Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 2
- मॉन्सूनपूर्व काळात आणि मॉन्सून सक्रिय नसतानादेखील महाराष्ट्रात वादळी पावसासह विजा पडतात, अनेकदा गारपीट होते. - मॉन्सूनपूर्व काळात जम्मू-काश्मीरमध्ये हिमपात झाल्यास, उत्तर महाराष्ट्रात विजांच्या वादळांसह खात्रीने अवकाळी पाऊस, तसेच गारपीट होत असल्याची लेखकाची काही वर्षांतील निरीक्षणे आहेत. पश्चिमेकडून थंड वारे वाहिल्यासदेखील वातावरणात होणाऱ्या बदलामुळे अनेकदा असाच प्रभाव पडतो. - मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये तीव्र बर्फवृष्टी झाल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गारपिटीला भिऊन जाऊ नये. सावध पवित्रा घेत स्वतःच्या पीकपाण्याची योग्य काळजी घ्यावी. - विजांच्या वादळांची गेल्या बारा वर्षांतील निरीक्षणे लेखकाने घेतली आहेत, त्यावरून विजांच्या वादळाच्या फेऱ्या किंवा लाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात विजांच्या वादळाच्या फेऱ्या किंवा लाटांचे दोन मुख्य प्रकार आहेत. 1) विदर्भाकडून सुरू होत कोकण किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल करणारी. 2) कोंकण किनार पट्टीकडून विदर्भाच्या दिशेने वाटचाल करणारी तसेच या व्यतिरिक्त साधारणपणे तीन उप-प्रकार देखील आढळतात.
Sunday, May 18, 2014 AT 12:00 AM (IST)
जगभर विजांनी बळी ठरण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतात दर वर्षी विजा पडण्यामुळे शेकडो नागरिक, तसेच जनावरांना प्राण गमवावे लागतात. पाऊस नसतानाही स्थानिक हवामानामुळे कडाडणाऱ्या विजा घातक ठरतात. आवाज न होता पडणाऱ्या विजा शक्तिशाली, विध्वंसक असतात. विशेष म्हणजे विजांमुळे होणाऱ्या मृत्युसंख्येत भारतात महाराष्ट्र आघाडीवर आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रात विजांची वादळे ही ईशान्य भारतापेक्षा तुलनेने कमी होतात मात्र महाराष्ट्रात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. १) विजा कोसळत असताना निघणाऱ्या शलाकांच्या संपर्कात आल्याने गंभीर जखमा होतात, मालमत्तेचे नुकसान होते. ईशान्य भारतात वीज पडून होणाऱ्या मृत्यूंबाबत मोठी जनजागृती आहे. याउलट महाराष्ट्रातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये विजा चमकत असताना घ्यायच्या काळजीसंदर्भात बेफिकीर वृत्ती दिसते. परिणामी, महाराष्ट्रामध्ये विजा पडून होणाऱ्या मृत्यूंची संख्या जास्त आहे. २) गेल्या काही वर्षांतील निरीक्षणे पाहिली तर २००६ मध्ये प्रत्यक्ष विजा पडून अधिकृत नोंद झालेल्या मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात ६६४ इतकी होती.
Sunday, May 18, 2014 AT 12:00 AM (IST)
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2014 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: