Last Update:
 
बाजारभाव
डॉ. रामचंद्र साबळे मध्य महाराष्ट्रावर आणि कोकणावर हवेचा दाब 1008 हेप्टापास्कल राहण्यामुळे या भागात हलक्‍या स्वरूपाची पावसाची शक्‍यता राहील. उत्तर महाराष्ट्रावरही तितकाच हवेचा दाब राहण्याची शक्‍यता असल्याने त्या भागातही पावसाचे प्रमाण तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचे राहील. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यावर 1006 हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार असल्यामुळे त्या भागात पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहील.

Saturday, August 29, 2015 AT 04:00 AM (IST)

नांदेड - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. 27) कांद्याची 50 क्विंटल आवक झाली होती. त्यास 3000 ते 5000 व सरासरी 4500 रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  बाजारात नव्या मुगाची आवक सुरू झाली असून, बुधवारी (ता. 26) पाच क्विंटल मुगाची आवक झाली होती. त्यास 6900 ते 7000 रुपये दर मिळाला. तूर 9100, केळी 600 ते 700 व हळदीला 7700 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

Saturday, August 29, 2015 AT 03:30 AM (IST)

सोलापूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.26) कोथिंबीर, मेथी, शेपू या पालेभाज्यांना अधिक मागणी असल्यामुळे यांचे दर वधारले होते, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गेल्या पंधरवड्यापासून भाज्यांच्या दरात वाढ आहे. कोथिंबिरीला चांगला उठाव मिळतो आहे. बाजार समितीच्या आवारात भाज्यांची रोज किमान 8 ते 10 हजार पेंढ्यांपर्यंत आवक होते.

Thursday, August 27, 2015 AT 06:30 AM (IST)

मुंबई - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. 24) कांद्याची 14453 क्विंटल आवक झाली होती. त्यास 5100 ते 6100 व सरासरी 6000 रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीमध्ये वाटाण्यांसह इतर भाज्यांचे दर तुलनेत वधारलेले आहेत. लसणाची 2338 क्विंटल आवक झाली होती. त्यास 4100 ते 7100 व सरासरी 5100 रुपये प्रति क्विंटल दर होता.

Wednesday, August 26, 2015 AT 06:00 AM (IST)

जळगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात साठवणुकीतील लाल कांद्याची दैनंदिन सरासरी 45 क्विंटलपर्यंत आवक झाली. मागणीनुसार पुरवठा नसल्याच्या स्थितीत कांद्यास 2500 ते 5000 व सरासरी 3500 रुपये प्रति क्विंटल दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत पालेभाज्यांच्या दरातील तेजी कायम होती. जळगाव परिसरातून विक्रीसाठी आलेल्या कोथिंबिरीचा सर्वाधिक 2000 ते 4000 रुपये प्रति क्विंटल दर होता.

Tuesday, August 25, 2015 AT 06:15 AM (IST)

सोलापूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक एकदमच कमी झाली. आवक कमी व मागणी वाढल्यामुळे कांद्याला सर्वाधिक प्रतिक्विंटल 7 हजार 400 रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक एकदमच कमी झाली. कांद्याची आवक रोज 40 ते 50 गाड्या होत होती. पण गतसप्ताहात कांद्याची आवक एकदमच 20 ते 25 गाड्यांपर्यंतच झाली. सगळी आवक बाहेरील जिल्ह्यातूनच राहिली.

Tuesday, August 25, 2015 AT 06:15 AM (IST)

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक घटल्याने तसेच सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्‍वभूमीवर मागणी वाढल्याने गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत कोथिंबिरीला तेजीचे दर मिळाले. गतसप्ताहात कोथिंबिरीच्या सरासरी 70 हजार जुड्यांची आवक बाजार समितीत झाली होती. त्यास प्रति शेकडा 800 ते 4500 व सरासरी 3000 रुपये दर मिळाले. कुंभमेळा अजून महिनाभर चालणार आहे. या स्थितीत अजून महिनाभर तरी कोथिंबिरीचे सध्याचे दर टिकून राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Tuesday, August 25, 2015 AT 06:15 AM (IST)

लासलगाव - येथील बाजार समितीत गत सप्ताहात उन्हाळ कांद्याची 22,430 क्विंटलची आवक झाली होती. त्यास 2500 ते 6326 व सरासरी 5040 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. डाळिंबाची 6982 क्रेटसची आवक होऊन त्यास 100 ते 1450 व सरासरी 1080 रुपये दर होता.

Tuesday, August 25, 2015 AT 06:00 AM (IST)

पुणे - गुलटेकडी येथील प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. 23) उच्चांकी म्हणजे सुमारे 250 गाडी भाजीपाल्याची आवक झाली. दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केल्याने आवक वाढल्याचे सांगण्यात आले. दक्षिणेतील राज्यांमधून मागणी असल्याचे आवक वाढूनही कांद्याचे वधारलेले दर स्थिर होते. मार्केट यार्डात जुन्या नव्या कांद्याची सुमारे 90 ट्रक आवक झाली.

Monday, August 24, 2015 AT 06:15 AM (IST)

औरंगाबाद (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. 22) कारल्याची 38 क्‍विंटल आवक झाली होती, त्यास 1400 ते 2000 रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत हिरव्या मिरचीची 89 क्‍विंटल आवक झाली होती, त्यास 600 ते 1500 रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला होता. कांद्याची आवक 35 क्‍विंटल आवक झाली होती, त्यास 2000 ते 5300 रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला.

Sunday, August 23, 2015 AT 12:00 AM (IST)

सातारा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. 20) कांदा, वाटाणा, कोथिंबीर तेजीत असून, दोडका, बटाटा, ढोबळी, भेंडी, वाल, घेवड्याच्या आवकेत वाढ झाली आहे. कांद्याची 245 क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिदहा किलोस 470 ते 530 असा दर मिळाला आहे. कांद्यास रविवारच्या (ता.16) तुलनेत दहा किलोमागे 90 रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.  वाटाण्याची 18 क्विंटल आवक झाली.

Saturday, August 22, 2015 AT 06:00 AM (IST)

नांदेडला मेथी प्रति शेकडा 700 ते 1500 रुपये नांदेड - येथील इतवारा बाजारात मेथीचे दर तेजीत असून, उन्हाळ्यानंतरही तीन महिन्यांपासून यात स्थिरता आली आहे. बाजार समितीत मेथीची दररोज 10 ते 15 हजार जुड्यांची आवक झाली होती. त्यास 700 ते 1500 रुपये प्रतिशेकडा दर होते, अशी माहिती येथील ठोक व्यापारी अब्दुल मोबीन यांनी दिली. बाजार समितीत मेथीची जिल्हा परिसर व परजिल्ह्यातून आवक झाली होती. भाजीपाल्याची मागणी अधिक असल्यामुळे दर तेजीत आहेत.

Friday, August 21, 2015 AT 06:00 AM (IST)

नाशिक - लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. 19) कांद्याची 7500 क्विंटलची आवक झाली होती. त्यास 2500 ते 4727 व सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल दर होते. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असताना या स्थितीत जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून मागणी वाढली असल्याने दरात वाढ झाली आहे. हे दर अजून महिनाभर तरी टिकून राहतील, असा अंदाज बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी (ता.

Thursday, August 20, 2015 AT 06:00 AM (IST)

मुंबई - राज्यातील पावसाच्या उघडिपीमुळे शेतीमालाची आवक वाढली असून, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतीमालाचे दर स्थिरावले आहेत. वाटाण्यांसह इतर भाज्यांचे दर तुलनेत वधारलेलेच आहेत. सोमवारी (ता.17) बाजार समितीमध्ये लसणाची 1855 क्विंटल आवक झाली होती. त्यास 4000 ते 5000 व सरासरी 4800 रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजारात कांद्याची 12 हजार 133 क्विंटल आवक झाली होती.

Wednesday, August 19, 2015 AT 06:00 AM (IST)

गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील रमेश विराणी या 45 वर्षीय शेतकऱ्याने गेल्या वर्षीपासून आपल्या 4 हेक्‍टर शेतीमध्ये कडूनिंबासह युरियाचा वापर सुरू केला. या प्रयोगामागे रमेशचा मुख्य उद्देश शेतातील कपाशीवर येणाऱ्या रोगांना प्रतिबंध करणे. त्यामुळे कपाशीवर कीड रोगाचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याबरोबरच कीटकनाशके फवारणीचा खर्चही कमी झाला आहे. परिणामी कपाशीच्या उत्पादनखर्चात घट तर झालीच, शिवाय कपाशीला चांगला भावही मिळाला.

Tuesday, August 18, 2015 AT 06:30 AM (IST)

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोची दररोज सुमारे अडीच हजार क्रेटची आवक झाली होती. त्यास प्रति दहा किलोस 20 ते 70 रुपये दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत घेवड्याची आवक मंदावली. त्यास प्रति दहा किलोस 200 ते 250 रुपये दर होता. गवारीची दररोज चाळीस पोती आवक होती. त्यास दहा किलोस 100 ते 250 रुपये दर मिळाला. कोल्हापूर परिसरातील गावांतून गवारीची आवक झाली.

Tuesday, August 18, 2015 AT 06:30 AM (IST)

जळगाव -   येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात स्थानिक शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांची आवक घटली होती. मागणीनुसार पुरवठा न झाल्याने विशेषतः कोथिंबीर व मेथीचे दर वधारले होते. कोथिंबिरीची 110 क्विंटलपर्यंत आवक होऊन 2500 ते 3000 रुपये प्रतिक्विंटल दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. जळगाव परिसरातून मेथीची 100 क्विंटलपर्यंत आवक झाली. त्यास 2000 ते 3000 रुपये प्रति क्विंटल दर होता.

Tuesday, August 18, 2015 AT 06:30 AM (IST)

नाशिक : येथील सिंहस्थ पर्वाला येत्या सप्ताहापासून सुरवात होत असल्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. गत सप्ताहात स्थानिक बाजारपेठेतून वांग्याला मागणी असून, त्याची सरासरी आवक 1000 क्रेटची झाली होती. त्यास प्रतिदहा किलो वजनाच्या क्रेटला 100 ते 350 व सरासरी 300 रुपये दर मिळाला. सिंहस्थपर्व अजून तीन महिने चालणार आहे. या काळात वांग्याचे दर टिकून राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Tuesday, August 18, 2015 AT 06:15 AM (IST)

सोलापूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात कांद्याची दररोज 50 ते 60 गाड्या आवक झाली होती. त्यास 1200 ते 4500 व सरासरी 3500 रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समिती कांद्याची जिल्ह्याबाहेरील आवकच सर्वाधिक राहिली. गेल्या पंधरवड्यापासून कांद्याच्या दरातील तेजी वाढली आहे. कमी आवक आणि मागणी जास्त राहिल्याने दर वधारले आहेत. कांद्याच्या खरेदीसाठी खास आंध्र प्रदेश, कर्नाटकातील व्यापारी सोलापुरात येतात.

Tuesday, August 18, 2015 AT 06:15 AM (IST)

लासलगाव : येथील बाजार समितीत गत सप्ताहात उन्हाळी कांद्याची 19 हजार 505 क्विंटल आवक झाली होती. त्यास 1700 ते 4012 व सरासरी 3490 रुपये प्रतिक्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. डाळिंबाची 5300 क्रेट्‌सची आवक झाली होती. त्यास 200 ते 1500 व सरासरी 1200 रुपये प्रति क्रेट्‌स दर होते.

Tuesday, August 18, 2015 AT 06:00 AM (IST)

पुणे - गुलटेकडी येथील प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. 16) 170 ते 180 गाड्या भाजीपाल्याची आवक झाली. श्रावण महिना सुरू झाल्याने पालेभाज्यांना मागणी वाढल्याने दर वाढले होते. तर कांदा, हिरवी मिरची, कोबी यांचे दरदेखील 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढले असून, इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Monday, August 17, 2015 AT 06:00 AM (IST)

श्रावण महिन्याच्या प्रभावामुळे ब्रॉयलर्सचा बाजारभाव उत्पादन खर्चाच्या खालील पातळीवर पोचला आहे. महाराष्ट्राचा अपवाद वगळता अन्य राज्यांत पुरवठा संतुलित असल्यामुळे बाजारात सुधारणा दिसेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. दीपक चव्हाण गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता. 13) गटारी अमावास्येसाठी जोरदार लिफ्टिंग झाल्यामुळे बाजारभाव 58 पर्यंत पोचले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी खाली आले. शनिवारी (ता.

Monday, August 17, 2015 AT 04:15 AM (IST)

नांदेड - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या नवा मोंढा बाजारात पावसामुळे मागील दोन दिवसांपासून आवक मंदावली आहे. बाजार समितीत बटाट्याची 100 क्विंटल आवक झाली होता. त्यास 500 ते 900 रुपये प्रति क्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीअंतर्गत असलेल्या बोंडार येथील बाजारात बुधवारी (ता. 12) कांद्याची आवक 50 क्विंटल झाली. त्यास 1500 ते 2500 व सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल दर होता.

Saturday, August 15, 2015 AT 06:15 AM (IST)

नाशिक - लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. 12) कांद्याची 6000 क्विंटलची आवक झाली. त्यास 2100 ते 3881 व सरासरी 3500 रुपये प्रति क्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक 60 ते 70 टक्‍क्‍यांनी घटली आहे. ही स्थिती अजून दोन महिने तरी टिकून राहील असा अंदाज बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केला. दर वर्षी ऑगस्टनंतर कांद्याच्या आवकेत घट होण्यास सुरवात होते.

Thursday, August 13, 2015 AT 06:00 AM (IST)

मुंबई - येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची 8787 क्विंटल आवक झाली होती. त्यास 3300 ते 3800 आणि सरासरी 3550 रुपये प्रति क्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत मंगळवारी (ता. 11) 500 ट्रक भाजीपाला आवक झाली होती. सोमवारी बाजार समितीमध्ये लसणाची 2785 क्विंटल आवक झाली. त्यास 3500 ते 6700 व सरासरी 5100 रुपये प्रति क्विंटल दर होता.

Wednesday, August 12, 2015 AT 06:30 AM (IST)

सोलापूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारपेठेत दोडके, कारल्याची आवक व मागणी चांगली असल्याने त्यांचे दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीत गत सप्ताहात दोडक्‍याची रोज एक टन, कारल्याची अर्धा टन अशी आवक होती. प्रामुख्याने उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ या स्थानिक भागांतूनच त्यांची आवक होते. पुणे, मुंबईकडून कारले, दोडक्‍यांना मागणी वाढत असल्याने सोलापुरात त्यांच्या दरात तेजी राहिली.

Tuesday, August 11, 2015 AT 06:30 AM (IST)

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची सरासरी 2000 क्रेटची आवक झाली होती. टोमॅटोसाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत गतसप्ताहात सरासरी 8000 क्रेटची आवक झाली होती. त्यास 100 ते 350 व सरासरी 170 रुपये प्रति 20 किलोच्या क्रेटला दर मिळाले. अद्याप आवक कमी असताना मागणीही स्थिर असल्याने टोमॅटोचे दर स्थिर आहेत, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Tuesday, August 11, 2015 AT 06:15 AM (IST)

जळगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात स्थानिक लाल कांद्याची आवक घटली होती. कांद्याची दैनंदिन सरासरी 60 क्विंटल आवक झाली. त्यास 2200 ते 3200 व सरासरी 2800 रुपये प्रति क्विंटल दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत फ्लॉवरची आवक बऱ्यापैकी स्थिर होती. मात्र मागणी वाढल्यामुळे फ्लॉवरचे दर तेजीत होते. जळगाव परिसरातून फ्लॉवरची सप्ताहात 100 क्विंटलपर्यंत आवक झाली.

Tuesday, August 11, 2015 AT 06:15 AM (IST)

राजकुमार चौगुले कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटो, वांग्याच्या आवकेत वाढ झाली होती. टोमॅटोची दररोज तीन ते चार हजार कॅरेट आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोस 10 ते 60 रुपये दर होता. वांग्याची दररोज 800 ते 900 करंड्या आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस 40 ते 200 रुपये दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  बाजार समितीत ओली मिरची, ढोबळी मिरचीच्या आवकेतही दहा टक्‍यांनी वाढ झाली.

Tuesday, August 11, 2015 AT 06:15 AM (IST)

लासलगाव : येथील बाजार समितीत गत सप्ताहात उन्हाळी कांद्याची 30 हजार 515 क्विंटल आवक झाली होती. त्यास 1500 ते 3962 व सरासरी 3425 रुपये प्रतिक्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. डाळिंबाची 4516 क्रेट्‌सची आवक झाली होती. त्यास 100 ते 2100 व सरासरी 1220 रुपये प्रति क्रेट्‌स दर होते.

Tuesday, August 11, 2015 AT 05:45 AM (IST)

पुणे - गुलटेकडी येथील प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. 9) 170 ते 180 गाड्या भाजीपाल्याची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक वाढली होती. तर कोबी, फ्लॉवर, भेंडी, गवार, पडवळ यांची मागणी वाढल्याने यांच्या दरात 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली होती, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Monday, August 10, 2015 AT 06:30 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: