Last Update:
 
राज्य
टंचाईग्रस्त गावांत दिलासादायी आठ उपाययोजना लागू मुंबई  - यंदाच्या रब्बी हंगामात राज्यातील 1 हजार 253 गावांमधील अंतिम पीक पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे. या सर्व गावांमध्ये राज्य सरकारने तातडीने आठ उपाययोजना लागू केल्याचा आदेश जारी केला आहे. खरीप हंगामापेक्षा रब्बीतील नुकसानीची ही तीव्रता तुलनेत कमी आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामातही राज्यातील 23 हजार 811 गावांमधील अंतिम पीक आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे.

Saturday, April 18, 2015 AT 06:00 AM (IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकारी बॅंकांना सूचना वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई  - राज्यातील सहकारी बॅंकांनी दुष्काळ आणि त्यासारख्या इतर नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठण दीर्घ मुदतीत करावे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार (ता.17) केली. राज्य सहकारी बॅंक्‍स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरात ही सभा पार पडली.

Saturday, April 18, 2015 AT 06:00 AM (IST)

स्कायमेट संस्थेचा अंदाज आगमन सर्वसाधारण वेळेआधी पुणे  - देशात यंदा मॉन्सून सर्वसाधारण वेळेच्या आधी जोरदारपणे दाखल होईल आणि देशभर सरासरीएवढा (102 टक्के) पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट वेदर सर्विसेस या खासगी संस्थेने व्यक्त केला आहे. महिनानिहाय सरासरीच्या तुलनेत जूनमध्ये 107 टक्के, जुलैमध्ये 104 टक्के, ऑगस्टमध्ये 99 टक्के, तर सप्टेंबरमध्ये 96 टक्के पाऊस पडणार असल्याचे स्कायमेटमार्फत जाहीर करण्यात आले आहे.

Saturday, April 18, 2015 AT 05:45 AM (IST)

- महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा निर्णय - 13 जिल्ह्यांत 76 अतिशोषित 4 शोषित 80 पाणलोट क्षेत्रे मुंबई - राज्यातील अतिशोषित आणि शोषित पाणलोट क्षेत्रांमध्ये सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी 60 मीटरपेक्षा अधिक खोल विंधन विहिरी, बोअरवेल घेण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घेतला आहे.

Saturday, April 18, 2015 AT 05:45 AM (IST)

तळकोकणात गारपीट आजपासून हवामान कोरडे पुणे  - शुक्रवारी सकाळपर्यंतच्या (ता. 17) चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडला. शनिवारी दुपारनंतर तळकोकणा सावंतवाडी परिसरात पाऊस व गारपीट झाली. हवामान खात्याने शनिवारपासून (ता. 18) मंगळवारपर्यंत (ता. 21) राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Saturday, April 18, 2015 AT 05:45 AM (IST)

बारामती, जि. पुणे  - सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनेल हे एक ते दोन हजार मतांच्या फरकाने शेतकरी कृती समितीच्या जनशक्ती पॅनेलचा दणदणीत पराभव करून एकतर्फी विजयाकडे घोडदौड करीत आहे. संध्याकाळपर्यंत जाहीर झालेल्या चार गटांच्या निकालात सर्वच्या सर्व तेरा जागा सोमेश्वर विकास पॅनेलने मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या.

Saturday, April 18, 2015 AT 05:30 AM (IST)

पुणे  - राज्यावर अवकाळी पावसाचे सावट कायम असून, येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर पुणे आणि परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविली आहे. मात्र, राज्यात पुढील चार दिवस (20 एप्रिलपर्यंत) हवामान कोरडे राहण्याचा अंदाज दिला आहे.

Friday, April 17, 2015 AT 06:00 AM (IST)

सहकार मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई - राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्तभाव देण्यासाठी राज्यातर्फे साखर कारखान्यांना जाहीर करण्यात आलेल्या, 2000 कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्ज देण्याच्या प्रक्रियेत केंद्र सरकारने आर्थिक वाटा उचलावा, अशी मागणी राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता.16) नवी दिल्लीत केली.

Friday, April 17, 2015 AT 05:45 AM (IST)

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे आवाहन मुंबई  - प्रशासनाकडून पंचनामे आणि मदत वितरण परिपूर्ण झाल्याचे सांगितले गेले आहे. असे असतानाही काही पंचनामे आणि मदत वाटप राहिली असल्यास शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन महसूल आणि मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे. राज्यातील एकही शेतकरी मदतीविना वंचित राहणार नाही, याची ग्वाही मंत्री खडसे यांनी दिली आहे.

Friday, April 17, 2015 AT 05:15 AM (IST)

विदर्भात सरीवर सरी आजही पावसाचा अंदाज पुणे - गेल्या आठवडाभरात राज्यात ठिकठिकाणी सातत्याने सुरू असलेली गारपीट अखेर थांबण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने फक्त गुरुवारी (ता.16) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये एखाद-दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा दिला असून, गुरुवारपासून (ता.17) राज्यात कोठेही गारपीट होण्याची शक्‍यता नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Thursday, April 16, 2015 AT 05:45 AM (IST)

राज्यभरातील शेतकऱ्यांचा सवाल पुणे  - मोठमोठे ताफे घेऊन मंत्री आले, गारपिटीचे नुकसान पाहून गेले. तत्काळ मोठी मदत देऊ म्हणाले. प्रत्यक्षात नुकसानीला महिना उलटून गेला तरी ना पंचनामे व्यवस्थित केलेत, ना मदत मिळाली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात पिके गाळून आणि राज्यकर्त्यांनी पोकळ घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

Thursday, April 16, 2015 AT 05:30 AM (IST)

बाब --- राज्याची जाहीर मदत (फेब्रु 2015) ---- नवा निर्णय (एप्रिल 2015) कोरडवाहू शेतीपिके (हेक्‍टरी) --- 10,000 --- 6,800 सिंचनाखालील पिके (हेक्‍टरी) --- 15,000 --- 13,500 बहुवार्षिक पिके (हेक्‍टरी) --- 25,000 --- 18,000 पुणे  - केंद्र शासनाने आपत्तीग्रस्तांना मिळणाऱ्या मदतीत 50 टक्‍क्‍यांनी वाढ करण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीत मोठ्या प्रमाणात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Wednesday, April 15, 2015 AT 06:00 AM (IST)

मुंबई  - डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालील समतोल प्रादेशिक विकास उच्चस्तरीय समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी व त्याअनुषंगाने प्रशासकीय विभागांचे अभिप्राय विचारात घेऊन अहवाल सादर करण्यासाठी वित्त व नियोजन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे.

Wednesday, April 15, 2015 AT 05:45 AM (IST)

पुणे  - मानव व पर्यावरणाच्या दृष्टीने नैसर्गिक नियमांचा अवलंब करणारी शेतीच उपकारक ठरणार आहे. 30 एकर नैसर्गिक शेतीसाठी एक देशी गाईचे शेण व गोमूत्र पुरेसे होत असल्याचे 12 वर्षांच्या प्रयोगांतून दिसून आले आहे. त्यामुळे भाकड मानली जाणारी जनावरेही फायदेशीर ठरणार असल्याचे मत नैसर्गिक शेतीचे अभ्यासक सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केले.

Wednesday, April 15, 2015 AT 05:45 AM (IST)

गारपिटीचा इशारा कायम अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे  - राज्यात पूर्वमोसमी पावसाची मुसळधार सर आणि गारपिटीचा तडाखा कायम आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, कळवण, सटाणा आणि वर्धा जिल्ह्यात गारपीट झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या तिन्ही विभागांतील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला.

Wednesday, April 15, 2015 AT 05:30 AM (IST)

मुंबई  - अत्यंत उत्कंठेची लढत ठरलेल्या मुंबईच्या पश्‍चिम उपनगरात 'मातोश्री'च्या अंगणातील वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल आज (ता. 15) लागणार आहे. त्यासोबतच तासगाव- कवठे महांकाळ जागेचाही आजच निकाल लागणार आहे. शनिवारी (ता.11) वांद्रे (पूर्व) आणि तासगाव- कवठे महांकाळ (सांगली) या दोन विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणुक पार पडली होती.

Wednesday, April 15, 2015 AT 05:30 AM (IST)

राज्यात गारपीट सुरूच नुकसान वाढले पुणे  - बुलडाणा, वाशिम, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड, उस्मानाबाद, जालना व लातूर जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी रविवारी सायंकाळी व सोमवारी दिवसभरात वादळी वारे व पावसासह जोरदार गारपीट झाली. विदर्भावर वादळी पाऊस व गारपिटीचे सावट मंगळवारीही (ता. 14) कायम राहण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा दिला आहे.

Tuesday, April 14, 2015 AT 05:45 AM (IST)

10 लाख हेक्‍टरला फटका 33 ते 50 टक्‍क्‍यांत 4 लाख हेक्‍टर पुणे  - राज्यात 28 फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत सुमारे 10 लाख हेक्‍टर क्षेत्राला बसला आहे. यापैकी सुमारे चार लाख हेक्‍टर क्षेत्राचे 50 टक्‍क्‍यांहून अधिक, तर चार लाख हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे 33 ते 50 टक्‍क्‍यांदरम्यान नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये सुमारे तीन लाख हेक्‍टर फळपिके, तर पाच लाख हेक्‍टर रब्बी पिके आहे.

Tuesday, April 14, 2015 AT 05:30 AM (IST)

कोल्हापूर - राज्याच्या सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व, साखर संघाचे माजी अध्यक्ष व कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे (वय 66) यांचे सोमवारी (ता. 13) येथे सकाळी सातच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी कसबा बावडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tuesday, April 14, 2015 AT 05:30 AM (IST)

पुणे, नाशिक, नगर, बीड, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार गारपीट पुणे (प्रतिनिधी) ः हवामान खात्याचा गारपिटीचा इशारा तंतोतंत खरा ठरवत पूर्वमोसमी पावसाने शनिवारी दिवसभरात पुणे, नगर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी गारांचा जोरदार मारा केला. जळगाव, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांत वादळी पावसाचा जोर सर्वाधिक होता. आजही (ता. 12) राज्यात गारपिटीचा इशारा कायम आहे.

Sunday, April 12, 2015 AT 01:00 AM (IST)

शेतकरी हा प्राधान्यक्रम ठरवावा नाशिक (प्रतिनिधी) : "कधी नव्हे इतक्‍या मोठ्या संकटात शेतकरी असताना शासनस्तरावरून मात्र याकडे अनास्था दाखवली जात आहे. 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक लोक या व्यवसायांवर अवलंबून असताना सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावरच सोडून दिले की काय अशी स्थिती आहे, अशी नाराजीयुक्त टीका ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केली. राज्य सरकारला आवाहन करताना श्री.

Sunday, April 12, 2015 AT 12:45 AM (IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मुंबई ः राज्यातील विविध शेती समस्यांपैकी एक असलेला शेतमाल भावाचा कायमस्वरुपी तोडगा काढून शाश्वत कृषी विकासासाठी मार्गदर्शनाची मोठी अपेक्षा नवनिर्मित कृषिमूल्य आयोगाकडून आहे. त्यामुळेच कृषिमूल्य आयोगाला प्रभावीपणे काम करण्यासाठी कायदेशीर स्थान देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "ऍग्रोवन'शी बोलताना दिली. गुरुवारी (ता.

Sunday, April 12, 2015 AT 12:45 AM (IST)

निर्वी गावची घटना परिसरातील पहिलीच घटना पुणे (प्रतिनिधी) ः वेळ सकाळची... गाईच्या प्रसूतिकळा वाढल्या, तशा पवार कुटुंबीयांच्या नजरा वळल्या... गाईने वासरू दिले अन्‌ सगळ्यांचा जीव भांड्यात पडला... अर्ध्या तासाने पुन्हा गाय ऊठ-बस करताच डोळे विस्फारत गेले... गाईच्या कळा वाढल्या अन्‌ पवार कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला... अन् दुसरे वासरू जन्मले...

Sunday, April 12, 2015 AT 12:00 AM (IST)

मधस्थांची साखळी खंडित आज शेवटचा दिवस जळगाव (प्रतिनिधी) : कृषी व पणन विभाग तसेच "आत्मा' प्रकल्प संचालक कार्यालयातर्फे आयोजित धान्य महोत्सवाला शहरातील शिवतीर्थ मैदानावर शुक्रवार (ता. 10) पासून सुरवात झाली. पहिल्याच दिवशी ग्राहकांनी वर्षभरासाठी लागणाऱ्या धान्याच्या खरेदीसाठी गर्दी केली. रविवारपर्यंत (12 एप्रिल) सदरचा महोत्सव सुरू राहणार आहे.

Sunday, April 12, 2015 AT 12:00 AM (IST)

सातारा (प्रतिनिधी) : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या किवीज ऍक्‍वा बाटली बंद पाणी प्रकल्पास मॅन्युफॅक्‍चरिंग अँड सप्लाय ऑफ पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर अंतर्गत आयएसओ 9001:2008 हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झालेले आहे.

Sunday, April 12, 2015 AT 12:00 AM (IST)

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कृषीविषयक प्रकल्पांची आढावा बैठक येत्या 24 एप्रिलला मुंबईत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीचे आयोजन केले असून, त्यात पीपीपीविषयी महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्‍यता आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेज बळकटीकरणाच्या दृष्टीने कडधान्य व इतर पिकांमध्ये पीपीपी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

Sunday, April 12, 2015 AT 12:00 AM (IST)

आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीचा अंदाज लागवड घटीचा परिणाम जळगाव  - प्रतिकूल हवामान व अस्थिर बाजारभावामुळे गेल्या वर्षीच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसावे लागल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये यंदाच्या खरिपात कपाशी लागवडीसाठी फारसा उत्साह दिसून आलेला नाही.

Wednesday, April 08, 2015 AT 05:45 AM (IST)

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाधिवक्‍त्यांच्या उच्च न्यायालयातील वक्तव्याचा विपर्यास - मुंबई  - गोवंशहत्याबंदीनंतर टप्प्याटप्प्याने सरसकट प्राणिहत्याबंदी करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. याबाबत महाधिवक्ता सुनील मनोहर यांनी उच्च न्यायालयात केलेले निवेदन प्रसिद्धी माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध केले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.7) विधानसभेत सांगितले.

Wednesday, April 08, 2015 AT 05:45 AM (IST)

-कृषी राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांची विधानसभेत माहिती मुंबई  - राज्यातील कृषी साह्यकांना कनिष्ठ संशोधन सहायक पदावर पदोन्नती दिली जाईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मंगळवारी (ता. 7) विधान परिषदेत दिली. पदोन्नती देताना चारही कृषी विद्यापीठाच्या पदवीधारकांबरोबरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवीधारकांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. डॉ.

Wednesday, April 08, 2015 AT 05:30 AM (IST)

उच्च न्यायालयाची विचारणा - मुंबई  - शेतीला उपयोगी ठरणाऱ्या बकरीसारख्या अन्य प्राण्यांच्या कत्तलीवर सरकारने बंदी न घालता केवळ गोवंशच का निवडला, असा प्रश्‍न उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. 6) राज्य सरकारला विचारला. कृषी क्षेत्राला मदत करण्याच्या उद्देशाऐवजी नागरिकांनी बीफ खाऊ नये, म्हणूनच गोवंश हत्याबंदी कायदा करण्यात आला असे वाटते, असे मतही उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

Wednesday, April 08, 2015 AT 05:15 AM (IST)

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाला पूरक वातावरण पुणे  - राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडण्यास पूरक वातावरण तयार होत आहे. मंगळवारी दुपारनंतर पूर्व विदर्भात ढग गोळा झाले होते. मंगळवारपर्यंत (ता. 14) विदर्भासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उद्या (ता. 8) विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे.

Wednesday, April 08, 2015 AT 05:15 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: