Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 124
शेळीच्या आरोग्याची काळजी न घेणे, शेळी व करडांना जंत नाशकाचा मात्रा न देणे, चुकीचे प्रजनन व्यवस्थापन, असंतुलित खाद्य पुरवठा यामुळे शेळी आणि करडांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन शेळ्यांचे आरोग्य आणि प्रजनन व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे. डॉ. अनिल पाटील, डॉ. सुनील सहातपुरे शेळीपालन करताना शेळीच्या जातीची निवड, शेळी आणि करडांचे व्यवस्थापन, त्यांना होणारे आजार आणि त्यावरील उपचार तसेच व्यवसायाचे अर्थशास्त्र याबाबत माहिती असणे आवश्‍यक आहे. 1) शेळीपालन व्यवसायामध्ये प्रजनन व्यवस्थापन फार महत्त्वाचे आहे. शेळीचे किमान वय 8 ते 10 महिन्यांत 30 किलो झाले पाहिजे. या वेळेस शेळी पहिला माज दाखवतात परंतु पहिले दोन माज रेतन न करता सोडून द्यावेत. तिसऱ्या माजास रेतन करावे. 2) शेळी अस्वस्थ होणे, सतत ओरडणे, शेपटी हलवणे, खाद्ये खाणे कमी करणे, योनी मार्गात चिकट स्राव दिसून येणे ही शेळीमधील माजाची लक्षणे आढळून येतात. 3) शेळीतील माजाचे चक्र दर 21 दिवसांनी येते. माजाचा कालावधी 30 ते 36 तास असतो. असे निदर्शनास आलेले आहे, की शेळीमधील स्त्रीबीज 24 ते 30 तासांत माज सुरू झाल्यानंतर होत असते.
Wednesday, October 22, 2014 AT 11:27 AM (IST)
रक्त हे जसे जगण्यासाठी आवश्‍यक आहे, तसेच ते आजारांच्या निदानासाठीसुद्धा महत्त्वाचे आहे. रक्त तपासणीद्वारे जनावरास होणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांचे अचूक निदान होते. त्यानंतर योग्य औषधोपचार करता येतात. जनावरांच्यामध्ये सडकून ताप येणे, लाल लघवी होणे, गरगर फिरणे, धडका मारणे, अशक्तपणा वाढणे, ऍनिमियासारखी लक्षणे दाखवताच पशुवैद्यकाच्या सल्ल्याने ताबडतोब रक्तपरीक्षण करून घ्यावे. रक्त तपासणीचे फायदे ः 1) रक्त हे शरीरात घडणाऱ्या विविध शरीरक्रियांचे किंबहुना संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब असते. 2) रक्त तपासणीद्वारे आरोग्यविषयक महत्त्वाची माहिती मिळते. 3) विविध तपासण्यांद्वारे जनावरास होणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांचे अचूक निदान होऊन योग्य औषधोपचार करता येतो. 4) विविध तपासण्यांच्या अनुमानावरून जनावरांना द्यावयाच्या संतुलित आहाराचे नियोजनदेखील करता येते. 5) मोठ्या शस्त्रक्रियेपूर्वी संपूर्ण रक्त तपासणी अत्यावश्‍यक असते. कारण जनावर शस्त्रक्रियेस योग्य आहे किंवा नाही हे रक्त तपासणीनंतरच निश्‍चित केले जाते.
Sunday, October 19, 2014 AT 12:00 AM (IST)
जनावरांमध्ये उवा, माश्‍या, गोचीड या प्रकारांतील बाह्य परोपजीवींची समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. बाह्य परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे शरीर खाजते, केस गळतात, जनावर अस्वस्थ होते, त्यांचे वजन कमी होते, दूध उत्पादनात घट येते. याशिवाय या परोपजीवींमुळे जखमेमध्ये आसडी पडते, जिवाणू, विषाणू, रक्तातील कृमींमुळे आजार वाढतात. या बाह्य परोपजीवींच्या नियंत्रणासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत परंतु ही औषधे विषारी असल्यामुळे त्यापासून जनावरांना विषबाधा होण्याची शक्‍यता असते. हे लक्षात घेऊन स्वस्त व सुरक्षित असा औषधी वनस्पतींचा वापर अत्यंत गुणकारी ठरतो. उपयुक्त औषधी वनस्पती ः 1) वेखंड वेखंड अथवा वचा या नावाने ओळखली जाणारी वनस्पती आहे. चेतना संस्थेच्या आजारात ही वनस्पती वापरली जाते. या वनस्पतीची पावडर उवा, गोचीड यांसारख्या बाह्य कृमींच्या नियंत्रणासाठी वापरावी. ही पावडर जनावरांच्या शरीरावर लावत असताना, केसांच्या उलट दिशेने लावावी, म्हणजे ती केसांच्या मुळांपर्यंत (त्वचेपर्यंत) पोचते. 2) कडुनिंब कडुनिंब तेल हे बाह्य परोपजीवींच्या नियंत्रणासाठी अत्यंत गुणकारी आहे. हे तेल जनावरांच्या शरीरावर लावावे.
Sunday, October 19, 2014 AT 12:00 AM (IST)
1) पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन आवश्‍यक आहे. पानवेल लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घेतल्यास फायदेशीर ठरते. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून पुरेसे चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. पानमळा लागवडीच्या क्षेत्राचे नियोजन करून पानवेलीच्या सावली आणि आधारासाठी शेवरी, शेवगा, हादगा यांची लागवड जून-जुलै महिन्यांत पहिल्या आठवड्यात करावी. राज्यात बहुतेक ठिकाणी कपुरी जातीची लागवड केली जाते. 2) महात्मा फुले कृषी विद्यापीठाने "कृष्णा पान' ही जात विकसित केली आहे. या जातीची पाने आकाराने जाड व मोठी, पानांचा टिकाऊपणा चांगला, पानांचा आकार लंबगोलाकार असतो. याशिवाय काली पत्ती, मीठा पान, मघई, बनारसी, देशावरी आणि बांगलावर्गीय जातींची लागवड काही भागांत केली जाते. 3) पानवेलीची लागवड बेण्यापासून केली जाते. साधारणपणे चार वर्षे वयाच्या वेलीच्या शेंड्याकडील 45 सें.मी. लांबीचे चार पेरांचे व पाच पाने असलेले रसरशीत फाटीदार जोमदार बेणे निवडावे. आधारासाठी लावलेल्या शेवगा, हादगा या झाडांची उंची दोन ते अडीच फूट झाल्यानंतर पावसाची रिमझिम चालू असताना ऑगस्ट महिन्यात वेलीची लागवड करावी.
Sunday, October 19, 2014 AT 12:00 AM (IST)
एखाद्या दुग्ध प्रक्रियादाराचे यशस्वी होणे किंवा टिकून राहणे, हे सर्वस्वी ग्राहकांच्या त्या उत्पादनातील असणाऱ्या विश्‍वासावर अवलंबून आहे. यासाठी उत्पादकाने विक्री तंत्र, ज्ञान आणि कौशल्याची आवश्‍यकता आहे. आपला विभाग आणि बाजारपेठेनुसार दूधविक्रीचे नियोजन करावे लागते परंतु सर्वसाधारणपणे व्यवसाय पूर्ण क्षमतेने तग धरण्यासाठी तसेच भविष्यातील वृद्धीसाठी काही गोष्टींचा विचार, अभ्यास आवश्‍यक आहे. बहुतेक वेळा नवीन लहान व मध्यम प्रक्रियादारांना विपणासंबंधी खूप कमी किंवा अजिबात अनुभव नसतो. व्यवसाय सुरू करताना काही प्राथमिक गोष्टींची प्रत्येकाला माहिती असणे आवश्‍यक आहे.
Sunday, October 19, 2014 AT 12:00 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2014 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: