Last Update:
 
ऍग्रो व्हिजन
अमेरिकेतील टेनिसी विद्यापीठातील संशोधकांचे मत निसर्गाशी मिळवून घेतच संवर्धनाच्या उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे अमेरिकेतील टेनिसी विद्यापीठामध्ये कार्यरत संशोधकांनी केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. त्यासंदर्भात संशोधकांनी काही सूचना व कल्पना मांडल्या असून, त्या पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्थांसाठी उपयुक्त ठरू शकतील. निसर्गामध्ये सातत्याने बदल होत असतात. वातावरणातील बदलांचे परिणाम विविध प्रजाती व पर्यावरणावर होत असतात.

Thursday, March 05, 2015 AT 05:45 AM (IST)

सजीवतेची अतिसूक्ष्म पातळीपर्यंत पोचण्यात आले यश लॉरेन्स बर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेतील संशोधकांनी अतिसूक्ष्म जिवाणूंची प्रथमच विस्तृत अशी सूक्ष्मदर्शकीय प्रतिमा मिळवली आहे. त्यामुळे अतिसूक्ष्म सजीवाविषयी पहिल्यांदा पुरावा मिळण्यास मदत झाली आहे. याविषयी "जर्नल नेचर कम्युनिकेशन्स' मध्ये अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. अतिसूक्ष्म जिवाणूंच्या अस्तित्वाविषयी गेल्या दोन दशकांपासून वादचर्चा सुरू होत्या.

Thursday, March 05, 2015 AT 05:30 AM (IST)

झोडगे (ता. मालेगाव) येथील रहिवासी तुषार विठ्ठल नेरकर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये राज्यात प्रथम, तर देशात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. जिद्द आणि दृढ संकल्पाच्या ग्रामीण भागातील तुषारने घेतलेली गगनभरारी सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल अशीच आहे. स्पर्धा परीक्षेच्या यशापर्यंत घेऊन जाणाऱ्या प्रयत्नांच्या वाटचालीबद्दल तुषार यांच्याशी साधलेला हा संवाद. आपली कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्‍वभूमी सांगा.

Wednesday, March 04, 2015 AT 05:45 AM (IST)

प्रक्रिया उद्योगातून गरिबी, अपंगत्व यावर मात पैशाअभावी शिक्षण अर्धवट सोडावे लागल्याची अनेक उदाहरणे सापडतील परंतु परभणी येथील कृषी महाविद्यालयातील प्रियंका आठवले ही विद्यार्थिनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर गरिबी, अपंगत्व यावर मात करत फळ प्रक्रिया उद्योगातून स्वावलंबी होत कृषी शिक्षण घेत आहे. यातून तिने कुटुंबालादेखील आर्थिक आधार दिला आहे.

Wednesday, March 04, 2015 AT 05:30 AM (IST)

हिमालयीन चक्रावाताचा दणका कर्नाटकपर्यंत... अफगाणिस्तानच्या बाजूने हिमालयीन भागात दाखल होणाऱ्या पश्‍चिमी चक्रावाताची तीव्रता वाढून त्याचा प्रभाव थेट कर्नाटकपर्यंत जाणवल्यामुळे महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. गेल्या तीस वर्षांत प्रथमच अशी स्थिती उद्‌भवल्याची माहिती हवामान विभागातील सूत्रांनी दिली. यापुर्वी 17 फेब्रुवारी 1984 दरम्यान अशीच स्थिती उद्‌भवून महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी गारपीट व जोरदार पाऊस झाला होता.

Tuesday, March 03, 2015 AT 05:45 AM (IST)

हंडेवाडीतील सुनील घुमरे यांची अभिनव संकल्पना सध्या सुरू असलेल्या संततधार आणि गारपिटींच्या इशाऱ्यानंतर द्राक्ष घड वाचविण्यासाठी हंडेवाडी (ता. कोपरगाव, जि. नगर) येथील सुनील घुमरे या युवा शेतकऱ्याने अभिनव कल्पना लढविली आहे. ऍल्युमिनियम फिल्म पत्रावळीच्या कागदाचा कोन करून द्राक्ष घडाला संरक्षण देण्याचा प्रयत्न श्री घुमरे यांनी केला आहे.

Tuesday, March 03, 2015 AT 05:30 AM (IST)

जिवाणूवर आधारित ऊर्जारहीत पद्धती तेल व वायू निर्मिती उद्योगात प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यातील क्षार आणि अन्य प्रदुषकांना दूर करण्यासाठी कोलोरॅडो बाऊल्डर विद्यापीठातील अभियंत्यांनी सोपी पद्धती विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये जिवाणूवर आधारित असून, काही प्रमाणात ऊर्जा निर्मितीही शक्‍य आहे. हे संशोधन "एन्व्हायर्नमेंटल सायन्स वॉटर रिसर्च अँड टेक्‍नॉलॉजी'मध्ये प्रकाशित झाले आहे.

Monday, March 02, 2015 AT 05:45 AM (IST)

कृषी पराशरमध्ये शेतीतील जलसंवर्धनासह, नांगरणी, नांगरांचे नेमके स्वरूप याविषयी विस्तृत विचार मांडण्यात आले आहेत. येणाऱ्या पावसाचे प्रत्येक नक्षत्रातील प्रमाण यांचाही विचार पाणी साठविण्यासाठी कसा करता येईल, या विषयी काही श्‍लोक आहेत. डॉ. रजनी जोशी शेणखताविषयी माहिती  - कृषिपराशर ग्रंथात शेणखताविषयी तीन श्‍लोक (109 ते 111) आहेत. - शेण वाळवून त्याची पूड करून खत खड्ड्यात घालण्यास सांगितले आहे.

Saturday, February 28, 2015 AT 05:30 AM (IST)

स्पेन येथील टॅरांगोना आणि गिरोना या भागामध्ये ऊस पिकामध्ये पिवळ्या रंगाची मावा ही कीड प्रथमच आढळली आहे. ही उत्तर आफ्रिकेतून आली असण्याची शक्‍यता संशोधकांनी अहवालामध्ये व्यक्त केली. यलो शुगरकेन अफिड या नावाने ओळखली जाणारी ही कीड गवतवर्गीय पिकांवर रसशोषण करते.

Friday, February 27, 2015 AT 05:30 AM (IST)

आयर्लंड येथील ट्रिनिटी महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्रज्ञांना मातीमध्ये दोन बुरशी आढळल्या असून, सामान्यतः बियाणे खराब करणाऱ्या अन्य बुरशींना रोखण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्याचे प्रयोग बार्लीवर करण्यात आले असून, या बुरशींची प्रक्रिया केलेल्या पिकांचे तग धरण्याचे प्रमाण सहा पट अधिक असल्याचे आढळले आहे. हे संशोधन "बायोकंट्रोल' या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले.

Thursday, February 26, 2015 AT 05:30 AM (IST)

रोगप्रतिकारकता, ओलेईक ऍसिडचे अधिक प्रमाण यामुळे शेतकरी, ग्राहकांसाठीही फायदेशीर अमेरिकी कृषी विभागाने नुकतीच नवीन स्पॅनिश भुईमुगाची जात प्रसारित केली असून, त्यामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त अशा ओलेईक ऍसिडचे प्रमाण अधिक आहे. या जातीचे नाव "ओले' (OLe) असे ठेवण्यात आले आहे. तसेच ही जात रोगांना प्रतिकारक, अधिक साठवण कालावधीची असल्याने ग्राहक आणि उत्पादक शेतकऱ्यांसाठीही अधिक फायदेशीर ठरणार आहे. भुईमूग हे जागतिक पातळीवर महत्त्वाचे गळीत धान्य पीक आहे.

Thursday, February 26, 2015 AT 05:15 AM (IST)

पुणे येथील उद्यानविद्या महाविद्यालयात भविष्यात उपयोगी ठरणाऱ्या प्रात्यक्षिकाधारीत कृषी शिक्षणावर भर दिला जात आहे.चौथ्या वर्षीच्या विद्यार्थीनींच्या दोन गटांनी पाच गुंठे क्षेत्रातील पॉलिहाऊसमध्ये कोकोपीटवर काकडी, ढोबळी, मिरची यासारख्या पिकांची लागवड केली आहे.

Wednesday, February 25, 2015 AT 05:45 AM (IST)

जॉन मेनार्ड केन्स यांचा जन्म 5 जून 1883 या दिवशी इंग्लंडमधील केंब्रिज येथे झाला. केन्स यांचे वडीलही अर्थशास्त्रज्ञ होते. ते केंब्रिजमध्ये अर्थशास्त्राचे अध्यापन करत असत, तर आई केंब्रिजमध्ये अध्यापन करणारी पहिली स्त्री होती. अशा उज्ज्वल शैक्षणिक पार्श्‍वभूमीमुळे केन्स यांना शिक्षणासाठी घरातून पूर्ण पाठिंबा होता. लहान वयापासूनच त्यांना अर्थशास्त्राची ओढ होती. लहानपणी केन्स नाजूक प्रकृतीमुळे शाळेत बराच काळ गैरहजर असत.

Wednesday, February 25, 2015 AT 05:45 AM (IST)

प्रात्यक्षिकासह मिळताहेत संशोधनाचे धडे औरंगाबाद येथील एमआयटीमधील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी "हायटेक टेरेस फार्मिंग'चा प्रयोग प्रत्यक्षात उतरविला आहे. जागेअभावी फुलशेती, फळशेतीचा प्रयोग महाविद्यालयाच्या छतावर शेडनेटमध्ये यशस्वीरीत्या करणाऱ्या या विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानासह शेतीतील बारकाव्यांचा अभ्यास करण्याची सोय झाली आहे.

Wednesday, February 25, 2015 AT 05:15 AM (IST)

डॉ. मधुकर बाचूळकर शास्त्रीय नाव  - क्‍लिरोडेन्ड्रम मल्टिफ्लोरम (Clerodendrum multiflorum) कुळ  - व्हर्बेंनसी (Verbenaceae) अन्य मराठी स्थानिक नावे  - ऐरण, टाकळ, नलावरी. संस्कृत नावे  - गणिकारिका, वैजयन्तिका, क्षुद्र अग्निमंथ हिंदी नावे  - अरनी, टेकार, उरिन, गिनेरी, गनियारी, अमेथु, खरशाक, टाकलन, टाकालनी गुजराती नावे  - अरणी, आरखडी, भाऊरी टाकळीची मोठी झुडपे भारतात व श्रीलंकेत सर्वत्र आढळतात.

Tuesday, February 24, 2015 AT 05:30 AM (IST)

लहान वालकांपासूनच स्थूलत्वाचा विकार वाढताना दिसून येत आहे. या लहान मुलांच्या आहाराची सुरवात कमी मेदाचा व वनस्पतिजन्य शाकाहारी अन्नापासून केल्यास हृदयरोगाचा धोका कमी होत असल्याचे क्‍लेव्हलॅंड क्‍लिनिक येथे झालेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. मुलांचे संतुलित वजन, रक्त दाब, उंची व वजनाचे योग्य गुणोत्तर, कोलेस्टेरॉल पातळी, इन्सुलिन संवेदनशीलता या बाबीमध्ये चांगली सुधारणा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tuesday, February 24, 2015 AT 05:30 AM (IST)

जागतिक पातळीवर हरितगृह वायूंच्या वाढीवर मर्यादा आणण्यासाठी विविध नियम तयार करण्यात आले असले तरी ओझोन थरावर परिणाम करणाऱ्या अल्पकालावधीच्या रसायनांवर अद्यापही नियंत्रण शक्‍य झाले नसल्याचा अहवाल संशोधकांच्या गटाने दिला आहे. अत्यंत कमी कालावधीच्या घटकांचे प्रमाण वाढत असून, त्याविषयी संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. हे संशोधन "नेचर जियोसायन्स' मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

Monday, February 23, 2015 AT 06:00 AM (IST)

डरहॅम विद्यापीठात झाले जनुकीय संशोधन गहू पिकामध्ये "सेप्टोरिया लिफ ब्लॉच' (एसटीबी) या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतरच्या पहिल्या टप्प्यातच त्याला रोखणे शक्‍य होणार आहे. डरहॅम विद्यापीठातील संशोधकांनी गहू पिकातील एक प्रथिन ओळखले असून, त्याच्या पातळीत काही बदल केल्यास या बुरशीजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी फायदा होऊ शकतो.

Monday, February 23, 2015 AT 05:45 AM (IST)

महाभारत हे जनमानसामध्ये मोलाचे स्थान मिळवलेले महाकाव्य आहे. त्यामध्ये वृक्ष-वनस्पतींचे निरीक्षणजन्य निष्कर्षरूप ज्ञान कथेच्या ओघात उपमा रूपकांच्या रूपाने ग्रथित झालेले आढळून येते. वनस्पतींच्या चैतन्याविषयीचे उल्लेख - - महाभारतातील मोक्षधर्मपर्वात (12.174) वृक्ष-वनस्पती संवेदनाशील असतात. त्या चेतन असतात. केवळ चैतन्ययुक्तच नाहीत, तर पंचेंद्रियांच्याद्वारा होणारे ज्ञानही त्यांना होत असते, असे वर्णन आहे. मोक्षधर्मपर्वात (12.

Saturday, February 21, 2015 AT 05:45 AM (IST)

डॉ. रजनी जोशी पराशराने त्या काळाशी संबंधित उदाहरणे देत शेतीसाठी उत्तम व्यवस्थापनाची गरज असल्याचे सांगितले आहे. (श्‍लोक 79 ते 83) 2000 वर्षांपूर्वीची ही माहिती आजही उपयुक्त ठरू शकते. जोपर्यंत शेती अस्तित्वात आहे, तोपर्यंत पराशराचे हे मार्गदर्शन अत्यंत उपयोगाचे ठरेल. - शेताचे व्यवस्थापन योग्यप्रकारे झाल्यास शेत तुम्हाला सोन्यासारखे पीक देईल. आणि शेताची हेळसांड केल्यास तुम्हाला दारिद्य्र येईल.

Saturday, February 21, 2015 AT 05:45 AM (IST)

शिर्डी, जि. नगर  - ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्याबाबत साखर कारखान्यापुढे यंदाचे गळीत हंगामात अडचणी निर्माण झाल्या आहे. साखर उद्योगाचे प्रश्‍न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न वाढवावेत, अशा आशयाचे निवेदन राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना आमदार स्नेहलता कोल्हे यांनी येथे शुक्रवारी (ता. 17) दिले.

Saturday, February 21, 2015 AT 05:30 AM (IST)

स्वीडन येथील वराहपालन संघटनेच्या वतीने वराह पिलांची मर कमी करण्यासाठी पालन पद्धतीच्या विविध चाचण्या घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यासाठी स्वीडन येथील प्राणिपालनाविषयक कायद्याचा अडसर निर्माण झाला होता. चाचण्यांसाठी या कायद्यातून काही प्रमाणात सूट देण्याचा निर्णय स्वीडन मंत्रालयाने घेतला आहे. स्वीडन येथील प्राण्यांविषयीच्या कायद्यामुळे वराहपालनामध्ये पिलांच्या जन्मावेळी व दूध देणाऱ्या मादीसाठी वेगळ्या कक्षाची किंवा स्टॉलची सोय करावी लागते.

Friday, February 20, 2015 AT 05:45 AM (IST)

उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी आणून, झारखंड राज्यातील मांगोबांध (जि. रांची) येथील आदिवासी शेतकऱ्यांनी रब्बी आणि उन्हाळी पिकांचे नियोजन केले आहे. या गावामध्ये राळ (लाख) आणि डिंकाच्या उत्पादनालाही वेग मिळाला असून, भाजीपाला पिकांतून चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. झारखंड राज्यातील मांगोबांध (जि. रांची) या आदिवासी गावामध्ये पावसावर अवलंबून प्रामुख्याने भाताच्या स्थानिक जातीचे पीक घेतले जाते. तेही एकूण लागवडयोग्य जमिनीच्या केवळ 40 टक्के क्षेत्रावर.

Friday, February 20, 2015 AT 05:15 AM (IST)

मोहरी पेंड व माशांच्या उर्वरित अंशापासून अधिक दर्जेदार व उपयुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचा प्रयत्न फिनलॅंड येथील एका संशोधन प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे. त्यापासून पशुखाद्यासह जैविक कीडनाशक, प्रथिने व प्रसाधनांची निर्मिती करणे शक्य होणार आहे. त्यामुळे लघु खाद्य उद्योगासह शेतकऱ्यांनाही अधिक दर मिळण्यास मदत होईल.

Thursday, February 19, 2015 AT 05:30 AM (IST)

भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने सोयाबीनपासून लोणी निर्मितीच्या तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याचे व्यावसायिक हस्तांतरण नुकतेच करण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे सोयाबीनपासून उच्च दर्जाची प्रथिने मिळविणे शक्‍य होते. सोयाबीन प्रक्रिया उद्योगामध्ये सोया दूध आणि त्यापासूनच्या विविध पदार्थांचा समावेश होतो. गायीपासून मिळणाऱ्या दूधाच्या तुलनेमध्ये सोयाबीनपासूनचे दूध हे अधिक स्वस्त पडते.

Thursday, February 19, 2015 AT 05:30 AM (IST)

डॉ. दादाभाऊ यादव आणि डॉ. जितेंद्र दोरगे कृषी अर्थशास्त्र विभाग, म. फु. कृ. वि., राहुरी कार्ल हेन्रिक मार्क्‍स यांचा जन्म 5 मे 1818 मध्ये जर्मनीतील टायर येथे झाला. मार्क्‍स हे एक पर्शियन तत्त्वज्ञानी व अर्थशास्त्रज्ञच नव्हते तर समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, पत्रकार आणि क्रांतिकारी समाजवादी होते. ते सतत प्रयत्नवादी होते. त्यांचा जन्म एका सुखवस्तू मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

Wednesday, February 18, 2015 AT 05:45 AM (IST)

कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचा उपक्रम कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत नुकतेच रसवंतिगृह सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाने वाढविलेल्या जातिवंत वाणाच्या ऊस रसासाठी वापरण्यात येणार आहे. रसवंतिगृहाचे व्यवस्थापन विद्यार्थी करणार असून, त्यांचा आर्थिक मोबदलाही महाविद्यालयाकडून देण्यात येईल.

Wednesday, February 18, 2015 AT 05:00 AM (IST)

पाण्यात वेगाने वाढणाऱ्या फिस्टुलिफेरा सोलारिस या शेवाळामध्ये चांगले जैवइंधन पीक बनण्याची क्षमता असल्याचे फ्रान्स व जपान येथील संशोधकांच्या गटाने केलेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. हे संशोधन "दी प्लॅंड सेल ऑनलाइन' मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. जैवइंधन हे खनिज तेलांसाठी अधिक पर्यावरणपूरक पर्याय ठरू शकतो.

Tuesday, February 17, 2015 AT 12:00 AM (IST)

करंबळ शास्त्रीय नाव- डिलेनिया इंडिका (Dillenia indica) कूळ - डिलेनिएसी (Dilleniaceae) - स्थानिक नावे- करंबेळ, मोठा करमळ - संस्कृत नावे- भव्य, भाव्य - हिंदी नावे- चालत, चालता - इंग्रजी नावे- एलिफंट ऍपल (Elephant Apple), इंडियन कॅटमॉन (Indian catmon) होंडापारा ट्री (Handapara tree) करमळ किंवा करंबेळचे मध्यम आकाराचे देखणे वृक्ष भारत, श्रीलंका, नेपाळ या देशांत आढळतात.

Tuesday, February 17, 2015 AT 12:00 AM (IST)

कृषी पराशर ग्रंथातील पहिल्या 10 श्‍लोकांत पराशर ऋषींनी शेती, शेतकरी व अन्नाचे उत्पादन या सर्वांचे महत्त्व सांगितले आहे. पावसावर आधारित असल्याने पर्जन्याचा, हवामानाचा अंदाज घेण्याच्या विविध पद्धती सांगितल्या आहेत. डॉ. रजनी जोशी शेतकरीच खरा राजा  - - जो मनुष्य शेती करतो, तोच खऱ्या अर्थाने "भूपती' (भूमीचा धनी) असतो.

Saturday, February 14, 2015 AT 05:00 AM (IST)

ताण प्रतिकारक जातींच्या विकसनासाठी होणार मदत विषम हवामानात जंगली आणि लागवडीखाली टोमॅटो जातींची वाढ कशाप्रकारे होते, याचा शोध ऑस्टीन येथील टेक्‍सास विद्यापीठातील वनस्पतिशास्त्रज्ञ घेत आहेत. या अभ्यासातून प्रदीर्घ उष्ण वातावरण किंवा दुष्काळामध्ये तग धरणाऱ्या जातींचे विकसन करण्यामध्ये मोलाची मदत होणार आहे.

Friday, February 13, 2015 AT 06:00 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: