Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 107
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे आश्वासन मुंबई - राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांना तीन वर्षे सेवाकाळ आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत १२ वर्षांचा लाभ देण्यासाठी मुख्य सचिव यांच्याकडे पाठपुरावा करणार असून, इतर मागण्यासंदर्भात निश्चित कालमर्यादेत सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिले. या वेळी राज्यमंत्री दादाजी भुसे तसेच ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता आदी उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या, की ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या दरमहा प्रवासभत्ता वेतनासोबत देण्याबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा करून तो लवकरात लवकर मंजूर करण्यात येईल. तसेच पदनिश्चितीबाबत आकृतिबंधाचे काम सुरू असून, सर्व जिल्हा परिषदाकडून २००१ व २०११ च्या लोकसंख्येवर आधारित आवश्यक सज्जे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची पदे संकलित करण्यात येत आहेत.
Tuesday, March 28, 2017 AT 05:00 AM (IST)
मुंबई : मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाणप्रकरणी विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन करत विरोधकांनी या घटनेबद्दल सरकारचा शनिवारी (ता. २५) निषेध केला. विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षाचे सर्वच आमदार आंदोलनात सहभागी झाले होते. विधानभवनाच्या परिसरात सरकारविरोधी घोषणा देत विरोधकांनी निषेध फेरी काढली. या वेळी ‘भाजप सरकारचा धिक्कार असो', ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे', ‘कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाय', ‘फडणवीस सरकारचा निषेध’, ‘मंत्रालयात शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो’, ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे', अशी घोषणाबाजी या वेळी विरोधकांनी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या गारपिटीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्‍यातील घाटशेंद्रा येथील शेतकरी भुसारे यांचे मोठे नुकसान झाले. इतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली मात्र आपल्याला अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार त्यांनी शासनाकडे केली होती.
Sunday, March 26, 2017 AT 06:00 AM (IST)
मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सलग बाराव्या दिवशी विधान परिषद ठप्प झाल्याने कामकाज पत्रिकेनुसार राज्याचा अर्थसंकल्प विधान परिषदेत चर्चेशिवाय मंजूर झाल्याचे मानण्यात येते. विधानसभेतील विरोधी पक्षांच्या आमदारांच्या निलंबनाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने विधानसभेतही अर्थसंकल्प विरोधकांशिवाय मंजूर होण्याचे सावट पडले आहेत.  राज्याच्या अर्थसंकल्प मांडताना झालेल्या गोंधळामुळे याआधी सन २००१, २०११ मध्येही अशाचप्रकारे विरोधी पक्षातील आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्या वेळच्या कारवाईत विरोधी पक्षात भाजपचे आमदार असलेले विद्ममान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही निलंबित आमदारांमध्ये समावेश होता. आतापर्यंतच्या या तिन्ही घटनांमध्ये एकूण ४७ आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.  काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सन २००१ मध्ये तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यावर विरोधकांनी गैरव्यवहाराचा आरोप केला होता. राष्ट्रवादीचे जयंत पाटील वित्तमंत्री होते. पायावरील शस्त्रक्रियेमुळे ते व्हीलचेअरवरून विधिमंडळात अर्थसंकल्प मांडण्यासाठी आले होते.
Saturday, March 25, 2017 AT 06:00 AM (IST)
मुंबई - शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याने विरोधी पक्ष आता रस्त्यावर उतरणार अाहे. २९ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह विधिमंडळातील सर्वच विरोधी पक्ष चांदा ते बांदा राज्यव्यापी संघर्ष यात्रा काढणार अाहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.  विधानसभेत शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ आमदारांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत निलंबित करण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव मांडला होता. ही सरकारची दडपशाही अाहे. शेतकरी कर्जमाफीची मागणी व सरकारकडून सुरू असलेल्या मुस्कटदाबीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे विरोधी पक्षांनी निश्चित केले आहे. या यात्रेचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे.  यासंदर्भात त्याआधी झालेल्या विरोधी पक्षांच्या आमदारांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
Saturday, March 25, 2017 AT 06:00 AM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन मुंबई - मंत्रालयात दाद मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला झालेली मारहाण आणि संपूर्ण घटनाक्रमासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करून संपूर्ण अहवाल मला अवगत करण्यात यावा, असे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मंत्रालयात झालेल्या शेतकरी मारहाणीबाबत महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी निवेदन केले. मुख्यमंत्री म्हणाले, की औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील शेतकरी श्री. रामेश्वर हरिभाऊ भुसारे हा दिनांक 23 मार्च, 2017 रोजी दुपारच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आला होता. दिनांक 11 व 12 एप्रिल, 2015 रोजी झालेल्या गारपिटीत त्याने स्वखर्चातून उभारलेल्या शेडनेट व पॉलिहाउसच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी त्याने स्थानिक कृषी विभागाकडे रीतसर अर्ज केला होता. मात्र नैसर्गिक आपत्तीत दिली जाणारी मदत ही फक्त पिकांसाठी दिली जाते, असे त्याला कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. पुढच्या वर्षासाठी या शेतकऱ्याला शासकीय योजनेतून शेडनेटसाठी अर्ज करण्यास सांगितले.
Saturday, March 25, 2017 AT 05:45 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: