 AT 05:30 AM (IST)

- प्रा. एस. ए. पवार, डॉ. बी. टी. पाटील, डॉ. एम. एन. भालेकर सध्या महाराष्ट्रामध्ये बहुतेक भागांत पाऊस झालेला आहे. अशा ठिकाणी खरीप हंगामात घेण्यात येणारी भाजीपाला पिके उदा. मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी, घेवडा, गवार या पिकांची लागवड करावी.  - यापूर्वी वरील पिकाची लागवड केली असल्यास, त्यामध्ये नांग्या भरण्याचे काम पूर्ण करावे. - लागवड करून एक महिना झाला असल्यास, खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावे.

Saturday, July 23, 2016 AT 05:15 AM (IST)

शैलेश जयवंत पारंपरिकरीत्या गुळाच्या पॅकिंगकरिता ज्यूट, बांबू, वेताच्या टोपल्यांचा वापर केला जातो. साखर ही ज्यूटच्या गोण्यांमध्ये पॅक केली जाते. अलीकडे ग्राहकांच्या व सुपर मार्केटच्या मागणीनुसार गुळाच्या ढेपेचे वजन व आकारही कमी झाला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सुपर मार्केट व मॉलच्या जमान्यात पॅकिंगला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

Thursday, July 21, 2016 AT 06:00 AM (IST)

डॉ. डी. पी. कुळधर, डॉ. पी. एच. घंटे, डॉ. बी. बी. भोसले १) भुरी रोग - हा रोग इरीसीफी पॉलिगोनी या बुरशीमुळे होतो. - दमट व कोरडे वातावरण या बुरशीच्या वाढीसाठी पोषक असते. हवेतील आर्द्रता ८० टक्के किंवा त्याहून अधिक असल्यास भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. - भुरी रोगाचा दुय्यम प्रसार हवेद्वारे होतो.  प्रतिबंधात्मक उपाय -  - शेत व शेतालगतचा भाग व दुधी सार या तणांपासून मुक्त ठेवावा. - रोगास कमी बळी पडणाऱ्या जातींचा (उदा.

Thursday, July 21, 2016 AT 05:15 AM (IST)

डॉ. सुभाष चव्हाण, डॉ. ज्ञानेश्‍वर जगताप, प्रा. वैभव राजेमहाडिक पीक - भात पीक अवस्था- रोप अवस्था. - पावसाची उघडीप असताना भात रोपवाटिकेच्या प्रति गुंठा क्षेत्रास १ किलो युरिया खत द्यावे. - बांधावरील खेकड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, एक किलो शिजलेल्या भातामध्ये ॲसिफेट (७५ टक्के पा.मि.) ७५ ग्रॅम किंवा कार्बारील भुकटी १०० ग्रॅम टाकून विषारी अमिष तयार करावे.

Tuesday, July 19, 2016 AT 06:30 AM (IST)

पिकाच्या संतुलित पोषणासाठी मुख्य अन्नद्रव्याइतकेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व वादातीत आहे. माती परीक्षणानंतर कमतरता असल्यास त्यांचा योग्य प्रमाणामध्ये वापर केल्यास उत्पादनात वाढ होते. डॉ. अनिल धमक पिकांच्या वाढीसाठी अत्यंत कमी प्रमाणात काही मूलद्रव्ये लागतात. त्यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणतात. - लोह कार्य : पानांमधील हरितद्रव्यांच्या निर्मितीत लोह आवश्‍यक असते.

Tuesday, July 19, 2016 AT 05:30 AM (IST)

वेलवर्गीय भाजीपाला पिके ही वनस्पती शास्त्रीयदृष्ट्या मोनोसीयस प्रकारात मोडतात म्हणजे मादी फुले आणि नर फुले एकाच वेलीवर परंतु वेगवेगळी लागतात. जेवढी मादी फुले जास्त तेवढी फळांची लागण जास्त म्हणून सुरवातीच्या अवस्थेत मादी फुले जास्त लागणे गरजेचे असते. डॉ. एस. एम.

Saturday, July 16, 2016 AT 06:00 AM (IST)

गेल्या आठवड्यामध्ये द्राक्ष विभागामध्ये दमदार पाऊस झाला. हवामानाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यातही सर्वत्र पावसाची अपेक्षा आहे. अशा स्थितीमध्ये द्राक्ष बागेमध्ये पाण्याचा निचरा करून घेणे आवश्यक असून, अन्नद्रव्यांची पूर्तता योग्य प्रकारे करावी. डॉ. आर. एस. सोमकुंवर खुंट लागवड -  खुंट लागवड झालेल्या बागेमध्ये भरपूर पाऊस झाला असल्यास, मुळांच्या कक्षेमध्ये अधिक पाणी झाल्याने ती काम करेनाशी होतात.

Saturday, July 16, 2016 AT 06:00 AM (IST)

‘सोशल मीडिया’चा वापर करून बेळगाव शहरातील (कर्नाटक राज्य) तरुण इंजिनिअर कुमेल बर्फवाला याने थेट ग्राहकांना भाजीपाला व फळे-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या उपक्रमाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून, सुमारे ३०० ग्राहक या सेवेचा फायदा घेत आहेत. राजकुमार चौगुले महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले कर्नाटक राज्यातील बेळगाव हे प्रसिद्ध शहर आहे.

Saturday, July 16, 2016 AT 05:45 AM (IST)

खरीप हंगामातील सोयाबीन हे मुख्य पीक आहे. त्यामध्ये पट्टापेर पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनकतेमध्ये वाढ होते. जितेंद्र दुर्गे, डॉ. विजेंद्र शिंदे, सुरेंद्र गावंडे पट्टापेर पद्धत म्हणजे काय? सोयाबीन, मूग, अथवा उडीद पिकाची प्रचलित पद्धतीने पेरणी करताना त्यामध्ये किंचित बदल अथवा सुधारणा करून, पेरणी करताना ठराविक ओळीनंतर एक ओळ खाली सोडली जाते.

Thursday, July 14, 2016 AT 04:45 AM (IST)

सध्या बऱ्याच ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे. या वेळी खालील बाबींकडे लक्ष दिल्यास भाताचे चांगले उत्पादन मिळू शकते. प्रा. विजय देशपांडे भात रोप लावणीपूर्वी करावयाची महत्त्वाची कामे -  १) रोपाचे वय - भात रोपाची लावणी करताना रोपाचे वय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. रोपास १ पान येण्यास खरिपात ५ दिवस लागतात. अ) हळव्या किंवा हलक्या जाती - या जातीचा एकूण कालावधी ११५ ते १२० दिवसांचा असतो.

Wednesday, July 13, 2016 AT 05:45 AM (IST)

कपाशी अवस्था - वाढ - बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम राहण्यासाठी बीटी कपाशीच्या सभोवती ५ ओळी किंवा २० टक्के बिगर बीट संकरित वाणाची लागवड करावी. बाजरी अवस्था - पेरणी/ उगवण ज्या ठिकाणी अद्याप बाजरीची पेरणी झाली नसेल, त्या ठिकाणी वापसा आल्यानंतर १५ जुलैपर्यंत पेरणी करून घ्यावी. बाजरीची पेरणी ४५ सें.मी. अंतराच्या पाभरीने करावी. पेरणीसाठी श्रद्धा, सबुरी किंवा आयसीटीपी ८२०३ या जातीचे हेक्टरी ३ किलो या प्रमाणे वापरावे.

Tuesday, July 12, 2016 AT 05:45 AM (IST)

आंतरपीक म्हणजे दोन किंवा अधिक पिकांची लागवड एकाच जमिनीच्या तुकड्यावर समांतरपणे करणे. मात्र, त्याची पेरणी व काढणी एकाच दिवशी केली पाहिजे असे नाही. कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून शेंगावर्गीय पिके फायदेशीर ठरू शकतात. मणिकंडन अंगमुथ्थू, डी. ब्लेज, रचना देशमुख राज्यामध्ये संकरित कपाशीची लागवड ही अधिक अंतरावर (९० सें.मी. बाय ९० सें.मी किंवा १२० सें.मी. बाय ६० सें.मी.) होते. या जाती सर्वसाधारणपणे १८० ते २१० दिवसांत परिपक्व होतात.

Wednesday, July 06, 2016 AT 08:00 AM (IST)

डॉ. एन. के. भुते, डॉ. बी. बी. भोसले, प्रा. ए. व्ही. गुट्टे. महाराष्ट्रात प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर कडुनिंब अाढळतो. त्याच्या निंबोळ्यांचा वापर एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापनात केल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करता येतो.  कडुनिंबाच्या पक्व निंबोळ्या गोळा करून वाळवून साठवून ठेवाव्यात. त्यापासून घरच्या घरी कमी खर्चात उत्तम दर्जाचे वनस्पतीजन्य कीटकनाशक बनवता येते. जागरूक होऊन निंबोळी अर्काचा वापर वाढवावा.

Wednesday, July 06, 2016 AT 05:45 AM (IST)

जितेंद्र दुर्गे, सुरेंद्र गावंडे, कु. सोनिया विल्हेकर पूर्वी तिळाची लागवड खरिपातील मुख्य पिकात आडतास तसेच मुख्य पिकांच्या बियाण्यात मिसळून मिश्रपीक म्हणून करायचे. तीळ हे ८५-९० दिवसांचे पीक असल्याने दुबार पीक पद्धतीसाठी उपयुक्त ठरते. निंदण करणे शक्य असलेल्या शेतकऱ्यांनी सलग लागवड केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. उशिरा पेरणीच्या अवस्थेतसुद्धा अर्ध रब्बी तीळ पिकाची लागवड करता येते.

Tuesday, July 05, 2016 AT 05:30 AM (IST)

कपाशी पिकावर येणाऱ्या कीड व रोगाचे नियंत्रण वेळेवर करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वेक्षण करून आर्थिक नुकसानाची पातळी आल्यानंतर फवारणीचे नियोजन करावे. के. आर. क्रांती, सचिता येलेकर रोग व्यवस्थापन : १) बोंडावरील कुजव्या रोग -  - साधारणपणे ढगाळ आणि उबदार परिस्थितीमुळे जलद निर्माण होतो. फवारणी -  - मँकोझेब (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम अधिक क्लोरोथॅलोनिल (७० डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी.

Wednesday, June 29, 2016 AT 06:00 AM (IST)

कपाशीचे पीक निखळ घेण्याऐवजी त्यामध्ये आंतरपिके घेतल्यास त्या क्षेत्रापासून मिळणारे एकूण व निव्वळ आर्थिक उत्पन्न निखळ कपाशीपेक्षा अधिक मिळते. त्याच प्रमाणे अन्यही अनेक फायदे होतात. त्यामुळे कपाशी पिकामध्ये योग्य आंतरपिकाची लागवड करावी. प्रा. अरविंद पांडागळे, डॉ. के. एस.

Tuesday, June 28, 2016 AT 06:15 AM (IST)

डॉ. लक्ष्मण चव्हाण, डॉ. शोभा विचारे १) रोपवाटिकेला संरक्षित पाणी द्यावे. रोपवाटिकेवर एक टक्का तीव्रतेची युरिया (१० ग्रॅम युरिया प्रति लिटर पाणी)करावी. याचबरोबरीने एक टक्का तीव्रतेचे पोटॅशिअम नायट्रेट (१३ः००ः४५) याची फवारणी करावी. त्यामुळे बाष्पोत्सर्जन कमी प्रमाणात होते. या फवारणीमुळे रोपवाटिका पाण्याच्या ताणात एक आठवड्यापर्यंत तग धरू शकते. २) अद्याप पेरणी केली नसेल तर नियमित पावसाळा सुरू झाल्यावरच पेरणी करावी.

Tuesday, June 28, 2016 AT 04:00 AM (IST)

ठिबक सिंचन संचातून उसासाठी पाण्याबरोबर विद्राव्य खतांचा वापर करता येतो. त्यामुळे जमिनीतील हवा व पाणी यांचे संतुलन राहते. या संतुलनामुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची वाढ होऊन खतांचे उपलब्ध स्वरूपात रूपांतर व मुळाद्वारे खतवापर वाढून उत्पादनात वाढ होते. सूरज नलावडे, संदेश देशमुख, डॉ. एस. एम. पवार उसासाठी पाण्याचे दोन पाळीतील अंतर हे जमिनीची पाणी धारण क्षमता, पीकवाढीची अवस्था व लागवडीचा हंगाम या बाबींवर अवलंबून असते.

Friday, June 24, 2016 AT 05:45 AM (IST)

शैलेश जयवंत राज्यामध्ये टोमॅटोचे उत्पादन चांगले असून, त्यापासूनच्या प्रक्रिया उद्योगाचे प्रमाण मात्र कमी आहे. टोमॅटोचा सॉस किंवा केचपला जगभर चांगली मागणी आहे. ही जागतिक पातळीवर सुमारे १०० कोटी रुपयांची बाजारपेठ आहे. यामध्ये एचयूएल, नेसले, हेंझ, डेलमोंटे, सॅफील, सिरामिका यासारख्या मोठ्या कंपन्या आहेत. मात्र ही बाजारपेठ दर वर्षी २० टक्के दराने वाढत असल्याने नव्या कंपन्या किंवा छोट्या उद्योगांनाही चांगल्या संधी आहेत.

Thursday, June 23, 2016 AT 06:00 AM (IST)

मागील आठवड्याप्रमाणे या संपूर्ण आठवड्यातही सर्व द्राक्ष विभागांमध्ये कमी-जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस सगळीकडेच पडेल असे नसले तरी काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडण्याची शक्यता आहे. - नाशिक - नाशिकच्या उत्तरेकडील भागामध्ये दिंडोरी, वणी, सटाणी, देवळा, चांदवड या भागांत सुरवातीला पाऊस होईल. शुक्रवार व त्यानंतर नाशिकच्या पूर्वेकडे येवला, शिर्डी, लोणी या भागांमध्ये शनिवार, रविवारी पाऊस होण्याची शक्यता आहे.

Thursday, June 23, 2016 AT 05:45 AM (IST)

के. आर. क्रांती, सचिता येलेकर हवामानाचा अंदाज  पावसाळी आगमनाला विलंब होत असला, तरी सरासरी पर्जन्यमान वितरण हे कपाशीसह अन्य पिकांसाठी चांगले राहण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या अखेरीस ३०० ते ४०० मि.लि. एवढा पाऊस होण्याचा अंदाज आहे. अन्य जिल्ह्यांमध्येही तो या काळाच्या आगेमागे येईल. हा पाऊस संकरित बीटी कपाशीसाठी चांगला राहील.

Wednesday, June 22, 2016 AT 04:45 AM (IST)

गेल्या वर्षी ज्या जमिनीवर भेंडी, टोमॅटो, अंबाडी किंवा हरभरा या पिकांची लागवड केली होती, अशा जमिनीवर कापसाची लागवड टाळावी. वाण निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार आणि वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा. डॉ. के. एस. बेग, प्रा. अरविंद पांडागळे, डॉ. शिवाजी तेलंग जमीन -  - पाण्याचा निचरा होणाऱ्या व जलधारणाशक्ती उत्तम असणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ५.५ ते ८.५ असावा. - जमिनीची खोली किमान ६० ते १०० सें.मी. असावी.

Monday, June 20, 2016 AT 05:15 AM (IST)

डॉ. ए. व्ही. कोल्हे, डॉ. डी. बी. उंदिरवाडे खरीप पिकाच्या पेरणीनंतर रोपावस्थेमध्ये खुरपडीचा प्रादुर्भाव होतो. खुरपडी म्हणजे विविध प्राण्याचा एकत्रित प्रादुर्भाव. यामध्ये पक्षी, खार, वाणी, वाणी, नाकतोडे, क्रिकेट, वायरखर्म (काळी म्हैस) इत्यादीचा समावेश होतो. या किडी बहुभक्षी असून, एकदल, द्विदल, दाळवर्गीय, तेलवर्गीय पिकांवर या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Friday, June 17, 2016 AT 06:00 AM (IST)

प्रा. आर. व्ही. देशमुख, डॉ. एस. व्ही. धुतराज - ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे. त्यांनी मृगबाग केळी लागवड लवकरात लवकर करून घ्यावी. तसेच इतर शेतकऱ्यांनी मोसमी पावसास सुरवात झाल्यानंतर जून अखेरपर्यंत केळी लागवड करून घ्यावी, केळी लागवडीस अधिक उशीर केल्यास उत्पादनात घट येऊ शकते. - मृगबाग केळीची लागवड करण्यापूर्वी जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे. त्यामुळे पिकासाठी लागणाऱ्या खतांचे योग्य नियोजन करता येते.

Friday, June 17, 2016 AT 03:15 AM (IST)

फळभाज्या सुकवून त्या टिकविण्याची एक पारंपरिक पद्धती आहे. वर्षभर भाज्या उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही पद्धती जगभर राबवली जाते. त्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.  १. सूर्यप्रकाशाचा वापर करून भाज्या वाळवणे २. यंत्राच्या साह्याने भाज्या वाळवणे पद्धत कोणतीही असली तरी भाज्यातील पाण्याचा अंश कमी करणे हेच त्यातील महत्त्वाचे काम असते. सुकवलेल्या भाज्यांच्या पॅकेजिंगमधील मूलभूत घटकांचा विचार या भागामध्ये करू. १.

Thursday, June 16, 2016 AT 05:45 AM (IST)

सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यातील शनिवार व रविवारनंतर पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात शुक्रवारनंतर चांगला पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणूनच पावसाआधी संपवण्याची सर्व कामे येत्या शुक्रवार शनिवारपर्यंत उरकून घ्यावीत. - नाशिक भागामध्ये रविवार ते शुक्रवार बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे.

Thursday, June 16, 2016 AT 05:45 AM (IST)

सोयाबीन : सोयाबीन पेरणीसाठी सुधारित जातींची निवड करावी. - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीने विकसित केलेल्या एमएयूएस-७१ (समृद्धी), एमएयूएस-८१ (शक्ती), एमएयूएस-१५८, एमएयूएस-१६२ इ. - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने विकसित केलेल्या केडीएस-३४४ (फुले अग्रणी). - जबलपूरने विकसित केलेल्या जेएस-३३५ (जवाहर), जेएस ९३-०५, जेएस ९५-६०. - सोयाबीन संचालनालय, इंदौर यांनी विकसित केलेल्या एनआरसी-३७ (अहिल्या ४).

Saturday, June 11, 2016 AT 05:00 AM (IST)

डॉ. एस. डी. सावंत मागील आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही येत्या सोमवारपर्यंत सांगली व सोलापूर भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. - पुण्याच्या पूर्वेकडील यवत, बारामती, इंदापूर भागांमध्ये याच दिवसामध्ये हलक्या स्वरूपाचे एक-दोन पाऊस मिळतील. पुण्याच्या उत्तरेकडे व पुढे नाशिकपर्यंतच्या भागामध्ये येत्या सात दिवसांमध्ये वातावरण ढगाळ राहील परंतु पावसाची विशेष शक्यता नाही. नाशिक विभागामध्ये पावसाला १७-१८ तारखेनंतर सुरवात होण्याची शक्यता आहे.

Thursday, June 09, 2016 AT 08:15 AM (IST)

शैलेश जयवंत लोणचे भारतीयांच्या जेवणातील एक अविभाज्य घटक आहे. पूर्वी बहुतांश घरात ते पारंपरिक पद्धतीने बनविले जात असे. मात्र सध्या वाढते शहरीकरण व बदलत्या जीवनशैलीमुळे घरी तयार करणे शक्य होत नाही. पर्यायाने तयार लोणच्याच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.  लोणच्याच्या विक्रीसाठी त्याच्या चविष्टतेबरोबरच पॅकिंगही आकर्षक असणे आवश्यक आहे. योग्य पॅकेजिंगद्वारे लोणच्याचा साठवणकाळ सहा महिन्यांपर्यंत वाढवता येतो.

Thursday, June 09, 2016 AT 05:45 AM (IST)

हिरवळीच्या खताचा रासायनिक खत अथवा शेणखतासोबत पूरक म्हणून वापर केल्यास जमिनीच्या सुपीकतेसाठी तो चांगला पर्याय होऊ शकतो. भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ जमिनीला मिळवून देणाऱ्या द्विदल वनस्पतीची हिरवळीचे खत म्हणून निवड केली जाते. डॉ. एन. एम. कोंडे, डॉ. बी. ए. सोनुने, डॉ. व्ही. के. खर्चे. सर्वसाधारणपणे द्विदल वनस्पतींच्या पानात २.० ते ३.० टक्के नत्र असते.

Monday, June 06, 2016 AT 06:15 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: