Last Update:
 
प्रादेशिक
पुणे  - पुणे विभागात गेल्या अनेक वर्षांपासून जमीनविषयक प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा एकाच वेळी निपटारा होण्यासाठी विभागात 11 एप्रिलला महसूल अदालतीचे आयोजन केले आहे. या लोकअदालतीमध्ये विभागातील सुमारे 2 हजार 149 दावे सामोपचाराने मिटविण्यासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाचे अप्पर आयुक्त श्‍याम देशपांडे यांनी दिली. पुणे विभागात तब्बल नऊ हजार 767 प्रकरणे सुनावणीसाठी अप्पर आयुक्ताकडे प्रलंबित होती.

Friday, March 27, 2015 AT 06:00 AM (IST)

पुणे जिल्ह्यात उन्हाळी पेरण्यांची आघाडी पुणे  - पुणे विभागात उन्हाळी पिकांचे सरासरी 23 हजार 300 हेक्‍टर क्षेत्र आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे 9 हजार 600 हेक्‍टरवर (41.2 टक्के) पेरणी झाली आहे, तर विभागात सर्वाधिक पेरणी उन्हाळी भुईमुगाची झाली आहे. विभागात उन्हाळी हंगामात भात, मका, बाजरी, भुईमूग, सूर्यफूल, मूग या पिकांच्या पेरण्या दर वर्षी शेतकरी करतात. यंदाही उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी सर्वाधिक भुईमुगाची 5 हजार 410 हेक्‍टरवर पेरणी केली आहे.

Friday, March 27, 2015 AT 05:30 AM (IST)

परभणी  - महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी विभागांतर्गत यंदाच्या कापूस खरेदी हंगामात गुरुवार (ता. 19) अखेरीस 22 लाख 32 हजार 585 क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. यंदाच्या हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव कमी असल्यामुळे, तसेच रुईच्या गाठीवर निर्यातबंदी असल्यामुळे केंद्र शासनाच्या हमी भावानुसार म्हणजे चार हजार 50 रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे खरेदी करण्यात आली.

Friday, March 27, 2015 AT 05:15 AM (IST)

पंढरपूर, जि. सोलापूर  - श्रीपूर (ता. माळशिरस) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी शनिवारी (ता. 28) नूतन संचालक मंडळाची सभा बोलाविण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय तेली यांनी दिली.

Thursday, March 26, 2015 AT 05:30 AM (IST)

722 गावे, 787 वाड्यांना 992 टॅंकरने पाणीपुरवठा पुणे - राज्यात उन्हाचा ताप वाढू लागला आहे. त्याबरोबरच भूजलाची पातळी खालावू लागल्याने पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. औरंगाबाद विभागात पाणीटंचाईची तीव्रता सर्वाधिक आहे, तर नाशिक, पुणे, अमरावतीसह कोकण व नागपूर विभागांतही यंदा पाणीटंचाईत वाढ होत आहे. सोमवारपर्यंत (ता.

Thursday, March 26, 2015 AT 05:15 AM (IST)

विभागातील 20 गावे, 71 वाड्यांना टॅंकरने पाणी पुणे  - पुणे विभागात मार्च महिन्याच्या सुरवातीपासून होत असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान केले. या अस्मानी संकटाला सामोरे जात असतानाच सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील 20 गावे आणि 71 वाड्यांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. विभागातील टंचाईग्रस्त भागाला पाणी पुरविण्यासाठी मंगळवारपर्यंत (ता.

Wednesday, March 25, 2015 AT 05:45 AM (IST)

"नॅचरल फ्रेश'च्या नावाखाली गटशेतीच्या माध्यमातून राबविला यशस्वी प्रयोग लातूर  - "ना नफा ना तोटा' या तत्त्वावर रांजणीच्या नॅचरल शुगर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या नॅचरल फार्म प्रोड्युसर कंपनीद्वारा उत्पादित सिमला मिरची विक्रीस नुकताच प्रारंभ झाला, यामुळे शेतकऱ्यांना उत्पादित मालाला विनासायास बाजारपेठ मिळाली आहे. कारखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत 15 टन सिमला मिरचीची बाजारपेठेत विक्री झाली आहे.

Wednesday, March 25, 2015 AT 05:15 AM (IST)

"एसआयएलसी'तर्फे 30 व 31 मार्चला प्रशिक्षण पुणे  - दर्जेदार डाळिंब फळांना देशांतर्गत, तसेच विदेशात वाढती मागणी आहे. इतर पिकांच्या तुलनेत डाळिंबातून अपेक्षित परतावा मिळत असल्यामुळे डाळिंब लागवडीकडे अधिक कल दिसतो परंतु दर्जेदार डाळिंब उत्पादन मिळवायचे असेल, तर बाग लागवड करण्यापूर्वी व लागवडीनंतरचे व्यवस्थापन चोख ठेवावे लागते.

Wednesday, March 25, 2015 AT 05:15 AM (IST)

औरंगाबाद  - गत तीन वर्षांच्या कापूस खरेदीचा आकडा प्रचंड मागे टाकत सीसीआयच्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील 35 कापूस खरेदी केंद्रावरून तब्बल 49 लाख 54 हजार 490 क्‍विंटल 08 किलो कापसाची खरेदी केली आहे. प्राप्त माहितीनुसार याच 35 केंद्रावरून 2012-13 मध्ये सीसीआयने 1 लाख 64 हजार 847.81 क्‍विंटल, तर 2013-14 मध्ये 2 लाख 70 हजार 825.17 क्‍विंटल कापसाची खरेदी केली होती.

Monday, March 23, 2015 AT 05:15 AM (IST)

"मनरेगा'तील जलसंधारणाच्या माहितीसाठी मोबाईल व्हॅनचा वापर लातूर  - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोचून त्यांचा या कामात सहभाग वाढवा या उद्देशाने आता मोबाईल व्हॅनचा वापर केला जाणार आहे. एक एप्रिल ते एक मे या महिनाभरात या मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती केली जाणार आहे. मराठवाड्यात एक हजार 682 गावांत याद्वारे जलसंधारणाचा जागर केला जाणार आहे.

Monday, March 23, 2015 AT 05:15 AM (IST)

इसापूर, येलदरी, विष्णुपुरीसह बारुळ धरणातील पाणी गेले तळाला नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड पाटबंधारे मंडळात येणाऱ्या मोठ्या प्रकल्पातील पाणी पातळीत यंदा अधिक प्रमाणात घट झाली आहे. यात हिंगोली जिल्ह्यातील येलदरी व इसापूर, परभणी जिल्ह्यातील सिद्धेश्‍वर तसेच नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी व बारुळ प्रकल्पांचा समावेश आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही घट मोठी असल्यामुळे या वर्षी पाण्याचा वापर जपून करावा, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Sunday, March 22, 2015 AT 12:00 AM (IST)

डॉ. विखे पाटील कृषी परिषदेची मागणी नांदेड (प्रतिनिधी) : सततचा दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे सलग तीन हंगाम वाया गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी कोचिंग क्‍लासेस संघटनांनी शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवणी शुल्कात सवलत द्यावी, अशी आग्रही मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी खासगी कोचिंग क्‍लासेस संघटनेचे अध्यक्ष आर. बी.

Sunday, March 22, 2015 AT 12:00 AM (IST)

सातारा (प्रतिनिधी) ः जिल्ह्यात माण, खटाव, कोरेगाव व वाई तालुक्‍यांतील आठ गावे व 29 वाड्यांतील दहा हजार 748 लोकसंख्येला आठ टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, वाई तालुक्‍यांत पाणीटंचाई होऊ लागल्याने प्रशासनाकडून टॅंकर सुरू करण्यात आले आहे. टॅंकरने पाणीपुरवठा होत असलेल्या गाव व वाड्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.

Sunday, March 22, 2015 AT 12:00 AM (IST)

पुणे  - वनविकास महामंडळात सरळसेवेने 21 वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या भरतीस राज्य शासनाने परवानगी दिली आहे. ही पदे भरताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती नियमांचे निकष लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या असून, याबाबतचा अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र वनविकास महामंडळाकरिता 1688 पदांच्या आकृतीबंधास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. यामधील वनपरिक्षेत्र अधिकारी पदासाठी 125 पदे मंजूर करण्यात आली आहेत.

Saturday, March 21, 2015 AT 05:45 AM (IST)

लातूरचे तहसीलदार राहुल खांडेभराड यांचे आवाहन लातूर  - दुष्काळग्रस्तांना अनुदान मिळण्यासाठी संयुक्त खात्याचे एका शेतकऱ्याच्या नावाने संमतिपत्र दिले तरच अनुदानाचे वाटप होणार आहे. शेतकऱ्यांसाठी आलेले अनुदान दहा दिवसांपूर्वी परत गेले. मात्र परत गेलेला निधी मार्चअखेर संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केला जाणार आहे. मार्च अखेर हा निधी कोणत्याही स्थितीत वाटप करण्याचे सरकारचे आदेश आहेत.

Saturday, March 21, 2015 AT 05:45 AM (IST)

राहुरी विद्यापीठ, जि. नगर  - ""विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांची जिल्हा पातळीवर निर्मिती करण्यात आलेली आहे. हवामानाशी निगडित योग्य तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे महत्त्वाचे कार्य प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राचे आहे.

Friday, March 20, 2015 AT 05:45 AM (IST)

नागपूर  - गारपीट, अवकाळी पावसाच्या तडाख्यातून संशोधक संस्थाही सुटल्या नाहीत. राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचेही नियोजन गारपिटीने कोलमडले. संस्थेच्या परिसरातील शेडनेट, पॉलिहाऊस गारपिटीमुळे क्षतीग्रस्त झाले, तर संत्र्याच्या अंबिया व मृग बहाराला गळती लागल्याने लाखो रुपयांची हानी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रोपांचा पुरवठाही यामुळे प्रभावित होण्याची शक्‍यता आहे.

Friday, March 20, 2015 AT 05:45 AM (IST)

पुणे- दिवसेंदिवस नागरिक आरोग्याच्या बाबतीत जागरूक होत असून, आहारात सेंद्रिय शेतीमालासाठी आग्रही आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत सेंद्रिय उत्पादनांचा पुरवठा कमी होत आहे, तर विश्‍वासार्ह सेंद्रिय शेतमाल मिळत नाही, अशी स्थिती आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सेंद्रिय शेतमाल उत्पादन, संकलन आणि ब्रॅंडिंग करणे गरजेचे आहे, असे मत अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे यांनी व्यक्त केले.

Friday, March 20, 2015 AT 05:30 AM (IST)

गतिमान वैरण विकास योजना, 50 टक्के अनुदान सोलापूर  - राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत गतिमान वैरण विकास योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के सवलतीवर चाऱ्यासाठी ज्वारीचे बियाणे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी 600 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे, असे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे पिकांचे नुकसान झाले.

Thursday, March 19, 2015 AT 05:45 AM (IST)

गाळप हंगाम 30 एप्रिलपर्यंत चालणार राज्य साखर संघाचा अंदाज 7.14 लाख टन उसाचे गाळप पूर्ण पुणे  - राज्यात चालू गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आला तरी अजूनही राज्यात सरासरी सव्वादोन लाख हेक्‍टरवरील सुमारे 2 कोटी 23 लाख 61 हजार टन ऊस शिल्लक आहे. 177 पैकी दोन कारखान्यांची गाळप हंगामाची सांगता झाल्याने बंद झाले आहेत.

Thursday, March 19, 2015 AT 05:30 AM (IST)

जिल्हा प्रशासनाचा अंदाज निकषाप्रमाणे भरपाई मिळणार धुळे  - जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने 220 गावे बाधित होऊन सुमारे 10 हजार 600 हेक्‍टरवरील रब्बी पिकांचे पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. याशिवाय 95 जनावरांचा मृत्यू व 110 घरांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे संबंधितांना नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी ए. बी.

Thursday, March 19, 2015 AT 05:30 AM (IST)

खंडाळ्यातील कोपर्डे, पाडळी, बोरी, येळेवाडीत पाहणी विविध योजनांनाही भेट लोणंद, जि. सातारा  - जिल्ह्यातील कोपर्डे, पाडळी, बोरी, येळेवाडी (ता. खंडाळा) या गारपीटग्रस्त गावांना राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी मंगळवारी (ता. 17) भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. खंडाळा तालुक्‍यात गत आठवड्यात बुधवारी (ता.

Thursday, March 19, 2015 AT 05:15 AM (IST)

सातारा  - जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात आतापर्यंत सहा कोटी आठ लाख 28 हजार खर्च करून 157 कामे पूर्ण झाली आहेत. या अभियानात उत्स्फूर्त लोकसहभाग लाभत असून, लोक सहभागातून 23 लाख 19 हजारांची 30 कामे पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल यांनी दिली. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी 215 गावांची निवड करण्यात आली आहे. अनेक गावातील लोकांनी या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

Wednesday, March 18, 2015 AT 05:45 AM (IST)

पुणे विभागाचे चित्र  - नागरिकांना वारंवार मारावे लागतात हेलपाटे पुणे  - "सातबाऱ्यावर तलाठ्यांनी चुकीच्या नोंदी लावल्या', "वारसाची चुकीची नोंद झाली', "पुनर्वसनासाठी जास्तीची जमीन संपादित केली ', "शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा', "गाव - शिव रस्ता खुला करावा' अशा विविध कारणांसाठी पुणे विभागात शेतकऱ्यांना महसूल विभागाकडे वारंवार हेलपाटे मारावे लागतात.

Wednesday, March 18, 2015 AT 05:30 AM (IST)

सातारा  - महात्मा फुले कृषी विद्यापीठ व कृषी आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने सैदापूर (जि. सातारा) येथील बीजगुणन केंद्रात शुक्रवारी (ता. 20) कृषी अभियांत्रिकीकरण दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. मोहन शिर्के यांनी दिली. या निमित्ताने सुधारित कृषी अवजारांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू प्रा.

Wednesday, March 18, 2015 AT 05:15 AM (IST)

सातारा  - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात 409 कामे सुरू असून, त्यावर तीन हजार 445 मजूर उपस्थित असल्याची माहिती रोजगार हमी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील अकरा तालुक्‍यांतील 102 ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू आहेत.

Tuesday, March 17, 2015 AT 05:45 AM (IST)

पुणे  - रब्बी पिकांना टंचाईचा मोठा फटका बसल्यानंतर आता गेल्या काही महिन्यांत झालेला अवकाळी पाऊस आणि सिंचनाची पूरक सुविधा या बळावर राज्यातील एक लाख 38 हजार उन्हाळी पीक क्षेत्रापैकी सुमारे 97 हजार हेक्‍टर (71 टक्के) पेरण्या झाल्या आहेत. पेरणी झालेल्या पिकांमध्ये उन्हाळी भुईमूग, भात, सूर्यफूल पिकांचा समावेश आहे. या पिकांची उगवण व वाढ समाधानकारक असल्याचे कृषी आयुक्तालयाने म्हटले आहे.

Tuesday, March 17, 2015 AT 05:30 AM (IST)

द्राक्ष, डाळिंब, आंब्यासह गहू, हरभरा, ज्वारीला फटका पुणे  - मार्च महिन्याच्या प्रारंभापासूनच पडणाऱ्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांमधील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने काढणीस गहू, हरभरा, मका, ज्वारीसह कांदा पीक भिजल्याने नुकसान झाले आहे, तर द्राक्षाचे मणी तडकले असून, आंब्याचा मोहर, डाळिंबाची फुले गळून गेली आहेत, भाजीपाला पिकेही वाया जाणार आहेत.

Saturday, March 14, 2015 AT 06:00 AM (IST)

विकास जाधव सातारा - जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतीस बसला आहे. 28 फेब्रुवारी व एक मार्चला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील एक हजार 35 शेतकऱ्यांच्या 133. 86 हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान 50 टक्केवर झाले आहे. जिल्ह्यात फेब्रुवारीच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासकीय आकडेवारीनुसार सर्वाधिक फटका फलटण आणि कऱ्हाड तालुक्‍यास बसला आहे.

Saturday, March 14, 2015 AT 05:45 AM (IST)

वनवासी आश्रमावर झाड कोसळून विद्यार्थी ठार नगर  - तालुक्‍याला बुधवारी (ता. 11) रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीने झोडपले. वादळामुळे झाड कोसळल्याने रेडे शिवारातील वनवासी कल्याण आश्रमाची भिंत पडली. त्याखाली दबून आश्रमात झोपलेला आठवीचा विद्यार्थी समीर यशवंत धिंदळे (वय 13) याचा जागीच मृत्यू झाला. येथील बाजारतळाची संरक्षक भिंतही कोसळली. पिंपरकणे, शेलविहिरे, मालेगाव, खिरविरे या भागांत घरांवरील पत्रे उडाले.

Saturday, March 14, 2015 AT 05:45 AM (IST)

2015-16 साठी प्रस्ताव दाखल करण्याची 30 जून अखेरची मुदत नांदेड  - तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन योजनेअंतर्गत तुती लागवड करण्यास इच्छुक शेतकऱ्यांकडून खरीप हंगाम 2015-16 या वर्षाकरिता प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अंतिम मुदत 30 जून असल्याचे रेशीम संचालनालय नागपूरकडून कळविण्यात आल्याचे जिल्हा रेशीम अधिकारी पी. जे. पाटील यांनी कळविले आहे.

Friday, March 13, 2015 AT 06:00 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: