Last Update:
 
राजकीय
देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही - उपोषणाची समाप्ती बारामती, जि. पुणे  - "धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याबाबत महायुतीचे शासन आल्यानंतर निर्णय करू,' अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 29) येथे दिली.   धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याबाबत 21 जुलैपासून बारामतीत सुरु असलेल्या उपोषणाची फडणवीस व इतर ज्येष्ठ समाजबांधवांच्या हातून सरबत घेऊन सांगता करण्यात आली. या वेळी श्री. फडणवीस बोलत होते.

Wednesday, July 30, 2014 AT 05:30 AM (IST)

रघुनाथदादा पाटील यांचे निफाडच्या परिषदेत शेतकऱ्यांना आवाहन निफाड, जि. नाशिक  - कांदा व बटाटा जीवनावश्‍यक नसताना केंद्र सरकारने त्यांचा जीवनावश्‍यक कायदा 1955 मध्ये समावेश केला आहे. त्यामुळे कांद्याला भाव मिळणार नाही तसेच भारतीय जनता पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात आश्‍वासन देऊनही ते पाळले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान " कांदा फेक आंदोलन' केल्याशिवाय भाव मिळणार नाही.

Tuesday, July 29, 2014 AT 05:45 AM (IST)

"आठवड्यात जागावाटप होणार' मुंबई  - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा येत्या आठवड्यात संपुष्टात येईल. तसेच 15 ऑगस्टपर्यंत महायुतीचे जागावाटपही निश्‍चित होईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता.28) दिली. आगामी विधानसभा निवडणुका आणि जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महायुतीच्या घटक पक्षांची बैठक पार पडली.

Tuesday, July 29, 2014 AT 05:45 AM (IST)

गुणवंत पाटील हंगरगेकर पिंपळगाव बसवंत येथील कांदा परिषदेत होणार दिशा स्पष्ट नगर  - केंद्र शासनाने कांद्याचा जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये समावेश केला मात्र निर्यात मूल्य वाढवून अप्रत्यक्ष निर्यातबंदी केली आहे. कॉंग्रेसप्रमाणे भाजप सरकारही शेतकऱ्यांबाबत अन्यायाची भूमिका घेत आहे. कांद्यासह शेतमालाला मोकळीक मिळावी म्हणून राज्यव्यापी लढा उभारण्यात येणार आहे.

Saturday, July 26, 2014 AT 05:45 AM (IST)

मुंबई  - आगामी विधानसभेसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती अभेद्य राहील. उभय पक्ष आणि महायुतीतील अन्य घटक पक्षांना सन्मानजनक जागावाटप करण्यात येईल. येत्या सोमवारी (ता. 28) जागावाटपाबाबत पुन्हा बैठक घेऊन अंतिम चर्चा करण्यात येईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासाठी शिवसेना - भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक शुक्रवारी (ता. 25) येथे पार पडली.

Saturday, July 26, 2014 AT 05:30 AM (IST)

पाशा पटेल यांची माहिती नवी दिल्लीत चौथी बैठक लातूर  - देशातील शेतमाल हमी भाव पद्धत बदलण्यासाठी आतापर्यंत दिल्लीत किमान आधारभूत किंमत ठरविण्याच्या पद्धतीची समीक्षा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या तीन बैठका झाल्या आहेत. एक ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत कृषी भवनात चौथी बैठक होत आहे.

Friday, July 25, 2014 AT 06:00 AM (IST)

सातारा  - बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने 2013- 14 च्या हंगामात गाळप केलेल्या उसाला दुसरा हप्ता 500 रुपये प्रतिटन प्रमाणे द्यावा, या मागणीसाठी कारखान्याचे अध्यक्ष शंभूराज देसाई यांच्या येथील घरासमोर गुरुवारी (ता.24) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

Friday, July 25, 2014 AT 05:30 AM (IST)

राज्यातील 1480 गावांना टॅंकरद्वारा पाणीपुरवठा मुंबई  - राज्यातील 355 पैकी 200 तालुक्‍यांमध्ये 50 टक्‍क्‍यांच्या आत पाऊस झाल्यामुळे टंचाईग्रस्त भागात सुरू असलेल्या उपाययोजनांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मंगळवारी (ता.22) दिली. या वेळी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस, मदत व पुनर्वसन सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. डॉ.

Thursday, July 24, 2014 AT 05:30 AM (IST)

भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाची मागणी औरंगाबाद  - पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे अवघड आहे, तेव्हा शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे आणि खते देण्यात यावीत, अशी मागणी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चातर्फे करण्यात आली आहे.

Thursday, July 24, 2014 AT 05:00 AM (IST)

राजीनाम्याच्या निर्णयावर नारायण राणे ठाम मुंबई  - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी (ता.22) बोलावलेली बैठक निष्फळ ठरली. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी तब्बल दोन तास ही बैठक चालली. या वेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते.

Wednesday, July 23, 2014 AT 05:45 AM (IST)

मुंबई  - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या समन्वय समितीची बैठक आज (बुधवारी, ता. 23) होणार आहे. या वेळी जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा होणार असल्याचे समजते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना जागावाटपाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा जास्त जागा लढवते.

Wednesday, July 23, 2014 AT 05:30 AM (IST)

"विधानसभा निवडणुकीत पराभव अटळ' मुंबई  - मंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा करून खळबळ उडवणाऱ्या उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (ता.21) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राजीनामा सोपवत, मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती आणि आश्वासन पूर्ती न केल्याबद्दल पक्षनेतृत्वावर तोफ डागली. राजीनाम्यावरील निर्णयानंतर कॉंग्रेसमध्ये राहायचे किंवा इतर निर्णय घ्यायचा, याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देईन, असे नारायण राणे यांनी येथे सांगितले.

Tuesday, July 22, 2014 AT 06:15 AM (IST)

ग्रामविकास मंत्री जयंत पाटील : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा अधिकाऱ्यांना दिले निर्देश मुंबई  - पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेला राज्यात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. असे असले तरी तिसऱ्या वर्षीचे निकष पूर्ण करण्यात काही गावे अजून मागे दिसत आहेत.

Tuesday, July 22, 2014 AT 05:30 AM (IST)

उद्धव ठाकरेंचा बार्शीच्या सभेत आरोप सोलापूर  - गेल्या पंधरा वर्षांत सिंचनावर हजारो कोटी रुपये खर्च झाले, पण प्रत्यक्षात काय, पाणी कुठेच अडले नाही. सत्ताधाऱ्यांनी सिंचनाच्या या पैशाने केवळ आपल्या तुंबड्या भरल्या. पण आता वेळ आली आहे, सत्ताधारी सरकारला खाली खेचण्याची आणि शिवशाहीचे सरकार आणण्याची. तेव्हा कामाला लागा, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. 20) रात्री बार्शी येथील जाहीर सभेत केले. श्री.

Tuesday, July 22, 2014 AT 05:15 AM (IST)

कोपरगाव, जि. नगर  - (कै.) शंकरराव काळे यांनी पाणीप्रश्‍नी स्वपक्षीयांविरुद्ध संघर्ष केला. शेतकरी व सामान्य जनतेच्या हितासाठी संघर्षाची तयारी ठेवली. सामान्य जनतेच्या विकासाचे ध्येय ठेवून त्यांनी जीवन व्यतीत केले. त्यांचे चिरंजीव आमदार अशोक काळे हीच परंपरा पुढे चालवित आहेत. कै. शंकरराव काळे यांचे कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. कोळपेवाडी येथे उभारण्यात आलेल्या (कै.

Monday, July 21, 2014 AT 05:30 AM (IST)

मुंबई (प्रतिनिधी) ः राज्यातील प्रलंबित शेतकरी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जिल्हानिहाय आंदोलने करण्यात येतील. तसेच ऑगस्टमध्ये मंत्रालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती जनता दल (सेक्‍युलर) चे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी दिली. शेतकऱ्यांना दरमहा 2000 रुपये पेन्शन मिळावी, या मागणीसाठी मार्च महिन्यापासून जनता दलाचे आंदोलन सुरू आहे. मागील वर्षी प्रा. शरद पाटील यांनी याच मागणीसाठी कोल्हापूर ते नागपूर अशी कृषी दिंडीदेखील आयोजित केली होती.

Sunday, July 20, 2014 AT 12:00 AM (IST)

हिंगोली जिल्हा परिषद कृषी समितीच्या बैठकीत ठराव हिंगोली (प्रतिनिधी) ः राज्यात कृषी विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प ठेवण्याच्या मागणीचा ठराव जिल्हा परिषद कृषी समितीच्या बैठकीत गुरुवारी (ता. 17) मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची प्रत शासनाकडे पाठविण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला आहे. येथील जिल्हा परिषद कृषी समितीची बैठक सभापती राजाभाऊ मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

Sunday, July 20, 2014 AT 12:00 AM (IST)

भंडारा  - गतवर्षी संततधार पावसामुळे पिकाची उत्पादकता घटल्यानंतर या वर्षी पावसाने उघडीप दिल्याच्या परिणामी संपूर्ण हंगामच संकटात सापडला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जिल्हा परिषद, तसेच नियोजन समितीचे सदस्य युवराज वासनिक यांनी पत्रकाद्वारा केली आहे. सिंचन प्रकल्पाचा वानवा असल्याच्या परिणामी परिसरातील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. वातावरणाती बदलांमुळे नजीकच्या काळात पाऊस अनिश्‍चित झाला आहे.

Saturday, July 19, 2014 AT 05:30 AM (IST)

मुंबई  - राज्यातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांनी गुरुवारी (ता.16) अखेर संप मागे घेतला. वेतनत्रुटी निवारणासह इतर सर्व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामविकास अधिकारी, तसेच ग्रामसेवकांनी संप मागे घेतला असून, शुक्रवारपासून (ता.17) ते कामावर हजर झाले असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

Saturday, July 19, 2014 AT 05:30 AM (IST)

देवेंद्र फडणवीस औरंगाबाद येथे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक औरंगाबाद  - राज्य सरकारने दुष्काळासंदर्भात काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. मराठवाड्याकडे मॉन्सूनबरोबर राज्य सरकारचेही दुर्लक्ष असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 17) भाजपच्या कोअर कमिटीची औरंगाबाद येथे बैठक झाली.

Friday, July 18, 2014 AT 05:15 AM (IST)

मुख्यमंत्री चव्हाण  - शाश्‍वत शेती उत्पादनासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी जळगाव  - जिल्ह्यातील तापी नदीवरील शेळगाव बॅरेज व अन्य सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी शासनाकडून आगामी काळात भरघोस निधीची तरतूद केली जाईल. समतोल विकास व शाश्‍वत शेती उत्पादनासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे', असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावदा (ता. रावेर) येथे गुरुवारी (ता.

Friday, July 18, 2014 AT 05:15 AM (IST)

पुणे  - दुष्काळ आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या कोणत्याही कर्ज वसुलीस स्थगिती असताना, काही बॅंकांनी कर्ज वसुली केल्याप्रकरणी आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना 42 हजार कोटी रुपये नुकसानभरपाई मिळावी, या शेतकरी संघटनांच्या मागणीवर आज (गुरुवारी, ता.17) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याबाबत माहिती देताना शेतकरी संघटनेचे सरचिटणीस विठ्ठल पवार म्हणाले, की गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने तुटपुंजी मदत दिली गेली.

Thursday, July 17, 2014 AT 05:15 AM (IST)

अजित पवार : शरद पवार हेच आमचे दैवत कोल्हापूर  - "लोकसभा निवडणुकीचा कल पाहता, आमची ताकद राज्यात वाढली आहे. त्याचा विचार करून आघाडी करताना जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला पाहिजे पण आघाडी की स्वबळावर लढायचे, याचा निर्णय पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवार हेच घेतील. तेच आमचे दैवत आहेत,' असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार मेळाव्यानिमित्त श्री. पवार मंगळवारी (ता.

Thursday, July 17, 2014 AT 05:15 AM (IST)

व्यापाऱ्यांच्या मुजोरीविरोधात शेतकरी उतरले रस्त्यावर धुळे  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मिळणारा दर इतर ठिकाणच्या बाजारपेठेपेक्षा प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रुपयांनी कमी असतो. व्यापारी संघटित होऊन दर ठरवीत असताना बाजार समितीचे प्रशासन आणि संचालक बघ्याची भूमिका घेतात. नेहमीच्या या जाचाला कंटाळलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी अखेर सोमवारी (ता. 14) बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन केले. सभापतींना घेराव घालून जाबदेखील विचारला.

Wednesday, July 16, 2014 AT 05:45 AM (IST)

शरद पवार यांची अपेक्षा बारामती, जि. पुणे  - "टंचाईच्या स्थितीवर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने एकत्र प्रयत्न करून लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. आम्हीही या प्रश्‍नावर कोणतेही राजकारण न करता उपाययोजनांना गती देण्यासाठी आग्रही राहू. संकट बिकट असले तरी त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत', अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

Tuesday, July 15, 2014 AT 06:15 AM (IST)

मुख्यमंत्री चव्हाण लोकांनी मागणी केल्यास कऱ्हाड दक्षिणमधून लढू कऱ्हाड, जि. सातारा  -  आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे नेतृत्व मीच करणार असून, श्रेष्ठींनी तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्याबद्दल आता तरी कोणाच्या मनात शंका असायचे कारण नाही, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणाचे नाव न घेता येथे पत्रकार परिषदेत लगावला.

Tuesday, July 15, 2014 AT 05:45 AM (IST)

कोपरगाव, जि. नगर (सकाळ वृत्तसेवा) : आमचा शेतकरी देशोधडीला लावणारा मेंढेगिरी समितीचा अहवाल आम्हाला मान्य नाही, असे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच जलसंपदामंत्र्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली. श्री.

Tuesday, July 15, 2014 AT 05:30 AM (IST)

विजय जावंधिया यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी पुणे  - चलनवाढ कमी करण्यासाठी मंत्र्यांचे वेतन 40 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा कटू निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारा केली आहे. जावंधिया यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की "देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी आपण कटू निर्णय घेण्याचे जाहीर केले. याचे आम्ही स्वागत करतो.

Tuesday, July 15, 2014 AT 05:00 AM (IST)

शरद पवार जागा मागण्यापेक्षा जिंकणे हाच निकष मुंबई (सकाळ वृत्तसेवा) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी कायम राहणार आहे. दोन्ही पक्षांत जागावाटपाचा पेच असला, तरी मतदारसंघांची संख्या हा आघाडीचा निकष नसून, निवडणुकीत विजय मिळवणे हाच मुख्य आधार आहे. त्यामुळे कोणी कितीही जागांचा दावा करत असेल, अन्यथा स्वबळावर जाण्याचा इशारा देत असतील, तरी अंतिम निर्णय मीच घेणार.

Monday, July 14, 2014 AT 05:30 AM (IST)

मुंबई- लोकसभा निवडणुकीत तब्बल 18 जागा जिंकल्याने शिवसेनेच्या नेतृत्वाने आणखी कठोर निर्णय घेण्याचे ठरवले आहे. ज्या पक्षांनी किंवा नेत्यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेऊन मनसे आणि राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केली होती. त्यांच्यासाठी मातोश्रीची दारे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

Sunday, July 13, 2014 AT 12:15 AM (IST)

मुख्यमंत्री चव्हाण "पेड न्यूज'प्रकरणी मोदी यांना घेरणार मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत प्रचारतंत्राचा सक्षमपणे वापर करून देशात चांगले यश मिळविले. राज्यातील आगामी विधानसभेसाठी कॉंग्रेसही अशाच प्रचारतंत्राचा प्रभावी वापर करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. 11) दिले.

Sunday, July 13, 2014 AT 12:15 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2014 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: