Last Update:
 
ऍग्रो स्पेशल
एक गाव एक कडबाकुट्टी यंत्र लातूर जिल्ह्यातील मावलगाव (ता. अहमदपूर) ग्रामपंचायतीने मागील खरिपातील भीषण चाराटंचाईवर सामुदायिक प्रयत्नातून मात केली आहे. एक गाव एक कडबाकुट्टी यंत्र हा उपक्रम गावात राबवण्यात आला. त्यातून ग्रामस्थांचा महिन्याकाठी चाऱ्यावर होणारा एकूण काही लाख रुपये खर्च वाचला आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आपली जनावरे सांभाळता आली. दुष्काळावर मात करण्यासाठी शोधलेला हा उपाय अत्यंत प्रशंसनीय असाच आहे.

Tuesday, March 03, 2015 AT 05:30 AM (IST)

भातशेतीतून फार काही शिल्लक राहत नसलेल्या डहाणू तालुक्‍यातील पुंजावे येथील अंतू धोडी यांना मोगरा शेतीचा पर्याय मिळाला. त्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून त्याचे उत्तम व्यवस्थापन केले. आज याच पिकाने धोडी कुटुंबीयांच्या जीवनात सुख-समाधानाचा दरवळ आणला आहे. उत्तम सहाणे ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्‍यात जवळपास 80 टक्के शेतकरी आदिवासी आहेत. राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत शेतीच्या खऱ्या तंत्रज्ञानापासून अजूनही तसे ते दुरावले आहेत.

Tuesday, March 03, 2015 AT 05:30 AM (IST)

जळगाव जिल्ह्यात प्रक्रियेला "वापसी' केळ्यांना चालना ग्राहकांचीही पसंती केळी लागवडीसह उत्पादनात आघाडीवर असलेला जळगाव जिल्हा या पिकातील प्रक्रियेच्या बाबतीत इतके दिवस पिछाडीवर होता. मात्र शेतकऱ्यांनी आता स्वतः पुढाकार घेऊन कमी खर्चात "बनाना चिप्स' निर्मितीला चालना दिल्याने जिल्ह्यात केळीचे चांगले मूल्यवर्धन साधले आहे.

Monday, March 02, 2015 AT 06:00 AM (IST)

यवतमाळ जिल्ह्यातील वानेगाव येथील भगवंत चव्हाण यांचे प्रियंका उद्यान सेंद्रिय शेतीचे आगार बनले आहे. त्यांच्या माळरान जमिनीवर फुललेली संत्रा, चिकू, आंबा, लिंबू आदी फळपिके जिभेवर अस्सल सेंद्रिय वेगळी चव खेळवत ठेवतात. गहू, हरभरा, सोयाबीन ही पिकेही भरभरून उत्पादन देतात. जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी सेंद्रिय शेतीचा वसा आपण घेतला असल्याचे ते सांगतात.

Monday, March 02, 2015 AT 05:45 AM (IST)

राज्याचा कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी किती, हा प्रश्‍न आम्हा सर्व शेतकऱ्यांना आहे. केवळ पदांची उतरंड आणि त्यांचे बडेजाव पोसण्यास कृषी विभागाचा खर्च होताना दिसतो. शेतकरी स्वत: करत असलेल्या प्रगतीचे गोडवे स्वत:च्या कर्तृत्वाचा आलेख म्हणून मांडण्याचा विभागाकडून होत असलेला केविलवाणा प्रयत्न सर्वांचीच दिशाभूल करणारा आहे.

Monday, March 02, 2015 AT 05:00 AM (IST)

कामगार, कष्टकरी आणि शेतकऱ्यांचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची नुकतीच हत्या करण्यात आली. गेली सहा दशके महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक आदी क्षेत्रात आपले पुरोगामी विचार परखडपणे मांडणाऱ्या कॉम्रेड पानसरे यांची 4 डिसेंबर 2011 ऍग्रोवनमध्ये मुलाखत प्रसिद्ध झाली होती. यातील काही अंश... शेतीकडे केलेले दुर्लक्ष हाच सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न आहे.

Monday, March 02, 2015 AT 04:30 AM (IST)

डॉ. आर. बी. अंबादे, डॉ. पी. व्ही. मेश्राम कोंबड्यांना उन्हाळ्यात मुबलक व थंड पाण्याचा पुरवठा करावा. उन्हाळ्यात 75 अंश फॅरनहीट (23 अंश सेल्सिअस) तापमानापेक्षा जास्त झालेल्या प्रत्येक अंश सेल्सिअस तापमानातील वाढीस चार टक्के पाणी जास्त पितात. * पाण्यामधून आवश्‍यकता असल्यास बर्फाचा वापर करावा. * उन्हामुळे येणारा ताण कमी करण्यासाठी पाण्यामधून "अ,' "इ' व "क' जीवनसत्वे शिफारशीनुसार मिसळून द्यावीत.

Saturday, February 28, 2015 AT 05:45 AM (IST)

दुष्काळी स्थितीनुसार आंबा, चिंच यांचे नियोजन नगर जिल्ह्यात श्रीगोंदा येथील पांडुरंग व श्रीरंग या कापसे बंधूंनी सततच्या दुष्काळी परिस्थितीवर उपाय शोधताना पीक पद्धतीत बदल केला. ज्वारीची पट्टा व ठिबक पद्धतीने लागवड, आंबा व चिंच अशा कमी पाणी लागणाऱ्या पिकांची निवड असे पर्याय त्यांनी वापरले. प्रचलित पद्धतीपेक्षा यंदा ज्वारी व कडब्याचे उत्पादन त्यांना दीड ते दुपटीने अधिक मिळाले आहे .

Saturday, February 28, 2015 AT 05:30 AM (IST)

एम. आर. शेटे आता सध्या विविध ठिकाणी कूपनलिका (बोअरवेल) घेण्याचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी जुन्या कूपनलिकंमध्ये गाळ भरल्याने पंप खराब होण्याचे प्रमाणही अधिक आहे. गुजरातमध्ये काम करताना एक बोअरवेल घेण्याची वेळ आली. तेथील बोअरवेल खोदणाऱ्या व्यक्तीने त्या छिद्राचा व्यास अधिक ठेवत, त्यात केसिंग पाइप सोडल्यानंतर जाड वाळू भरल्याचे पाहिले. ही पद्धत अत्यंत कार्यक्षम असल्याचे दिसून आले.

Saturday, February 28, 2015 AT 05:15 AM (IST)

पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी असलेल्या जमिनीची निवड शेततळे खोदण्यासाठी करावी. खोदाईचा खर्च कमी होईल, अशी जागा निवडावी. शेताच्या क्षेत्रफळानुसार शेततळ्याचे आकारमान ठेवावे. वैजनाथ बोंबले पाणलोट क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी जमिनीचा उतार तीन टक्के आहे आणि शेततळ्यामुळे आजूबाजूची जमीन खारवट होणार नाही, अशी जागा शेततळ्यासाठी निवडावी. साधारणतः शेताच्या एकूण क्षेत्रफळाच्या पाच टक्‍क्‍यांपर्यंत शेततळ्याचे क्षेत्रफळ असावे.

Saturday, February 28, 2015 AT 05:15 AM (IST)

विहीर पुनर्भरण - जमिनीमध्ये वेगवेगळे भिन्न थर आढळतात. या थरांची जाडी, आकारमान वेगवेगळे असते. पहिला थर मातीचा असून, या थरातून पाणी मुरण्याचा वेग हा दर दिवसाला साधारणपणे 2 सें.मी. असतो. मुरमाच्या थरातून पाणी वाहण्याचा दर 10 सें.मी. असू शकतो. खडकांना भेगा, फटी, सळ व सूक्ष्म छिद्रे असतात. त्या खडकातून पाणी वाहण्याचा दर हा 200 सें.मी. एवढासुद्धा असू शकतो.

Saturday, February 28, 2015 AT 05:00 AM (IST)

पाणी आणि खते या शेतीतील दोन अत्यंत महत्त्वाच्या निविष्ठा आहेत. दोन्ही निविष्ठांचा ठिबक सिंचन पद्धतीमधून वापर केल्याने दोन्ही निविष्ठांची कार्यक्षमता 80 ते 90 टक्के मिळते, त्यामुळे पिकाचे अधिक उत्पादन तर मिळतेच आणि उच्चतम गुणवत्ताही मिळते. त्याचबरोबर वापरामध्ये अनुक्रमे 50 ते 60 टक्के आणि 25 ते 30 टक्के बचत होऊन खर्चामध्येही मोठी बचत होते. बी. डी.

Saturday, February 28, 2015 AT 04:45 AM (IST)

जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार, स्वच्छ गोठा, नियमित लसीकरण, जंतनाशकाच्या बरोबरीने स्वच्छ पिण्याचे पाणी आवश्‍यक असते. डॉ. गजानन ढगे जनावरांच्या आरोग्यासाठी खाद्याच्याबरोबरीने पाण्याची गरज फार महत्त्वाची आहे. शरीरात वजनाच्या 60 ते 70 टक्के (म्हणजे साधारण 300 किलो वजन असलेल्या जनावराच्या शरीरात साधारणपणे 180 ते 200 लिटर पाणी ) पाणी असते. शारीरिक गरजेच्या 30 ते 40 टक्के पाणी कमी झाल्यास जनावरे मृत्युमुखी पडतात.

Saturday, February 28, 2015 AT 04:45 AM (IST)

खगोल निरीक्षणाच्या महाकाय दुर्बिणीमुळे जगाच्या नकाशावर ठळक झालेल्या खोडद (ता. जुन्नर, जि. पुणे) गावातील एकनाथ थोरात यांच्यावर तब्बल दहा वर्षे जिवाभावाने केलेला वैद्यकीय औषध विक्री व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. अशा स्थितीतही खचून न जाता स्वतःभोवतीची सुरक्षित चौकट मोडून शेडनेटमधील भाजीपाला उत्पादनाचा मार्ग त्यांनी धरला.

Friday, February 27, 2015 AT 05:30 AM (IST)

कृषी आणि ग्रामविकासाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी कारण योजनातच विकास दडलेला असतो. योजना यशस्वीपणे राबविल्या गेल्या तर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे. याकरिता शासकीय यंत्रणेमार्फत जबाबदारीने आणि अधिक गतीने कामकाज होण्यासाठी बायोमेट्रिक हजेरीपटाचा वापर ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हा परिषद स्तरापर्यंत कार्यान्वित करण्याबाबत प्रस्तावित आहे.

Thursday, February 26, 2015 AT 06:00 AM (IST)

वाठार ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम पुणे बंगळूर महामार्गावर कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर वाठार (ता. हातकणंगले) हे सुमारे सात हजार लोकसंख्येचे गाव आहे. मध्यवर्ती ठिकाणामुळे या गावाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विविध विकासकामांबरोबरच, परिसरातील माळावर हजारो झाडे लावून तिथे गारवा आणण्याचा प्रयत्न केला आहे. वाठार गावापासून एक किलोमीटर अंतरावर गावाला पाणीपुरवठा करणारी टाकी आहे.

Thursday, February 26, 2015 AT 05:45 AM (IST)

गारपीट, पाणीटंचाई व मजूरटंचाईने जेरीस आलेल्या लक्ष्मण आणि योगेश कातड या पितापुत्रांनी पीक पद्धतीत बदल करून शेती आर्थिकदृष्ट्या नफ्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. दरी (ता. जि. नाशिक) या द्राक्षासाठी प्रसिद्ध पट्ट्यात त्यांनी द्राक्षाकडून पेरू, डाळिंब शेतीकडे मोर्चा वळवला. त्यास टोमॅटो, बाजरी, ज्वारी, शेवगा, चिकू आदी पिकांची जोड दिली. बहुपीक पद्धतीच्या नियोजनामुळे त्यांना एकपीक पद्धतीतील समस्यांवर मात करणे शक्‍य झाले आहे.

Wednesday, February 25, 2015 AT 05:30 AM (IST)

बारामती तालुक्‍यातील शेतकऱ्यांची गटशेती शेतीतील आजच्या विविध समस्या सोडवायच्या तर एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. बारामती (जि. पुणे) तालुक्‍यातील विविध गटांतील शेतकऱ्यांनी याच हेतूने एकत्र येत कंपनीची स्थापना केली आहे. विविध शेतीमाल उत्पादित करणे, त्याची थेट ग्राहकांना विक्री करून समाधानकारक दर मिळवणे, निविष्ठा व शेती उत्पादन खर्चात बचत करणे आदी विविध हेतू त्यातून साध्य होणे शक्‍य होणार आहे.

Wednesday, February 25, 2015 AT 05:30 AM (IST)

अलीकडील काळात पाणीटंचाई, दुष्काळाची तीव्रता यामुळे शेती न परवडणारी झाली आहे. अशा परिस्थितीत आपल्यातील प्रयोगशील वृत्ती सतत जागी ठेवत, अभ्यासू वृत्तीतून औरंगाबाद जिल्ह्यातील फेरण जळगाव येथील सिकंदर जाधव यांनी शेती किफायतशीर केली आहे. विविध पीक उत्पादनांत सातत्याने सरस कामगिरी केल्याने त्यांना शेतीतील "सिकंदर' म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Tuesday, February 24, 2015 AT 05:45 AM (IST)

इच्छा तिथे मार्ग सापडतो हा विश्‍वास अनसिंग (ता. जि. वाशीम) येथील राजाभाऊ इंगळे या युवा शेतकऱ्याने सार्थकी लावला आहे. कलाशाखेचे शिक्षण घेऊन नोकरीपेक्षा राजाभाऊंनी शेतीतच करिअर करीत निंबोळी पावडर, तेल, पेंड, तसेच गांडूळ खत विक्री उद्योगात पाय रोवत विदर्भात उद्योजकतेचा आदर्श निर्माण केला आहे. आजच्या युगात सेंद्रिय किंवा रासायनिक अवशेषरहित शेतीचे महत्त्व वाढल्याने राजाभाऊंच्या व्यवसायाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Tuesday, February 24, 2015 AT 05:30 AM (IST)

केवळ 50 हजार रुपयांत बनवले तंत्रज्ञान सात एकर ऊस पिकात केला प्रयोग गरज हीच शोधाची जननी म्हणतात. वाठार किरोली (जि. सातारा) येथील श्रीधर पिंगळे यांनी आपल्या शेतातील गंभीर मजुरी समस्या लक्षात घेऊन त्यावर उपाय शोधला आहे. शेताला पाणी देण्यासाठी अवघ्या 50 हजार रुपयांत स्वयंचलित ठिबक यंत्रणा घरच्या घरी तयार केली आहे. मजुरीबरोबरच त्यांनी पाणीवापरातही बचत साधली आहे. विकास जाधव सातारा जिल्ह्यातील वाठार (किरोली, ता.

Monday, February 23, 2015 AT 05:45 AM (IST)

आम्ही 600 ते 700 शेतकरी आहोत. मौजे पांढरेवाडी - पुजारवाडी दिघंची (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे आमची इनाम वर्ग -3 शेत जमीन आहे. या शेतीचे 23 मे 2011 च्या आदेशाने (फेरफार क्रमांक मौजे पुजारवाडी दिघंची 1896 व पांढरेवाडी 1043 प्रमाणे इतर हक्कांत आम्हा सर्व शेतकऱ्यांचे नाव दाखल केलेले आहे. वास्तविक पाहता सदरचे आदेश देवस्थान जमिनीतील अनधिकृत हस्तांतरणाबाबतचे आहे. आमच्या कोणत्याही जमिनी हस्तांतरित झालेल्या नाहीत.

Monday, February 23, 2015 AT 05:30 AM (IST)

स्थानिक शेळ्यांचे संगोपन जामनेर येथील वैद्यकीय व्यवसायाचा नियमित व्याप सांभाळून बालरोगतज्ज्ञ डॉ. सुभाष पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील खडके बुद्रुक (ता. एरंडोल) येथे शेळीपालन सुरू केले आहे. त्याठिकाणी अर्धबंदिस्त पद्धतीने स्थानिक गावठी शेळ्यांच्या संगोपनावर भर दिला आहे. स्वतः जातीने लक्ष देऊन करडांची मरतूक अत्यंत कमी करण्यासह शेळीपालनास व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे.

Monday, February 23, 2015 AT 05:15 AM (IST)

मी एक सुशिक्षित तरुणी आहे. 2005 मध्ये माझे हस्ते पिंपळगाव (ता. जि. जालना) येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात लग्न झाले. मला शेतीतील काम येत नसल्याने, गेली 5 वर्ष उदरनिर्वाहासाठी शेतमजुरीचे काम केले, पण यातून परिवाराचा चरितार्थ चालविणे कठीण होऊ लागले. म्हणून 15 जानेवारी 2008 ला घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शेतीला पूरक व्यवसाय करता येईल का याचा परिवारासोबत विचारविनिमय केला.

Monday, February 23, 2015 AT 05:15 AM (IST)

महाराष्ट्रात हरभरा, तांदूळ, मका, वांगे आणि कापूस यांच्या जनुकीय बियाण्यांच्या शेतीचाचणीला परवानगी देण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह म्हणायला हवा. भविष्यातील विकासाच्या दृष्टीने ही प्रारंभिक आवश्‍यकता आहे. यातून पर्यावरणावर, उत्पादनाच्या पोषणमूल्यांवर, मानवी आरोग्यावर परिणाम शोधणे, प्रतिकूल परिणामांची तीव्रता कमी करून अनुकूल परिणामांची शक्‍यता वाढवणे या दृष्टीने आणखी संशोधन करणे आवश्‍यक आहे.

Monday, February 23, 2015 AT 03:30 AM (IST)

हजार "जू' आमच्या खांद्यावर! कुठलं "जू' उतरवून ठेवायचं? कुठल्याचा भार सहन करायचा? याची निवड करणं त्यावेळेला नियतीनं आमच्या हाती निर्णय ठेवला नव्हता पण आज तो निर्णय माझ्या हातात आहे. तोच करील आता आमची या "जू'च्या दास्यातून मुक्तता. आई नेहमी म्हणायची "लेका उकीरड्याची दैना बी एक ना एक दिवस फिटतेच तशी आपली बी दैना फिटंलंच एक ना एक दिवस!' खरोखरंच ती वेळ आली होती की काय. एवढं मात्र झालं होतं की कंदिलाच्या काचेची काजळी झटकून काच नितळ झाली होती.

Sunday, February 22, 2015 AT 12:30 AM (IST)

ग्लोबलायझेशन कितीही आलं असल, तरी सहकार हा काही संपणारा विषय नाही. 1904 मध्ये सुरू झालेला हा सहकार आता 110 वर्षे झाली, तरी कालानुरूप बदल स्वीकारीत व्यवस्थित सुरू आहे. या स्थितीत आता ती नुसती सहकार चळवळ न राहता सहकाराची संस्कृती तयार झालीय. व्यक्तिगत आणि संस्थात्मक पातळीवर संपूर्ण शिस्त बाळगून या संस्कृतीशी जोडून राहा. सहकारात परिवर्तनाची आणि उत्थानाची ताकद नक्कीच आहे...

Sunday, February 22, 2015 AT 12:15 AM (IST)

कोस्टारिकातील शेतीला मिळतेय प्रगतीची दिशा मध्य अमेरिका खंडातील कोस्टारिका हा देश केळी, अननस आणि ऊस शेतीसाठी ओळखला जातो. या देशातील अर्थ विद्यापीठात जगभरातील विद्यार्थी आणि प्राध्यापक शिक्षणासाठी येतात. त्यामुळे या विद्यापीठात जगभरातील संशोधन आणि कृषी शिक्षणातील घडामोडी शिकायला मिळतात. मध्य अमेरिका खंडातील कोस्टारिका देशातील अर्थ विद्यापीठाच्या शिक्षण प्रणालीचा अभ्यास करण्याची संधी आम्हाला मिळाली.

Sunday, February 22, 2015 AT 12:00 AM (IST)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील "भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान' ही संस्था शाश्‍वत ग्रामीण विकासामध्ये सन 2004 पासून कार्यरत आहे. शेतकऱ्यांना शेती आणि पूरक उद्योगातील विज्ञान आणि तंत्रज्ञान सोप्या भाषेमध्ये समजाऊन सांगितले तर नक्कीच पीक आणि पूरक व्यवसायामध्ये चांगला बदल होतो, हे संस्थेने शेतकऱ्यांच्या सहयोगातून दाखवून दिले आहे. सिंधुदुर्ग हा राज्यातील निसर्गरम्य जिल्हा. भातशेती, आंबा, काजू, नारळाची बागायती आणि मासेमारी ही जिल्ह्याची ओळख.

Sunday, February 22, 2015 AT 12:00 AM (IST)

शेतीतील शिक्षण, अभ्यासाला नेटक्‍या नियोजनाची जोड दिल्यास खडकाळ माळरानावर नंदनवन बहरू शकते. याचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील काळेवाडी (दिवे) येथील युवा शेतकरी नितीन जाधव यांची अंजीर शेती पाहिल्यावर येतो. उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन, दर्जेदार माल पिकवण्याची हातोटी साधत त्यांनी शेतीत आश्‍वासक चित्र निर्माण केले आहे. संतोष डुकरे पुणे शहराहून सासवडला जाताना दिवे घाट ओलांडला की डावीकडे काळेवाडी गाव लागते.

Saturday, February 21, 2015 AT 05:30 AM (IST)

मार्केटिंगमध्ये जो चतुर, यश त्याच्यासाठी आतुर असे म्हटले जाते. केवळ शेतमालाची विक्री करण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया केली, बाजारपेठेची गरज ओळखून त्याचे पॅकिंग व ब्रॅंडिंग केले तर निश्‍चितच नफ्याचे मार्जिनही वाढते. ही अनुभूती समुद्रपूर तालुक्‍यातील (जि. वर्धा) शेतकरी घेत आहेत. चव, रंग तसेच कुरकुमीनचे प्रमाण अधिक असलेल्या वायगाव हळदीचा माई ब्रॅंड तयार करून या शेतकऱ्यांनी सक्षम बाजारपेठ मिळवण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत.

Saturday, February 21, 2015 AT 05:30 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: