Gold Rate : सोने-चांदीच्या दरात वाढ

Gold And Silver Rate Update : देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याचा दर सुमारे १३० रुपयांनी वाढून ६०,३७० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.
Gold Rate
Gold RateAgrowon

New Delhi : देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याचा दर सुमारे १३० रुपयांनी वाढून ६०,३७० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.

तर चांदीही ५० रुपयांनी महागली असून, दर ७२,६०० रुपये प्रति किलोवर पोहोचला. कमोडिटी मार्केटमध्ये किमती वाढण्याचे कारण जागतिक संकेत आहेत.

भारतीय सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरवाढीने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले होते मात्र, मागील काही दिवसांपासून भाव नरमले आहेत.

या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली. मात्र एमसीएक्सवर दोन्ही धातूंच्या दरात वाढीसह व्यवहार होत आहेत.

Gold Rate
Gold Rate : सोने दरात नरमाई; चांदीच्या दरात तेजी

गुडरिटर्न्स वेबसाइटवरील उपलब्ध माहितीनुसार बुधवारी (ता. १७) सोन्याच्या भावात जवळपास ५०० रुपयांनी घट झाली.

२२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ४५० रुपयांनी घसरून मंगळवारच्या तुलनेत ५६,३०० रुपयांवर पोहोचले, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९० रुपयांनी कमी होऊन ६१,४२० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे.

उल्लेखनीय आहे की सोन्याच्या दरात चढउतार होऊनही सर्वसामान्यांना शुद्ध सोने खरेदीसाठी प्रति ग्रॅम ६१ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे, बुधवारी चांदीची किंमतही ५०० रुपयांनी कमी होऊन ७५,१०० रुपयांवर आली.

आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदीच्या किमतींवर उलथापालथ होताना दिसत आहे. कोमॅक्सवर सोन्याची किंमत प्रति औंस २००० डॉलरच्या खाली घसरली असून, सुमारे २ आठवड्यांनंतर सोन्याची किमत २००० डॉलरच्या खाली आली आहे.

मंगळवारी सोन्याचा भाव प्रति औंस २५ डॉलरने घसरला होता, तर चांदीही किमतीही घसरणीसह व्यवहार करत आहे. कॉमॅक्स चांदीचा भाव २४ डॉलर प्रति औंसच्या खाली आहे, जो ७ आठवड्याच्या नीचांक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com