Last Update:
 
मुख्यपान
संतोष विंचू येवला, जि. नाशिक : जातीच्या गणितावर छगन भुजबळ यांना शह देण्याचा प्रयत्न झाल्याने लक्षवेधी ठरलेला येथील निकाल अपेक्षितच लागला.
सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग  - कणकवलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेकॉर्डब्रेक सभा होऊनही कॉंग्रेसच्या नीतेश राणे यांनी खूप मोठा विजय मिळविला.
शिवप्रसाद देसाई सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग  - कुडाळमधून कॉंग्रेसचे राज्य प्रचारप्रमुख नारायण राणे यांचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी तब्बल 10,376 मतांनी पराभव केला. राणे यांच्या गेल्या 20 वर्षांतील साम्राज्याला हा मोठा धक्का आहे.
मुंबई  - नवी मुंबईतील (जि. ठाणे) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हेवीवेट नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांना अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला आहे.
भूपिंदरसिंग हुडा यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेसला जबर धक्का नवी दिल्ली- हरियाना विधानसभेच्या 90 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत रविवारी (ता. 19) दुपारी तीन वाजेपर्यंत 31 जागांवर भाजप विजयी झाला आहे. भाजप पूर्ण बहुमताकडे वाटचाल करीत आहे.
कोल्हापुरात सतेज पाटील, विनय कोरे पराभूत कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे.
सांगली -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, माजी वनमंत्री पतंगराव कदम यांनी जिल्ह्यात आपला गड कायम राखला. इतर ठिकाणी मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन्ही पक्षांचे पानिपत झाले.
महाराष्ट्र विधानसभेचा आज फैसला दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार मुंबई (प्रतिनिधी) ः संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभेवर "आवाज कुणाचा?' हे आज स्पष्ट होणार आहे. तीस वर्षांनंतर झालेल्या "स्वबळा'च्या सत्वपरीक्षेचाही आज निकाल लागणार आहे.
भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे येण्याचा जनमत चाचण्यांचा अंदाज मुंबई- राज्यात आगामी सरकार भाजपच्या नेतृत्वाखाली बनण्याची शक्‍यता सर्व जनमत चाचण्यांनी वर्तविल्याने मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार याविषयीच्या चर्चेने आता वेग घेतला आहे.
- एक महिन्यात पूर्ण केला परतीचा प्रवास - चार महिन्यांहून अधिक काळ मुक्काम - दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय पुणे (प्रतिनिधी) : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. 18) संपूर्ण देशातून माघारी परतले आहेत.
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2014 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: