Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 32
शेतीवर पूर्णपणे विसंबावे अशी आजची स्थिती नाही. कारभाऱ्याच्या मदतीसाठी घरची कारभारीण धीराने पुढे आली तर प्रत्येक घराचे आर्थिक चित्र बदलू शकते. त्यासाठी ग्रामीण भागात राहून करता येतील असे अनेक छोटे व्यवसाय आहेत. अनेक महिलांनी त्यामध्ये यश मिळवताना घरासाठी शाश्‍वत उत्पन्नाचे पर्याय तयार केले आहेत. अशा जिद्दी महिलांच्या यशकथा सर्वांनाच नवे काही तरी करायला, आपल्या कुटुंबाला सावरायला प्रेरणा देतील. आजपासून सुरू होणाऱ्या या साप्ताहिक पानाचा उद्देश महिलांना पूरक अर्थार्जनासाठी मार्गदर्शन करणे, त्यांचे मनोबल उंचावणे, त्यांचा आत्मविश्‍वास वाढवणे हाच आहे. "ऍग्रोवन'चा महिला वाचकवर्ग या पानाचे नक्कीच स्वागत करेल, असा विश्‍वास वाटतो. शरीर वृद्धत्वाकडे झुकत असले तरी मनाने तरुण असलेल्या बाभूळगाव (ता. पातूर, जि. अकोला) येथील सुमनताई गवई यांनी महिला सक्षमीकरणाचा वसा जपत मसाला उद्योगाची पायाभरणी केली. सुमनताईंच्या या मसाला उद्योगाचा गंध आता सर्वदूर दरवळू लागला असून, त्यांच्यापासून प्रेरणा घेत आज गावात तब्बल दहा समूहांची नव्याने उभारणी झाली आहे. बोरगावमंजू (जि. अकोला) हे सुमनताईंचे माहेर.
Sunday, January 04, 2015 AT 03:15 AM (IST)
इच्छाशक्ती आणि आवड असल्यावर सर्व शक्‍य होत असल्याचे शिरगाव (ता. कराड, जि. सातारा) येथील रणजित पाटील यांनी दाखवून दिले आहे. रणजित पाटील यांनी मुंबईतील नोकरी सांभाळून गावाकडील शेतीमध्ये सुधारित तंत्राचा अवलंब करून ऊसउत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. सा तारा जिल्ह्यातील काशीळ-पाली रस्त्यावर शिरगाव (ता. कराड) हे 1500 लोकसंख्या असलेले गाव. या गावातून तारळी नदी वाहत असल्याने गावातील बहुतांश शेती बागायती आहे. या गावातील रणजित हिंदुराव पाटील हे मुंबई येथे नोकरी करत गावाकडील आठ एकर शेतीही सांभाळतात. रणजित यांचे बीई (सिव्हिल) शिक्षण झाले आहे. रणजित यांचे वडील हिंदूराव गजानन पाटील हे डीवायएसपी असल्याने नोकरीच्या निमित्ताने गावापासून दूर राहावे लागायचे, तरीही त्यांनी शेतीशी नाते जपले होते. शेतीमध्ये सुधारणा करताना त्यांनी त्या काळात शेताजवळील ओढ्यावर दरवाजे असलेला सिमेंट बंधारा बांधला. रेशीम शेतीचा प्रयोग केला, 30 टन क्षमतेचा गांडूळ खताचा प्रकल्प, जनावरांसाठी गोठा बांधला होता. मात्र मजुराअभावी हे प्रकल्प पुढे वाढवता आले नाहीत.
Sunday, January 04, 2015 AT 02:00 AM (IST)
नमस्कार! 2015 हे नवीन वर्ष माझ्या सर्व शेतकरी कुटुंबातील मैत्रिणींना, घरातील वडीलधाऱ्यांना आणि चिमुकल्या बालगोपाळांना आनंदाचे जावो, ही ईश्‍वरचरणी मनापासून प्रार्थना. खरोखरीच अक्षरशः ऊन, वारा, पाऊस कशाकशाची तमा न बाळगता कष्ट करून शेतात पिकवलेले धान्य आम्हाला मिळते तेव्हा आजच्या लहान-लहान मुलांना या तुमच्या कष्टांची जाणीव आम्ही करून देतो. अन्न हा आवश्‍यक घटक असून, त्यासाठी जे धान्य लागतं ते काळ्या मातीत उत्तम रीतीने यावं यासाठी तुम्ही किती मेहनत करता हे समजायलाच पाहिजे. ज्याद्वारे सर्वांच्या मनात प्रेमाबरोबर आदर आणि आपुलकी निर्माण होईल. कधी अवकाळी पाऊस व त्यातून होणारे पिकाचे भरमसाट नुकसान तर कधी दुष्काळामुळे कमी पडणारे पाणी यातून होणाऱ्या मानसिक त्रासातून, दुःखातून सावरताना तुमच्या मनाच्या खंबीरपणाचं कौतुक करावंसं वाटतं.
Sunday, January 04, 2015 AT 02:00 AM (IST)
कोंबड्यांमध्ये सर्वत्र आढळणारा आजार म्हणजेच लूज ड्रॉपिंग किंवा कोंबड्यांना पातळ संडास होणे.  मुळात फारसा धोकादायक नसलेला हा आजार योग्य वेळी उपचार न केल्यास मात्र धोकादायक ठरतो.  1) खाद्यात असणारे जास्त प्रमाणातील प्रथिने अथवा इतर पौष्टिक घटक यामुळे हा आजार दिसून येतो. परंतु, याच दरम्यान कोंबड्यांना संसर्ग झाला, तर यात मोठ्या प्रमाणात मर होऊ शकते.  2) या आजारामुळे कोंबड्यांची वाढ नीट होत नाही. त्यांचे वजन भरत नाही, कोंबड्या अशक्त होतात.  3) कोंबड्यांना आजाराचा संसर्ग झाल्यास सर्वप्रथम पशुवैद्यकाद्वारे प्रतिजैविकचा वापर करावा.  औषधी वनस्पतींद्वारे उपचार :  1) कुडा :  कुटज या नावाने ही वनस्पती ओळखली जाते. मोठ्या वृक्ष स्वरुपातील या वनस्पतीची साल औषधीमध्ये वापरली जाते.  सालीची मात्रा :10-15 ग्रॅम प्रति 100 पक्षी  2) कात :  खदिर या नावाने ही वनस्पती ओळखली जाते. या वनस्पतीचा निर्यास किंवा डिंक औषधीत वापरतात. तसेच झाडाची सालदेखील वापरतात.
Sunday, January 04, 2015 AT 01:45 AM (IST)
वातावरणातील अतिशय बारीक सारीक बदल, व्यवस्थापनातील छोट्या त्रुटी, खाद्याच्या प्रमाणात आणि गुणवत्तेतील बदलामुळे कोंबड्यांच्या चयापचायाच्या प्रक्रियेत बदल होतात. यामुळे कोंबड्यांना वेगवेगळे आजार होतात. आजाराची लक्षणे ओळखून तज्ज्ञांकडून उपाययोजना कराव्यात.  स ध्याच्या परिस्थितीत उत्तम जाती, संतुलित आहार आणि काटेकोर संगोपनामुळे 38 ते 42 दिवसांत ब्रॉयलर कोंबड्या साधारणत: दोन किलो वजनाच्या होतात. याचबरोबरीने लेअर कोंबड्यांचे वार्षिक अंडी उत्पादन 300 ते 320 अंड्यांपर्यंत पोचले आहे. ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये मांसाची ज्या प्रमाणात वेगाने वाढ होते, त्या प्रमाणात हृदय आणि फुफ्फुस यांची वाढ होत नाही. कोंबड्यांचे फुफ्फुस जास्त प्रसरण पाऊ शकत नाही. यामुळे यामुळे कोंबड्यांचा चयापचयाचा वेग जास्त असतो आणि त्यांच्यावर ताण असतो.
Sunday, January 04, 2015 AT 01:30 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: