Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 2221
एकनाथ खडसे : ऊसगाळपावर निर्बंध घालण्याचा विचार मुंबई - भूसंपादनासंदर्भात केंद्राचा कायदा अद्याप संमत झालेला नाही. मात्र, प्रकल्पाच्या संदर्भात जमीन संपादन करण्याच्या बाबतीत राज्य शासनाचा कायदा अलीकडेच अस्तित्वात आलेला आहे. त्यानुसार प्रकल्पासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला ग्रामीण भागात रेडीरेकनरच्या निश्चित दराच्या पाच पट, तर शहरी भागात अडीच पट देण्याची तरतूद राज्याच्या भूसंपादन कायद्यात आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या प्रकल्पासाठी राज्यात भूसंपादन करताना याच कायद्याच्या तरतुदींचा अवलंब केंद्र शासनाने करावा, अशी विनंती आम्ही केंद्र शासनाला केल्याची माहिती महसुसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
Wednesday, September 02, 2015 AT 05:45 AM (IST)
कमी दिवसांत चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्‍स तंत्रज्ञान हे हिरवा चारा उत्पादनासाठी पर्याय म्हणून पुढे येत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत, कमी वेळेत व कमी पाण्यावर चारानिर्मिती करता येते. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही चारानिर्मिती या तंत्रज्ञानाचा वापर करावा. डॉ. शरद साळुंके, सचीन डिग्रसे जनावरांच्या आहारातील चाऱ्याचा भाग 70 टक्के तर उरलेला 30 टक्के भाग हा पशुखाद्याचा असतो. चाऱ्यामध्ये प्रामुख्याने हिरवाचारा, वाळलेली वैरण, गवत, झाडपाला इ. चा समावेश होतो. हिरवा चारा हा जनावरांच्या आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हिरव्या चाऱ्याच्या अनुपलब्धतेमुळे जनावरांची वाढ, उत्पादन आणि पुनरुत्पादनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळे शाश्‍वत पशुउत्पादनासाठी जनावरांना नियमित संतुलीत आहार पुरवणे गरजेचे आहे.  1) मातीशिवाय फक्त पाण्याचा किंवा पोषणतत्वयुक्त पाण्याचा वापर करून ट्रेमध्ये धान्याची उगवण व अंकुरणापासून तयार झालेल्या चाऱ्याचा हायड्रोपोनिक्‍स चारा असे म्हणतात. हा चारा 7-9 दिवसांत 20 ते 30 सें.मी. उंचीचा तयार होतो.
Wednesday, September 02, 2015 AT 05:30 AM (IST)
डॉ. ए. व्ही. कोल्हे सध्या पश्‍चिम विदर्भातील खरीप पिकांवर भुरके सोंडे (मायलोसेरस सोंडे, मायलोसेरस मॅकूलॅसस डेसबर) या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. हा प्रादुर्भाव पीक फुलावर येईपर्यंत सर्वसाधारणपणे दिसतो. - भुरके सोंडे ही बहुभक्षी कीड असून, कापूस, भेंडी, अंबाडी, मका, सोयाबीन, चवळी, ऊस, तूर, रागी, बाजरी या हंगामी पिकासोबतच आंबा, बोर, स्ट्रॉबेरी, डाळिंब, सफरचंद, पीयर, पीच अशा फळपिकांमध्ये आढळते. - तसा विचार करता ही किरकोळ कीड असून, गेल्या 4 ते 5 वर्षांपासून खरीप पिकांवर दिसत आहे. लक्षणीय प्रादुर्भाव असल्याशिवाय फवारणी करण्याची गरज नाही. पांढऱ्या रंगामुळे शेतकरी भुरके सोंडे या किडीला पांढरी माशी समजून (विशेषतः कपाशीवर) किटकनाशकांच्या फवारण्या करतात. त्यामुळे पांढरी माशी व भुरके सोंडे यातील फरक लक्षात घ्यावा.  भुरके सोंडे -  - या किडीचा प्रौढ अंडाकृती, 3 मि.मी. व त्यापेक्षा थोडा मोठा असतो. - त्यांचा रंग पांढुरका राखाडी असून, पंखाची वरील जोडी ही टणक असते. हे सोंडे जास्त उडू शकत नाहीत. - त्यांच्या पाठीवर चार काळ्या रंगाचे ठिपके असतात. पांढरी माशी - या किडीचा आकार हा अर्धा ते एक मि.मी.
Wednesday, September 02, 2015 AT 03:45 AM (IST)
जैनापूर - येथील शरद कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे कार्यकारी संचालक अनिल बागणे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले, सध्या संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली आहे. शेतकरी बांधवाला या दुष्काळी चक्रातून बाहेर काढण्याचे काम विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण व संशोधनातून करावे. प्राचार्य डॉ. एस. सी. पाटील यांनी महाविद्यालयाची माहिती सांगितली. प्रा. पी. टी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी द्वितीय व चतुर्थ सत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. व्ही. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. एच. फलके यांनी आभार मानले.
Wednesday, September 02, 2015 AT 03:45 AM (IST)
"आयसीएआर'ने जीएम पिकांबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. संघ परिवारातील संघटनांनी विरोध केल्यामुळे या पिकांच्या प्रक्षेत्र चाचण्यांचा विषय रखडला आहे. निष्कर्षांबद्दल आक्षेप जरूर असावेत, परंतु संशोधनच नको, ही भूमिका योग्य नाही. देशात भूमितीय श्रेणीने वाढणारी लोकसंख्या आणि शेतजमिनीचा आकार व उपलब्धतेत होणारी घट लक्षात घेता अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्णता टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) या देशातील प्रमुख संस्थेने जनुकीय बदल केलेल्या (जीएम) पिकांच्या बाबतीत केलेले भाष्य महत्त्वपूर्ण आहे. देशातील कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि पुढील संशोधनाची दिशा यासंदर्भात संस्थेने "व्हिजन 2050' हा मसुदा तयार केला आहे. देशातील अन्नधान्यांची मागणी आणि पुरवठा यांतील तफावत भरून काढण्यासाठी जीएम तंत्रज्ञान हा महत्त्वाचा उपाय ठरू शकतो, असे या मसुद्यात म्हटले आहे. पिकांची उत्पादकता, आहारातील पोषण आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न या तीन आघाड्यांवर यश मिळविण्यासाठी या मसुद्यात नऊ प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे, त्यामध्ये जीएम पिकांचा समावेश आहे.
Wednesday, September 02, 2015 AT 03:30 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: