Last Update:
 
ऍग्रो प्लस
डॉ. रामचंद्र साबळे महाराष्ट्रावर आणि संपूर्ण भारतावर हवेचा दाब समान म्हणजे १०१० हेप्टापास्कल इतका राहील. केवळ हिमाचल प्रदेशच्या भागात हवेचा दाब कमी होऊन तो १००६ हेप्टापास्कल इतका कमी होईल. मात्र त्याचवेळी भारताच्या पूर्वेकडील भागावर १०१६ ते १०२० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब अधिक राहील. त्यामुळे वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. मध्य भारतावरील काही क्षेत्रांवर हवेचा दाब कमी राहील. हीच स्थिती आठवडाभर राहील. या आठवड्यात हवामान स्थिर राहील.

Saturday, March 25, 2017 AT 06:00 AM (IST)

डॉ. अल्केश चाैधरी जनावरांसाठी ज्वारी, बाजरीचा कडबा चारा म्हणून वापरला जातो. काही भागात हा चारा अतिशय निकृष्ट दर्जाचा असतो. एकच प्रकारचा अाणि निकृष्ट दर्जाचा चारा दिल्यामुळे जनावरांची ऊर्जा, प्रथिने आणि खनिजांची गरज पूर्णपणे भागत नाही. याचा परिणाम जनावराच्या दुग्ध उत्पादनावर आणि शरीराच्या वाढीवर होतो, त्यामुळे जनावरांच्या अाहारात पोषक खाद्य घटकांचा समावेश करणे अावश्यक असते.

Friday, March 24, 2017 AT 05:45 AM (IST)

या सप्ताहात सोयाबीनचा अपवाद वगळता सर्वच पिकांचे भाव घसरले किंवा स्थिर राहिले. सर्वात अधिक घसरण मिरचीत (८.७ टक्के) व हळदीत (४.१ टक्के) झाली. स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यात खरीप पिकांच्या फ्युचर्स च्या किमती वाढतील तर रबी पिकांच्या किमती कमी होतील. गव्हातील घसरण ११ टक्क्यांनी होईल तर रबी मक्यातील घसरण ९ टक्क्यांनी होईल असे दिसते. डॉ. अरुण कुलकर्णी खरीप पिकांची आवक आता कमी होत आहे.

Friday, March 24, 2017 AT 05:45 AM (IST)

के. एल. जगताप, साधना उमरीकर मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असेल, तर त्यापासून मुरघास तयार करून ठेवता येतो. ज्या वेळी चाऱ्याचा तुटवडा असतो, त्या वेळी तयार केलेला मुरघास जनावरांना चारा म्हणून उपयोगात येतो. उन्हाळी हंगामात पुरेसे पाणी उपलब्ध असेल, तर चारा पिकाची लागवड करून त्यापासून मुरघास तयार करावा. जनावरांना चारा खाऊ घालताना प्रथमत: चारा कुट्टीच्या साह्याने लहान-लहान बारीक तुकडे करून खायला द्यावा.

Tuesday, March 21, 2017 AT 06:00 AM (IST)

वातावरणातील तापमानाच्या चढ-उतारामुळे पक्ष्यांच्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होतात. साधारणतः मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत कडक उन्हाळा असतो. तापमान २२ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते. वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांच्या शरीरावर ताण येतो. या काळात पक्ष्यांची योग्य काळजी न घेतल्यास मरतुक वाढते अाणि मोठे आर्थिक नुकसान होते. अजय गवळी, स्नेहा रासकर पक्ष्यांना सर्वात जास्त उन्हामुळे ताण येतो यालाच हीट स्ट्रेस असे म्हणतात.

Tuesday, March 21, 2017 AT 06:00 AM (IST)

डॉ. रामचंद्र साबळे महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात फरक होत नसून तो मध्य महाराष्ट्रावर उत्तर - दक्षिण दिशेने १०१० हेप्टापास्कल इतका राहणार आहे. तर उत्तर भारतावर हवेचा दाब कमी होत असून, तो १००८ हेप्टापास्कल इतका कमी राहणार आहे. भारताच्या पूर्व दिशेस हवेचे दाब अधिक राहणार आहेत. त्यामुळे वारा दक्षिणेकडून उत्तर दिशेस वाहील. ता. १९ मार्च रोजी उत्तरेकडील काश्‍मीर भागात १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल आणि वारा वायव्येकडून दक्षिणेस राहील. ता.

Saturday, March 18, 2017 AT 06:00 AM (IST)

या सप्ताहात सर्वच पिकांचे भाव घसरले. सर्वात अधिक घसरण गवार बी (३.२ टक्के) व साखर (२.८ टक्के) यांच्यात झाली. स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप पिकांच्या फ्युचर्सच्या किमती वाढतील तर रबी पिकांच्या किमती कमी होतील. गव्हातील घसरण १४ टक्क्यांनी होईल तर रबी मक्यातील घसरण ७ टक्क्यांनी होईल असे दिसते.  डॉ. अरुण कुलकर्णी खरीप पिकांची आवक आता कमी होत आहे. या नंतर रबी पिकांची आवक येण्यास सुरवात होईल.

Friday, March 17, 2017 AT 06:15 AM (IST)

स्वच्छ शेळी मांस उत्पादन करण्यासाठी गोठ्याचे योग्य व्यवस्थापन, सकस आहार, पशुतज्ज्ञांकडून जनावरांची नियमित तपासणी व लसीकरण या सर्व बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे. वैयक्तिक स्वच्छतेचे निकष पाळून योग्य पद्धतीने साठवणूक केल्यामुळे निश्चितच उत्तम दर्जाचे स्वच्छ व सुरक्षित मांस उत्पादन करून जास्त नफा मिळविणे शक्य आहे. डॉ. विलास वैद्य, डॉ. आर. जे. झेंडे, डॉ. नेत्रा अस्वार शेळीच्या मांसाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

Friday, March 17, 2017 AT 06:00 AM (IST)

महाराष्ट्रावरील तसेच मध्य, उत्तर व दक्षिण भारतातील हवेच्या दाबात सातत्याने बदल होत आहेत. सह्याद्री पर्वत रांगांपासून कोकणपट्टीवर हवेचा दाब १००८ हेप्टापास्कल इतका राहील, तर सह्याद्री पर्वत रांगांपासून पूर्वभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. हवेचा दाब कमी होत असल्याने हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहील. त्यातूनच मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणले जाईल, त्यामुळे हवामान ढगाळ राहील.

Saturday, March 11, 2017 AT 06:00 AM (IST)

या सप्ताहात मिरची, साखर, सोयाबीन व हळद यांचे भाव घसरले. सर्वांत अधिक घसरण सोयाबीन (३.६ टक्के) व हळद (३.४ टक्के) यांच्यात झाली. स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप पिकांच्या फ्युचर्सच्या किमती वाढतील, तर रब्बी पिकांच्या किमती कमी होतील. गव्हातील घसरण १२ टक्क्यांनी होईल असे दिसते . डॉ. अरुण कुलकर्णी खरीप पिकांची आवक आता कमी होत आहे. या नंतर रब्बी पिकांची आवक येण्यास सुरवात होईल.

Friday, March 10, 2017 AT 06:15 AM (IST)

कांद्याची योग्यवेळी काढणी करून ते चांगल्या प्रकारे सुकवून घ्यावेत. प्रतवारी करून साठवण करावी. यांत्रिक पद्धतीने अधिक अचूक व दर्जेदार प्रतवारी होते. डॉ. विजय महाजन, डॉ. शैलेंद्र गाडगे खरीप कांद्यास लगेच मागणी असल्यामुळे तो साठविण्याची गरज भासत नाही. मात्र रांगडा व रब्बी कांदा साठवला तरच चांगले भाव मिळतात. त्यासाठी खालील बाबींकडे लक्ष द्यावे. १) कांदा सुकवण : फोटो - ८८५४२ - कांद्याच्या ५० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी.

Friday, March 10, 2017 AT 06:00 AM (IST)

डॉ. विशाल केदारी, डॉ. सचिन गोंदकर दुधाळ जनावरे, शेळ्या, मेंढ्यांच्या शरीरावर बदलत्या हवामानाचा परिणाम होत असतो. ही जनावरे पूर्णतः स्वतःच्या शरीराचे संरक्षण करण्यास सक्षम नसतात. त्यांना सभोवतालच्या वातावरणाशी समरूप होण्यासाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता भासत असते. पर्यावरणातील तापमान आणि शरीराचे तापमान समान होते त्या वेळेस प्राण्याचे शरीर हे सुरळीतपणे कार्य करते. संसर्गजन्य अाजार व थंडी यांच्या एकत्रित परिणामाने जनावरांच्या शरीरावर ताण पडतो.

Friday, March 10, 2017 AT 06:00 AM (IST)

डॉ. अभिजित साबळे रक्तातील साखर वाढल्यामुळे मधुमेह अाजार होतो. रक्तातील साखर संपूर्ण शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोचवते परंतु जेव्हा साखरेचे प्रमाण खूप वाढते तेव्हा प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोचू शकत नाही. त्यामुळे तिथे ऑक्सिजनची कमतरता भासते. शरीरातल्या पेशी जिवंत आणि निरोगी राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे पेशींवर परिणाम होतो.

Thursday, March 09, 2017 AT 06:15 AM (IST)

प्रथिनांव्यतिरिक्त कडधान्यांमध्ये ब जीवनसत्त्वे, खनिजे आणि मेद भरपूर प्रमाणात असतात. प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि मेद एकत्रित असल्यामुळे कडधान्यांना आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. कीर्ती देशमुख सर्वच प्रकारची कडधान्ये पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वांत हलके कडधान्य म्हणजे मटकी त्यानंतर मूग व चवळी. नंतर उडीद, हरभरा, कडू वाल आणि पावटा हे पचायला सर्वांत कठीण असते. कडधान्यांत भरपूर पोषक तत्त्वे असतात.

Thursday, March 09, 2017 AT 06:15 AM (IST)

टीबी हा आजार गंभीर असला तरी योग्य उपचार अाणि औषधांनी आटोक्यात आणता येऊ शकतो. फक्त त्यासाठी स्वच्छता व चांगल्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत. लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळच्या वेळी औषधी घेतल्यास प्रतिबंध होईल. डॉ. विनीता कुलकर्णी वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे अनेक घातक आजारांवर उपचार करणे शक्य होत आहे. या आजारांची तीव्रता किती प्रमाणात आहे, यावर पूर्ण बरे होणे अवलंबून असते. टीबीमध्ये सुद्धा ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.

Thursday, March 09, 2017 AT 05:45 AM (IST)

खाद्य आणि सर्वसाधारण व्यवस्थापनाद्वारे पक्ष्यांवर येणारा तापमानाचा ताण कमी होण्यास मदत होते, त्यामुळे उत्पादनावरील प्रतिकूल परिणाम टाळता येऊ शकतो आणि उत्पादन अबाधित राखण्यास मदत होते. डॉ. गजानन जाधव, डॉ. हर्षल रेवतकर उन्हाळ्यात पक्ष्यांचे सर्वसाधारण व्यवस्थापन - खाद्यामध्ये पिलेटेड खाद्याचा वापर करावा जेणेकरून जास्तीत जास्त पोषकतत्त्वे पक्ष्यांना मिळतील. पिलेटेड खाद्यामुळे खाद्य खाण्याच्या प्रमाणात वाढ होते, परिणामी उत्पादनात वाढ मिळते.

Tuesday, March 07, 2017 AT 06:00 AM (IST)

डॉ. अल्केश चौधरी, डॉ. स्वप्नील शिंदे प्रथिने हा जनावरांच्या आहारातील सर्वात महत्त्वाचा आणि महाग घटक आहे. प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणजे तेलविरहित पेंड (सरकी, शेंगदाणा, सोयाबीन आणि सूर्यफूल व इतर धान्य). आहारात प्रथिनांचा वापर आणि जनावरांच्या पोटात आहारातून गेलेल्या प्रथिनांचा वापर कसा व किती प्रमाणात होत आहे हे समजून घेऊन प्रथिनांचे प्रमाण ठरवावे.

Tuesday, March 07, 2017 AT 06:00 AM (IST)

तीव्र विषबाधेमध्ये अचानक जनावर दगावण्याचे प्रमाण जास्त असते व प्रलंबित विषबाधेमध्ये जनावर दगावत नसले तरी खंगत जाते व त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे, कुठल्याही प्रकारची विषबाधा ही महत्त्वाची असून, वेळेवर उपचार करणे महत्त्वाचे अाहे. डॉ. प्रतीक इंगळे पाटील, डॉ. प्रतीक बोडखे जनावरांमध्ये साधारणपणे तीव्र विषबाधा व प्रलंबित विषबाधा अशा दोन प्रकारच्या विषबाधा आढळून येतात.

Friday, March 03, 2017 AT 06:00 AM (IST)

या सप्ताहात मका, साखर व गहू यांचे भाव घसरले. मिरची, कापूस, हळद व गवार बी यांचे भाव वाढले. सर्वांत अधिक वाढ गवार बी (१२.२ टक्के) व मिरची (४.१ टक्के) यांच्यात झाली. स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप पिकांच्या फ्युचर्सच्या किमती वाढतील, तर रब्बी पिकांच्या किमती कमी होतील. गव्हातील घसरण १३ टक्क्यांनी होईल असे दिसते . डॉ. अरुण कुलकर्णी खरीप पिकांची आवक आता कमी होत आहे. या नंतर रब्बी पिकांची आवक येण्यास सुरवात होईल.

Friday, March 03, 2017 AT 05:45 AM (IST)

डॉ. रामचंद्र साबळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणे शक्य असून, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणे शक्य आहे. भारताच्या जवळील ईशान्य भागावर हवेचा दाब १०२२ पर्यंत वाढलेला असेल, त्यामुळे वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. या आठवडाभरात साधारणपणे याचप्रमाणे हवेचा दाब राहणे शक्य आहे.

Saturday, February 25, 2017 AT 06:00 AM (IST)

शोभिवंत माशांची देशांतर्गत व परदेशांत असणारी मोठी मागणी व बाजारपेठ यांचा विचार केल्यास शोभिवंत माशांंचे संवर्धन करणे हा चांगले अर्थार्जन मिळवून देणारा जोडधंदा व कालांतराने मुख्य व्यवसाय होऊ शकतो. शोभिवंत मत्स्यबीज उत्पादनासाठी एमपेडा अाणि एमएफडीबी या संस्थांमार्फत काही योजना कार्यान्वीत अाहेत तसेच या संस्थांमार्फत प्रक्षीक्षणही दिले जाते. डॉ. पंकजकुमार मुगावकर, डॉ.

Tuesday, February 21, 2017 AT 06:15 AM (IST)

डॉ. रामचंद्र साबळे महाराष्ट्रावर दक्षिणोत्तर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. याच आठवड्यात अरबी समुद्रावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होईल, तर बंगालच्या उपसागरावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. महाराष्ट्रावरील हवेचे दाब पुढे आणखी कमी होतील आणि ते १०१० हेप्टापास्कल इतके होतील. या आठवड्याच्या मध्यावर महाराष्ट्रावरील हवेचे दाब आणखी कमी होऊन तो १००८ हेप्टापास्कलपर्यंत कमी होईल.

Saturday, February 18, 2017 AT 06:00 AM (IST)

अजय गवळी, डॉ. विशाल केदारी - प्रथिनांचा स्रोत म्हणून कशाचा वापर करावा? तेलबिया घाण्यात घालून तेल काढल्यानंतर जो चोथा उरतो त्यास पेंड असे म्हणतात. अशा विविध पेंडींचा जनावरांच्या आहारात समावेश केला जातो.

Friday, February 17, 2017 AT 06:00 AM (IST)

या सप्ताहात कापूस व गहू वगळता इतर पिकांचे भाव घसरले. कापूस व गहू यामध्ये किरकोळ वाढ झाली. सर्वांत अधिक घसरण मिरची (५.७ टक्के) व खरीप मक्यात (३.७ टक्के) झाली. स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप पिकांच्या फ्युचर्सच्या किमती वाढतील, तर रब्बी पिकांच्या किमती कमी होतील. गव्हातील घसरण १४ टक्क्यांनी होईल, असे दिसते. डॉ. अरुण कुलकर्णी खरीप पिकांची उरलेली आवक या महिन्यात होऊ लागली आहे.

Friday, February 17, 2017 AT 06:00 AM (IST)

फुलांच्या विक्री व्यवस्थेत काढणीपासून ग्राहकांपर्यंत ती सुस्थितीत पोचेपर्यंत अनेक क्रमिक घटकांचा समावेश होतो. फळे, भाजीपाला यापेक्षाही फुले हाताळणीस नाजूक असतात आणि त्यांचे काढणीनंतरचे आयुर्मान खूप कमी असते, त्यामुळे फुलांची योग्यप्रकारे वाहतूक अाणि फुलांचे अादर्श विक्री व्यवस्थापन करणे महत्त्वाचे अाहे.

Tuesday, February 14, 2017 AT 06:00 AM (IST)

भरपूर पोषण तत्त्व असलेल्या या कंदमुळाचा आहारात सॅलड म्हणून वापर मर्यादित असल्याचे दिसून येते. बीटापासून जर विविध प्रक्रिया केलेले पदार्थ बनवले, तर बीटाचा आहारात समावेश वाढवता येऊ शकतो, तसेच प्रक्रिया उद्योगातून चांगला रोजगारही मिळवता येऊ शकतो.

Tuesday, February 14, 2017 AT 06:00 AM (IST)

स्वॉट ॲनालिसिसचा उपयोग व्यवसायात जमेच्या बाजूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, व्यवसायातील धोके कमी करण्यासाठी व वेगवेगळ्या संधींचा आवश्यक फायदा घेण्यासाठी अग्रक्रमाने होतो. शेळीपालन व्यवसायातील सर्वोच्च उंची गाठण्यासाठी एक चौकटबद्ध उपाययोजना करण्यासाठी स्वॉट ॲनालिसिसचा उपयोग होऊ शकतो. कोणताही व्यवसाय सुरू करायचा असल्यास स्वॉट ॲनालिसिस (swot analysis) ला खूप महत्त्व आहे.

Wednesday, February 08, 2017 AT 06:00 AM (IST)

डॉ. जितेंद्र ढेमरे, विक्रम कड हंगामात एकाच वेळी भरपूर प्रमाणात बोरांची उपलब्धता असते. त्यामुळे बोरापासून सरबत, बोरकूट, चटणी अाणि लोणचे असे टिकाऊ पदार्थ तयार करून चांगला फायदा मिळवता येतो. सरबत -  बोरातील बी काढून, काप करावेत. ज्युसरने बोराचा लगदा तयार करावा. लगदा मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. एक किलो बोरापासून साधारणपणे ४००-५०० मिलिलिटर रस मिळतो. या रसाचा उपयोग सरबत करण्यासाठी करावा.

Wednesday, February 08, 2017 AT 06:00 AM (IST)

नीता काटे कापूस हे वस्त्र उत्पादनासाठी नैसर्गिकरीत्या धागा देणारे पीक आहे. भारताच्या व्यापारी पिकामध्ये कापसाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. वस्त्रोद्योग निर्मितीसाठी ८५ टक्के कच्चा माल हा कापसाच्या स्वरूपात पुरवला जातो परंतु वस्त्रनिर्मिती व्यतिरिक्त कापसाचा उपयोग बोर्ड बनविण्यासाठी, बायोगॅस, जनावरांसाठी ढेपस्वरूपात, तसेच सरकीच्या तेलाच्या स्वरूपात होतो.

Tuesday, February 07, 2017 AT 06:00 AM (IST)

निरोगी व स्वच्छ गाईच्या कासेतून येणारे दूध हे प्रथमतः स्वच्छ असते. ज्या वेळी त्याचा अस्वच्छ किंवा दूषित वातावरणाशी संबंध येतो, त्या वेळी जंतूंचा शिरकाव होऊन ते लवकर खराब होते. खराब दूध शरीरास व आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतेच पण ते जास्त वेळ टिकून राहत नसल्याने त्याची प्रतवारी घसरते आणि मागणीही कमी होते. म्हणूनच स्वच्छ दुग्धोत्पादन ही आवश्यक बाब आहे.

Tuesday, February 07, 2017 AT 06:00 AM (IST)

संपूर्ण भारतावर हवेचा १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार असून, विषववृत्तापासून ५ अंश दक्षिण अक्षांशावर हवेचा दाब १०१६ हेप्टापास्कल इतका अधिक राहणार आहे. मुंबईच्या पूर्व दिशेस १५० ते २०० किलोमीटर अंतरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता अाहे. बंगालच्या उपसागरावरही हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे शक्य असल्याने या भागात वाऱ्याच्या दिशेत बदल जाणवतील आणि काही प्रमाणात हवामान बदलही जाणवतील.

Saturday, February 04, 2017 AT 06:00 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: